Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime: पत्नी, सासूच्या त्रासाला कंटाळून युवकाने उचलले टोकाचे पाऊल

पुणे, रामवाडीत येथील नामांकित कंपनीच्या पार्किंगमध्ये सहकारी तरुणीवर धारधार हत्याराने केलेल्या हल्यात गंभीर जखमी झालेल्या तरूणीचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jan 08, 2025 | 01:42 PM
Pune Crime: पत्नी, सासूच्या त्रासाला कंटाळून युवकाने उचलले टोकाचे पाऊल
Follow Us
Close
Follow Us:

पुणे: पत्नी, सासू आणि मेहुणीच्या त्रासाला कंटाळून 32 वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. प्रफुल्ल हरिश्चंद्र कदम असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे. पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात हा प्रकार घडला. या प्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त करण्याच्या आरोपावरून पोलिसांनी प्रफुल्लची पत्नी, सासू आणि मेहुणीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

प्रफुल्ल कदमच्या वडील, हरिश्चंद्र गोविंद कदम (वय 60), यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. हरिश्चंद्र कदम यांच्या तक्रारीनुसार, प्रफुल्लची पत्नी, सासू आणि मेहुणी गेल्या काही दिवसांपासून प्रफुल्लला मानसिक त्रास देत होते. तुम्ही आम्हाला फसवले, तू मेला तर मी दुसरे लग्न करून सुखी राहील, असंही ते म्हणत होते. या सर्व त्रासाला कंटाळून प्रफुल्लने 31 डिसेंबरला घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्यांनी एक चिठ्ठी लिहिली होती, ज्यात पत्नी, सासू आणि मेहुणीच्या छळामुळे आत्महत्या करत असल्याचे नमूद केले होते.

पोलिसांनी प्रफुल्लच्या कुटुंबीयांची तक्रार स्वीकारली असून, पोलीस उपनिरीक्षक पद्मराज गंपले यांचा तपास सुरू आहे. विश्रांतवाडी पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल संबंधित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

NCP Politics: राज्यात पुन्हा फोडाफोडीचं राजकारण? अजित पवारांची शरद पवार गटाच्या खासदारांना ‘ऑफर’

मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय

दुसरीकडे पुण्यतील सिंहगड रस्त्यावरील धायरी  भागात मसाज पार्लरच्या नावाखाली चालविण्यात येणाऱ्या वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश करण्यात आला आहे.  गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने छापा टाकून या प्रकरणाचा भांडाफोड केला. या कारवाईत मसाज पार्लर चालक महिलेला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी 32 वर्षीय  जोयश्री नरेन तामोली (नांदेड फाटा, सिंहगड रस्ता; मूळ रा. बामुनगाव, जि. जोराहाट, आसाम) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेतील सहायक पोलीस फौजदार छाया जाधव यांनी नांदेड सिटी (सिंहगड रस्ता) पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

अशी उघड झाली वेश्याव्यवसायाची पोलखोल
गुन्हे शाखेला मिळालेल्या माहितीनुसार, सिंहगड रस्त्यावरील “डे स्पा” या मसाज पार्लरमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती कळाली होती.  त्यानंतर पोलिसांच्या पथकाने मंगळवारी सायंकाळी मसाज पार्लरवर छापा टाकत कारवाई केली.  या कारवाईत पार्लरमधून काही तरुणींना ताब्यात घेण्यात आले आले आहे. पोलिसांनी केलेल्या चौकशीत, या तरूणींना पैशांचे आमिष दाखवून वेश्याव्यवसाय करण्यास प्रवृत्त करण्यात आले होते.   या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक भोस करत आहेत. ही घटना परिसरात खळबळ निर्माण करणारी ठरली आहे.

राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी शिकवणं राहणार बंधनकारक; शालेय शिक्षण मंत्र्यांनी

आर्थिक व्यवहारातून तरुणीची धारदार शस्त्राने वार करुन हत्या

पुण्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. कर्जाच्या वादातून बीपीओमध्ये काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याची तिच्या सहकाऱ्याने हत्या केली. धारदार शस्त्राने केलेल्या हल्ल्यात जखमी झालेल्या महिला बीपीओ कर्मचारीचा रुग्णालयात मृत्यू झाला. पुण्यात मंगळवारी (7 जानेवारी) सायंकाळी ही घटना घडली. बहुराष्ट्रीय बीपीओ कंपनीच्या पार्किंगमध्ये घडलेल्या या घटनेनंतर सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून महिलेचा तिच्या कार्यलयातील पुरुष सहकाऱ्याने तिच्यावर अनेकवेळा हल्ला केल्याचे समोर आले आहे. यामध्ये तिच्या हाताला गंभीर दुखापत झाली. यामुळे महिलेचा मृत्यू झाला.

पुणे, रामवाडीत येथील नामांकित कंपनीच्या पार्किंगमध्ये सहकारी तरुणीवर धारधार हत्याराने केलेल्या हल्यात गंभीर जखमी झालेल्या तरूणीचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. आर्थिक वादातून हा हल्ला करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. दोघेही या कंपनीत अंकाऊटिंग विभागात काम करत होते. साडे चार लाख रुपये तरुणीला हात उसने म्हणून दिले होते. त्यावरून त्यांच्यात वादावादी होती.

चहा पिण्याची सर्वात खराब वेळ, 99% लोक करतात ‘ही’ चूक, शरीराचा होईल सांगाडा

Web Title: Pune crime tired of being harassed by his wife and mother in law the young man took an extreme step nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 08, 2025 | 01:42 PM

Topics:  

  • crime news

संबंधित बातम्या

कामगाराने कंपनीत दिलेले अन्न खाल्ले, नंतर घरी गेला अन् काही तासांत मृत्यू झाला
1

कामगाराने कंपनीत दिलेले अन्न खाल्ले, नंतर घरी गेला अन् काही तासांत मृत्यू झाला

Vasai News : खानावळीच्या पैशासाठी सहकाऱ्याचा खून;आरोपीला गुजरातमधून केली अटक
2

Vasai News : खानावळीच्या पैशासाठी सहकाऱ्याचा खून;आरोपीला गुजरातमधून केली अटक

पुणे-नाशिक महामार्गावरील पेट्रोल पंपावर दरोडा; चोरट्यांनी हवेत गोळीबार केला अन्…
3

पुणे-नाशिक महामार्गावरील पेट्रोल पंपावर दरोडा; चोरट्यांनी हवेत गोळीबार केला अन्…

Gautami Patil: गौतमीला उचलायचं की…? पाटलांच्या ‘त्या’ Video वर रोहित पवार म्हणाले, “कार्यकर्त्यांचं किती…”
4

Gautami Patil: गौतमीला उचलायचं की…? पाटलांच्या ‘त्या’ Video वर रोहित पवार म्हणाले, “कार्यकर्त्यांचं किती…”

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.