सध्या राज्यात वैष्णवी हगवणे प्रकरण चर्चेत आहे. वैष्णवीने हगवणेने आत्महत्या केली. तिच्या बाळाची हेळसांड करणाऱ्या निलेश चव्हाणला नेपाळमध्ये अटक करण्यात आली आहे. त्याला विमानाने पिंपरी चिंचवड पोलीस मध्यरात्री अडीच वाजता पुणे विमानतळावर पोहोचले. त्यानंतर थेरगाव रुग्णालयात वैद्यकीय चाचणी पूर्ण झाली आणि पहाटे 4 वाजता बावधन पोलिसांकडे त्याचा ताबा देण्यात आला. गेली दहा दिवस तो पोलिसांना गुंगारा देत होता. त्याने तीन राज्यातून प्रवास करत तो नेपाळमध्ये पोहोचला होता, तिथून पुन्हा एकदा भारत आणि नेपाळच्या सीमेवरील सोनालीत तो आला आणि तिथेच पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा आणि ऍन्टी गुंडा स्कॉडने बेड्या ठोकल्या. त्याचा ताबा पहाटे चार वाजता बावधन पोलिसांकडे देण्यात आला आहे.
Crime News: पाच हजारांची लाच घेणाऱ्या पोलिसावर गुन्हा दाखल; नेमके प्रकरण काय?
१० दिवसात ३ राज्यातून प्रवास
निलेश चव्हाण हा पुण्याहून रायगडला गेला, तिथून तो बायरोड दिल्लाला पोहोचला. दिल्लीला गेल्यानंतर तो बसने गोरखपूर युपीला गेला. उत्तर प्रदेशमधून मग तो नेपाळ बॉर्डर क्रॉस करून नेपाळमध्ये गेला, त्यानंतर काठमांडू आणि त्या परिसरामध्ये राहून परत तो बॉर्डर ओलांडून इकडे येण्याचा प्रयत्न करत होता. काल आपल्या देशाच्या हद्दीमध्ये आल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. निलेश चव्हाणच्या शोधासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांची चार पथकं तर पुणे पोलिसांची तीन पथकं राज्यात आणि देशातील इतर राज्यांमध्येही शोध घेत होते.
निलेश चव्हाणने पोलिसांना कसा दिला गुंगारा
पैशांची देवाण-घेवाण करताना ऑनलाईन ट्रान्झिक्शन केलं तर पोलिसांना लोकेशन कळेल, म्हणून पुणे सोडताना त्याने लाखो रुपयांची रोकड सोबत बाळगली. सोबत 4 ते 5 मोबाईल आणि सिम कार्ड बाळगले. काही मोबाईल आणि सिम कार्ड मित्रांकडून घेतले. नेपाळमध्ये ही स्वतंत्र सिम कार्ड खरेदी केलंप्रत्येकवेळी वेगवेगळ्या मोबाईलमध्ये वेगवेगळे सिमकार्ड घालून वापर करायचा. संपर्क साधण्यासाठी ऑनलाईन कॉलिंगचा आधार घेतला. ऑनलाईन कॉलिंगवरुन अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी काही वकिलांशी संवाद साधत होता. अनेकदा फोन बंद पडल्याचे बहाणे करत, त्या-त्या ठिकाणच्या व्यक्तींच्या फोनचा आणि वाय-फायचा वापर केला.सीसीटीव्हीच्या साह्याने पोलीस आपल्यापर्यंत पोहचतील, म्हणून स्वतःच्या ऐवजी खाजगी वाहनाने प्रवास केला.
निलेश चव्हाण याचा बांधकाम व्यवसाय असून, तो पोकलेन मशीनच्या व्यवसायातही सक्रिय आहे. वैष्णवी ची नणंद करिष्मा हगवणे हीचा मित्र म्हणून निलेश चव्हाण ओळखला जात होता. शशांक आणि वैष्णवी यांच्यातील कौटुंबिक वादात निलेश अनेकदा सहभागी असायचा. तर 20 मे रोजी वैष्णवीच्या नऊ महिन्यांच्या बाळाला घेण्यासाठी तिचे माहेरचे लोक कर्वेनगर भागातील निलेश चव्हाणच्या घरी गेले असता, निलेशने त्यांना पिस्तुल दाखवून घाबरवले आणि घराबाहेर हाकलून लावले, बाळाचा ताबा देण्यासही त्याने स्पष्ट नकार दिला होता. यानंतर कस्पटे कुटुंबीयांच्या (वैष्णवीच्या माहेरच्यांच्या) तक्रारीवरून निलेश चव्हाण याच्याविरोधात पुण्यातील वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कस्पटे कुटुंबीयांना धमकावल्याच्या आणि पिस्तुलाचा धाक दाखवत दहशत निर्माण केल्याच्या आरोपावरून हा गुन्हा दाखल करण्यात आला.
पुण्यात चोरट्यांचा धुमाकूळ, तीन फ्लॅट फोडले; तब्बल ‘इतक्या’ लाखांचा ऐवज चोरला