Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

व्यावसायिक गॅसचा काळाबाजार उघड; सिंहगड रोड पोलिसांनी ७२ सिलेंडर केले जप्त

व्यावसायिक गॅसचा काळाबाजार पुन्हा एकदा समोर आला असून, सिंहगड रोड पोलिसांनी छापा कारवाई करून तब्बल ७२ गॅसचे सिलेंडर पकडले आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Dec 12, 2024 | 04:29 PM
व्यावसायिक गॅसचा काळाबाजार उघड; सिंहगड रोड पोलिसांनी ७२ सिलेंडर केले जप्त

व्यावसायिक गॅसचा काळाबाजार उघड; सिंहगड रोड पोलिसांनी ७२ सिलेंडर केले जप्त

Follow Us
Close
Follow Us:

पुणे/अक्षय फाटक : व्यावसायिक गॅसचा काळाबाजार पुन्हा एकदा समोर आला असून, सिंहगड रोड पोलिसांनी छापा कारवाई करून तब्बल ७२ गॅसचे सिलेंडर पकडले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली असून, त्याच्याकडे कसून चौकशी केली जात आहे. पोलिसांनी टेम्पो तसेच गॅसचे सिलेंडर असा दहा लाखांचा ऐवज जप्त केला आहे.

याप्रकरणी पोलिसांनी सोमनाथ लहु भोजने (वय ३१, रा. वडगाव बुद्रुक, मुळ. तुळजापूर) याला अटक केली आहे. तर, सिलेंडर विक्री करण्यास देणाऱ्या विकाश धोंडाप्पा आकळे (रा. वडगाव बुद्रुक) याच्यावर गुन्हा नोंदवला आहे. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांत भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २८७, २८८, ३ (५) सह जिवनावश्यक वस्तुचा कायदा १९५५ चे कलम ३, ७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक परिमंडळ तीनचे उपायुक्त संभाजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक दिलीप दाईंगडे, उपनिरीक्षक संतोष भांडवलकर, देवा चव्हाण यांच्या पथकाने केली आहे.

हे सुद्धा वाचा : शेकोटीला शेकत बसलेल्या तरुणाला दांडक्याने मारहाण; पळून जाताना पाठलाग केला अन्…

पुणे शहरात व्यावसायिक तसेच घरघुती गॅसचा काळा बाजार सातत्याने होत असल्याचे दिसत आहे. घरघुती गॅसमधून व्यावसायिकांना अवैधरित्या तो इतर टाक्यांमध्ये टाकून गॅस विकला जात आहे. दरम्यान, सिंहगड रोड पोलीस ठाण्यातील तपास पथकाचे उपनिरीक्षक संतोष भांडवलकर व त्यांचे पथक हद्दीत गस्त घालत होते. तेव्हा त्यांना माहिती मिळाली की, वडगाव भाजी मंडई येथून गोयल गंगाकडे जाणाऱ्या रस्त्यावर सिलबंद व्यावसायिक गॅस सिलेंडरची अवैधरित्या विक्री होत आहे. त्यानूसार, लागलीच उपनिरीक्षक भांडवलकर व त्यांच्या पथकाने येथे धाव घेतली. सापळा रचून सोमनाथ याला ताब्यात घेतले. त्यावेळी तो टेम्पोत सिलेंडर घेऊन विक्री करत असल्याचे सांगितले. अधिक चौकशीत त्याला या सिलेंडर मालक विकास आकळे यांनी दिल्याचे सांगितले आहे. पोलिसांनी एचपी तसेच भारत कंपनीचे तब्बल ७२ गॅस सिलेंडर आणि टेम्पो असा १० लाख २८ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक संतोष भांडवलकर करत आहेत.

जैन मंदिरात चोऱ्या करणारा अटकेत

जैन साधकांचा वेष परिधान करून जैन मंदिरात घुसून चोऱ्या करणाऱ्या एकाला स्वारगेट पोलिसांनी जेरबंद केले. त्याने पुण्यासह राज्यातील घाटकोपर वाई, चिखली, डोंबिवली अशा ठिकाणी देखील चोऱ्या केल्याची माहिती समोर आली असून, पैशांची चणचण भासत असल्याने चोऱ्या केल्याचे समोर आले आहे. त्याच्याकडून सव्वा चार लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. नरेश आगरचंद जैन (वय ४५, रा. बोम्बे चाळ, सी.पी. टैंक गिरगाव, व्ही. पी. रोड, मुंबई) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. ही कारवाई परिमंडळ दोनच्या उपायुक्त स्मार्तना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरिक्षक युवराज नांद्रे, पोलीस अंमलदार शंकर संपते, सागर केकाण, कुंदन शिंदे व त्यांच्या पथकाने केली आहे.

Web Title: Pune police has uncovered the black market of commercial gas and seized 72 cylinders nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 12, 2024 | 04:19 PM

Topics:  

  • Pune Crime

संबंधित बातम्या

Crime News : शेअर मार्केटमध्ये मोठ्या परताव्याचे आमिष; कोथरूडमधील एकाची 71 लाखांची फसवणूक
1

Crime News : शेअर मार्केटमध्ये मोठ्या परताव्याचे आमिष; कोथरूडमधील एकाची 71 लाखांची फसवणूक

पुण्यात अक्षय म्हस्केवर गोळीबार करणार्‍या पाच जणांना ठोकल्या बेड्या; ‘या’ परिसरातून घेतले ताब्यात
2

पुण्यात अक्षय म्हस्केवर गोळीबार करणार्‍या पाच जणांना ठोकल्या बेड्या; ‘या’ परिसरातून घेतले ताब्यात

Pune Crime:“तु माझी नाही झालीस तर कोणाचीच नाही”; पुण्यात तरुणीवर अॅसिड हल्ला, आरोपीला कर्नाटकातून अटक
3

Pune Crime:“तु माझी नाही झालीस तर कोणाचीच नाही”; पुण्यात तरुणीवर अॅसिड हल्ला, आरोपीला कर्नाटकातून अटक

Pune Gang War: पुण्यात गँगवॉर पुन्हा पेटलं! बालाजीनगरात गोळीबार करून अक्षय म्हस्केची हत्या
4

Pune Gang War: पुण्यात गँगवॉर पुन्हा पेटलं! बालाजीनगरात गोळीबार करून अक्षय म्हस्केची हत्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.