Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 13 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nilesh Chavan Arrest: वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील निलेश चव्हाणला पोलीस कोठडी, कोर्टात नेमकं काय घडलं?

Vaishnavi Hagawane dowry death case: वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील आरोपी निलेश चव्हाण याला पोलीस कोठडी मिळाली आहे. त्याला ३ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश शिवाजीनगर न्यायालयाने दिले.

  • By श्वेता झगडे
Updated On: May 31, 2025 | 11:41 AM
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील निलेश चव्हाणला पोलीस कोठडी (फोटो सौजन्य-X)

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील निलेश चव्हाणला पोलीस कोठडी (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Follow Us:

Nilesh Chavan Aide in Vaishnavi Case : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील आरोपी निलेश चव्हाण याला पोलीस कोठडी मिळाली आहे. त्याला ३ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश शिवाजीनगर न्यायालयाने दिले. शुक्रवारी पिंपरी चिंचवड पोलिसांनी त्याला नेपाळमध्ये अटक करुन पुण्यात आणले होते.

दरम्यान गेल्या 10 दिवसापासून फरार असलेल्या वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील निलेश चव्हाणला नेपाळमधून बेड्या ठोकल्या आहेत. त्यानंतर आज (31 मे) त्याला कार्टात हजर करण्यात आलं होतं, त्यावेळी सरकारी वकिलांनी केलेल्या युक्तीवादानंतर कोर्टाने त्याला 3 जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. वैष्णवीचं बाळ निलेशने कोणत्या अधिकरावर घेतलं, तसंच त्याच्याकडून पिस्तूल आणि मोबाईल डेटा जप्त करायचा आहे, यासाठी त्याची कोठडी पोलिसांनी मागून घेतली आहे.

हगवणे बंधुंना पिस्तुलाचा परवाना कसा मिळाला? वाचा संपूर्ण घटनाक्रम

जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवल्याचे आरोप

नीलेश चव्हाण बद्दल आता अनेक धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत. निलेश चव्हाण यांच्या पत्नीनेही त्यांच्याविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली होती, ज्यामध्ये त्यांच्यावर छळ आणि जबरदस्तीने लैगिंक संबंध ठेवल्याचे गंभीर आरोप करण्यात आले होते. व्यवसायाने बांधकाम व्यावसायिक असलेल्या निलेश चव्हाण यांचा पोकेलिन मशीन विकण्याचा व्यवसाय देखील आहे. निलेश चव्हाण याने त्यांच्या पत्नीचा छुप्या कॅमेऱ्याने आक्षेपार्ह व्हिडिओ बनवल्याची माहिती समोर आली आहे. निलेश चव्हाण यांनी त्यांच्या बेडरूममधील पंखे आणि एसीवर स्पाय कॅमेरे लावले होते. त्यांच्या पत्नीला संशय आल्यावर त्यांनी निलेशला विचारले. त्यावेळी निलेश उत्तर देण्याचे टाळत होता. नंतर जेव्हा निलेशच्या पत्नीने त्यांचा लॅपटॉप तपासला तेव्हा त्यांना त्यात त्याचे लैंगिक संबंधाचे अनेक व्हिडिओ आढळले. याशिवाय निलेशच्या पत्नीला त्यांचे इतर काही मुलींसोबतचे व्हिडिओ देखील आढळले.

हगवणे कुटुंबाशी काय संबंध?

मिळालेल्या माहितीनुसार, निलेश हा शशांक हगवणेची बहीण करिश्मा हगवणेचा मित्र असल्याचा आरोप आहे. तो शशांक आणि वैष्णवी यांच्यातील वादातही अनेकदा सहभागी असायचा. तो शशांकचा व्यावसायिक भागीदार असल्याचेही म्हटले जाते. तो अनेकदा कौटुंबिक वादात अडकत असे. निलेशचे हे वर्तन उघडकीस आल्यानंतर कुटुंबातील सदस्यांनी सुनेला पाठिंबा देण्याऐवजी त्याचा छळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर कंटाळून निलेशची पत्नी घराबाहेर पडली. तिने पोलिसात तक्रार केली. या तक्रारीच्या आधारे २०२२ मध्ये निलेशविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. नंतर मुंबई उच्च न्यायालयाने निलेश चव्हाणला अटकपूर्व जामीन मंजूर केला. वैष्णवीचे कुटुंब मुलाचा ताबा घेण्यासाठी पोहोचले तेव्हा निलेश त्यांना पिस्तूल दाखवून धमकावत असे. या प्रकरणात पोलिसांनी एफआयआर नोंदवला आहे.

अखेर निलेश चव्हाणला नेपाळमध्ये अटक, कसा पोहोचला नेपाळ?

Web Title: Pune vaishnavi hagavane case accused nilesh chavan remanded in police custody

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 31, 2025 | 11:41 AM

Topics:  

  • Nilesh Chavan
  • Pune
  • Vaishnavi Hagavane

संबंधित बातम्या

Satara News: रस्ते खड्ड्यात अन् टोलवसुली सुरूच!; साताऱ्यात १९ ज्येष्ठ नागरिक संघटना आक्रमक
1

Satara News: रस्ते खड्ड्यात अन् टोलवसुली सुरूच!; साताऱ्यात १९ ज्येष्ठ नागरिक संघटना आक्रमक

Pune News: स्वातंत्र्याच्या ७९ वर्षांनंतरही मावळात रस्त्यासाठी संघर्ष; आजारी रुग्णाला झोळीतून नेण्याची वेळ
2

Pune News: स्वातंत्र्याच्या ७९ वर्षांनंतरही मावळात रस्त्यासाठी संघर्ष; आजारी रुग्णाला झोळीतून नेण्याची वेळ

Mumbai- Pune मार्गावरील प्रवाशांसाठी महत्त्वाची अपडेट! कनेक्टिंग लिंक 3 तासांसाठी राहणार बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग
3

Mumbai- Pune मार्गावरील प्रवाशांसाठी महत्त्वाची अपडेट! कनेक्टिंग लिंक 3 तासांसाठी राहणार बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग

Pune Crime: दारूसाठी आईकडे पैसे मागितले, नकार मिळताच मुलाने लोखंडी रॉडने आईची हत्या
4

Pune Crime: दारूसाठी आईकडे पैसे मागितले, नकार मिळताच मुलाने लोखंडी रॉडने आईची हत्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.