Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुणे पोलिसांची मोठी कारवाई; तडीपार गुंडासह साथीदारांना ठोकल्या बेड्या

पुणे शहर तसेच जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलेल्या गुंडाला जेरबंद करून भारती विद्यापीठ पोलिसांनी देशी बनावटीच्या पिस्तुल, मेफेड्रोन आणि कोयता जप्त केला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 26, 2024 | 12:30 AM
पुणे पोलिसांची मोठी कारवाई; तडीपार गुंडासह साथीदारांना ठोकल्या बेड्या

पुणे पोलिसांची मोठी कारवाई; तडीपार गुंडासह साथीदारांना ठोकल्या बेड्या

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : पुणे शहर तसेच जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलेल्या गुंडाला जेरबंद करून भारती विद्यापीठ पोलिसांनी देशी बनावटीच्या पिस्तुल, मेफेड्रोन आणि कोयता जप्त केला आहे. कात्रज भागात ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी गुंडाबरोबर असलेल्या साथीदारांना अटक करण्यात आली आहे. तौसिफ अमिर सय्यद उर्फ चुहा (वय २८, रा. संतोषनगर, कात्रज) त्याचे साथीदार सूरज राजेंद्र जाधव (वय ३५, रा. रुपचंद तालीमसमोर, करमाळा, जि. सोलापूर), मार्कस डेव्हीड इसार (वय २९, रा. गगनगिरी मंगल कार्यालयाजवळ, धानोरी, विश्रांतवाडी), कुणाल कमलेश जाधव (वय २५, रा. प्रसाद रेसीडन्सी, सोमनाथनगर, वडगाव शेरी ) यांना अटक करण्यात आली.

तर त्यांच्याबरोबर असलेला साथीदार जनाब (रा. लष्कर) पसार झाला असून, त्याचा शोध घेण्यात येत आहे. पोलीस शिपाई धनाजी धोत्रे यांनी याबाबत भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक शरद झिने यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मोहन कळमकर व त्यांच्या पथकाने केली आहे.

हे सुद्धा वाचा : पुण्यात मोठा दरोडा टाकण्याचा प्लॅन फसला; आरोपींना पोलिसांनी केली अटक

तौसिफ सय्यद याच्यावर गंभीर स्वरुपाचे गु्न्हे दाखल आहेत. त्याच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई केली होती. सय्यदला गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात शहर आणि जिल्ह्यातून तडीपार करण्याचे आदेश देण्यात आले होते. सय्यद आणि साथीदार कात्रज भागात दरोडा घालण्याच्या तयारीत असल्याची माहिती भारती विद्यापीठ पोलिसांना मिळाली. पोलिसांनी संतोषनगर परिसरात सापळा लावला. तसेच, छापा कारवाई करून त्याला पकडले. त्याच्याबरोबर असलेले साथीदार जाधव, इसार, जाधव यांना ताब्यात घेतले. तर, साथीदार जनाब पसार झाला. सय्यद याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल, काडतूस, मेफेड्रोन, वजन काटा, स्क्रू ड्रायव्हर असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पुढील तपास उपनिरीक्षक मोहन कळमकर हे करत आहेत.

सदाशिव पेठेत भरदुपारी फ्लॅट फोडला

पुणे शहरात घरफोड्या करणाऱ्या चोरट्यांनी उच्छाद घातला असून, सदाशिव पेठेत भरदुपारी अवघ्या पाऊण तासात बंद फ्लॅट फोडत १८०० अमेरिकन डॉलर चोरून नेले आहेत. या सोबतच मुकूंदनगरमध्ये देखील फ्लॅट फोडण्यात आला आहे. दोन घटनांत चार लाखांचा ऐवज चोरून चोरट्यांनी पोबारा केला आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये चोरट्यांनी बंद फ्लॅट फोडण्याचा धडाका लावला असून, या चोरट्यांचा थांगपत्ता मात्र पोलिसांना लागत नसल्याचे दिसत आहे. याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात ६२ वर्षीय ज्येष्ठ महिलेने तक्रार दिली आहे. त्यानूसार, दोन अनोळखी चोरट्यांवर गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Pune police has arrested tadipar gangster along with his accomplices nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 26, 2024 | 12:30 AM

Topics:  

  • maharashtra
  • Pune Crime

संबंधित बातम्या

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय
1

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे दोन न्यायाधीशांना केलं बडतर्फ, नेमकं प्रकरण काय?
2

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे दोन न्यायाधीशांना केलं बडतर्फ, नेमकं प्रकरण काय?

तुमचा देखील होईल सन्मान! Navabharat Influencer Summit 2025 च्या नॉमिनेशनची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर
3

तुमचा देखील होईल सन्मान! Navabharat Influencer Summit 2025 च्या नॉमिनेशनची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर

चंद्रकांत पाटलांनी आयोगाच्या घोषणेआधीच फोडलं वेळापत्रक; आगामी निवडणुकीबाबत थेट…
4

चंद्रकांत पाटलांनी आयोगाच्या घोषणेआधीच फोडलं वेळापत्रक; आगामी निवडणुकीबाबत थेट…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.