Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 27 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रेमप्रकरणाच्या संशयावरुन तरुणाला बेदम मारहाण; इमारतीच्या तळमजल्यावर नेले अन्…

खडक पोलिस ठाण्याच्या हद्दीत टोळक्याने तरुणाला प्रेमप्रकरणाच्या संशयावरुन बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. भवानी पेठेतील कासेवाडी भागात ही घटना घडली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 24, 2026 | 08:00 PM
प्रेमप्रकरणाच्या संशयावरुन तरुणाला बेदम मारहाण; इमारतीच्या तळमजल्यावर नेले अन्...

प्रेमप्रकरणाच्या संशयावरुन तरुणाला बेदम मारहाण; इमारतीच्या तळमजल्यावर नेले अन्...

Follow Us
Follow Us:
  • प्रेमप्रकरणाच्या संशयावरुन तरुणाला बेदम मारहाण
  • पुण्यातील धक्कादायक घटना
  • पोलिसांनी एकाला ठोकल्या बेड्या
पुणे : राज्यासह देशभरात गुन्हेगारी वाढली आहे. दररोज वेगवेगळ्या भागातून खून, खुनाचा प्रयत्न, लुटमार यासारख्या घटना घडत आहेत. वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे नागरिकांमध्ये भिती पसरत आहे. अशातच आता पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. खडक पोलिस ठाण्याच्या हद्दीत टोळक्याने तरुणाला प्रेमप्रकरणाच्या संशयावरुन बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. भवानी पेठेतील कासेवाडी भागात ही घटना घडली आहे. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून, साथीदारांवर गु्न्हा दाखल करण्यात आला आहे.

 

अमन सुभाष मोरे (वय २६, सध्या रा. दत्तवाडी, मूळ रा. कासेवाडी, भवानी पेठ) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी अल्तमश नासीर शेख (रा. कासेवाडी, भवानी पेठ) याला अटक केली आहे. त्याच्याबरोबर असलेल्या साथीदारांवर गु्न्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, अमन याचे एका तरुणीशी प्रेमसंबंध असल्याचा संशय शेख याला होता. अमन आणि त्याची मैत्रीण हे २३ फेब्रुवारी रोजी सिंहगडावर फिरायाल निघाले होते. अमनच्या मैत्रिणीचे डोके दुखत असल्याने ते एका औषध विक्री दुकानात गेले. डोके दुखीवर त्यांनी गोळ्या घेतल्या. त्यानंतर आरोपी शेख आणि आठ ते दहा साथीदार तेथे आले. ‘तू कोठे चालला आहे. आमच्या मुलीसोबत मैत्री करायची तुझी लायकी आहे का’, अशी विचारणा करुन अमनला दुचाकीवरुन भवानी पेठेतील कासेवाडी परिसरात नेले.

तेथील एका इमारतीच्या तळमजल्यावर अमनला गजाने बेदम मारहाण केली. जखमी अवस्थेतील अमनला महात्मा फुले स्मारक परिसरात सोडून आरोपी शेख आणि साथीदार पसार झाले. जखमी अवस्थेतील अमनने खडक पोलिस ठाणे गाठले. त्याने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रात्री उशीरा आरोपी शेख याला अटक करण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक कांबळे तपास करत आहेत.

हे सुद्धा वाचा : बारामतीत हॉटेल बिलावरून वाद; कुऱ्हाड अन् लोखंडी रॉडने एकावर जीवघेणा हल्ला

तिघांनी केला तरुणाचा खून

बिबवेवाडी परिसरात कटींग दुकानात काम केल्‍यानंतर गावाला जातो अस म्हणून स्वतःचे सलूनचे दुकान सुरू करणाऱ्या तरूणाचा तिघांनी मिळून खून केल्‍याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी खून करणाऱ्या तिघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्‍या आहेत. मोहमद्द शमी (वय २५, अप्पर जुना बसस्‍टॉप, बिबवेवाडी मुळ रा. प्रयागराज, उत्‍तरप्रदेश) असे खून झालेल्‍या तरूणाचे नाव आहे. याबाबत मोहम्‍मद सलमान फिरोज कुरेशी (वय १८, रा. साई स्मार्ट, तिरूपती भेळ शेजारी, जुना बसस्‍टॉप, बिबवेवाडी) याने बिबवेववाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. या प्रकरणी खुन करणारे आरोपी सौरभ चोरगे, अनिकेत सराटे, रोहित बालशंकर या तिघांना अटक करण्यात आली आहे. हा प्रकार गुरूवारी सायंकाळी घडला आहे.

Web Title: A shocking incident of a young man being brutally beaten has taken place in pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 24, 2026 | 08:00 PM

Topics:  

  • crime news
  • Pune Crime
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

Pune Crime: पैशांमुळे दुरावलेली मैत्री १० वर्षांनी पुन्हा जुळली; ४.८५ लाखांच्या वादावर अडीच लाखांत तडजोड
1

Pune Crime: पैशांमुळे दुरावलेली मैत्री १० वर्षांनी पुन्हा जुळली; ४.८५ लाखांच्या वादावर अडीच लाखांत तडजोड

COEP राडाप्रकरणी महत्त्वाची अपडेट; काँग्रेस-एनएसयूआय कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल, मीडियाविरोधातही तक्रार
2

COEP राडाप्रकरणी महत्त्वाची अपडेट; काँग्रेस-एनएसयूआय कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल, मीडियाविरोधातही तक्रार

जन्माला घातलं, पण सांभाळलं नाही! आई-वडिलांनीच केला ५४.५० लाखांत पोटच्या बाळाचा सौदा!
3

जन्माला घातलं, पण सांभाळलं नाही! आई-वडिलांनीच केला ५४.५० लाखांत पोटच्या बाळाचा सौदा!

संतापजनक ! वेळेत उपचार न मिळाल्याने वाटेतच झाली महिलेची प्रसूती; ग्रामीण रुग्णालयाचा कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर
4

संतापजनक ! वेळेत उपचार न मिळाल्याने वाटेतच झाली महिलेची प्रसूती; ग्रामीण रुग्णालयाचा कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.