कशी केली कारवाई?
कराड शहर वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी अमोल पवार हे शहरात वाहतूक नियमनाचे कर्तव्य बजावत होते. यादरम्यान समोरून येणाऱ्या एका ट्रॅव्हल्सवर त्यांना संशय आला. त्यांनी तात्काळ वाहन थांबवून त्याची झडती सुरू केली. वाहनाचा कोपरा न् कोपरा तपासत असताना अचानक पोलिसांच्या हाती सोने-चांदी व्यापाऱ्याशी संबंधित असलेला चांदीचा साठा लागला. एवढ्या मोठ्या प्रमाणातील मुद्देमाल पाहून अमोल पवार यांनी क्षणाचाही विलंब न लावता या घटनेची माहिती पोलीस उपअधीक्षक राजश्री पाटील यांना दिली.
व्यावासयिक विशाल अगरवालच्या अडचणीत वाढ? जामीन रद्द करण्यासाठी पोलिसांची न्यायालयात धाव
मुद्देमाल जप्त
याची माहिती मिळताच पोलीस उपाधीक्षक राजश्री पाटील यांनी तातडीने कराड शहर पोलीस निरीक्ष दत्तात्रय दराडे यांना पिढीला कारवाईचे आदेश दिले. यांनतर संबंधित संशयास्पद वाहन आणि कोट्यवधींचा मुद्देमाल पोलिसांच्या कडक बंदोबस्तात कराड शहर पोलीस ठाण्यात आणण्यात आला. पोलीस ठाण्यात आणल्यानंतर या 150 किलो चांदीची आणि 40 लाखांच्या रोकडीची कागदपत्रे (Documents), जीएसटी बिले (GST Bills) आणि इतर कायदेशीर परवान्यांची तपासणी करण्याची प्रक्रिया पोलिसांनी युद्धपातळीवर सुरू केली.
या प्रकरणात आयकर विभागाची एन्ट्री
एवढ्या मोठ्या प्रमाणात बेहिशोबी रक्कम आणि चांदी आढळून आल्याने या प्रकरणात आता प्राप्तिकर विभागाची एन्ट्री झाली आहे. आयकर विभागाचे विशेष पथक कराडला दाखल झाले आहे. मिळालेला मुद्देमाल अधिकृत आहे की हवाला किंवा काळ्या पैशांशी संबंधित आहे? याची कसून खातरजमा करण्याचे काम पोलीस आणि आयकर विभागाकडून संयुक्तपणे सुरू आहे. पोलिसांनी अद्याप याबाबत अधिकृत घोषणा केली नसली, तरी या कारवाईच्या बातमीने व्यापारी वर्गात आणि राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.
Nasrapur Case : नसरापूर अत्याचारप्रकरणी मोठी अपडेट, अंतिम युक्तिवाद पुर्ण; पुढील आठवड्यात…
Ans: पोलिसांनी सुमारे साडेतीन कोटी रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
Ans: ट्रॅव्हल्समधून 150 किलो चांदी आणि 40 लाख रुपयांची रोकड आढळून आली.
Ans: कराड पोलीस आणि आयकर विभागाकडून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.






