Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune ATS News : पुण्यात लपले दहशतवादी? कोंढवा भागामध्ये पोलिसांच्या तगडा बंदोबस्तात ATS ची मोठी कारवाई

Pune ATS Search Operation : पुण्यातील कोंढवा भागामध्ये ATS कडून सर्च ऑपरेशन करण्यात आले. यावेळी 19 ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Oct 09, 2025 | 12:30 PM
PuneATS Search Operation in kondhwa kothrud area with pune police crime news

PuneATS Search Operation in kondhwa kothrud area with pune police crime news

Follow Us
Close
Follow Us:
  • पुण्यामध्ये दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) कडून कारवाई
  • कोंढवा भागामध्ये एटीएसचे सर्च ऑपरेशन सुरु
  • पुणे पोलिसांचा तगडा बंदोबस्त

Pune ATS Search Operation : पुणे : विद्येचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या पुण्यामध्ये (Pune news) दहशतवादपुरक हालचाली होत असल्याचा संशय व्यक्त केला जातोय. शहरात काल रात्री पासून मोठ्या घडामोडी घडत आहे. शहरामधील कोंढव्यासह अनेक भागांमध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त असल्याचे दिसून आले आहे. कोंढवा भागामध्ये ATS चे सर्च ऑपरेशन सुरु असल्याचे दिसून आले आहे. पुणे पोलीस (Pune Police) आणि एटीएसचे हे संयुक्त ऑपरेशन सुरु असून यामुळे पुणे शहारामध्ये नेमकं काय सुरु आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे.

पुण्यातील कोंढवा भागात ATSचं सर्च ऑपरेशन सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. पुणे पोलिसांसह हे संयुक्त सर्च ऑपरेशन राबवण्यात आलं. महाराष्ट्र पोलिस, पुणे पोलिस आणि केंद्र सरकारच्या तपास यंत्रणा मिळून हे संयुक्त ऑपरेशन सुरू राबवले आहे. या सर्च ऑपरेशनदरम्यान काही संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची चौकशी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र या कारवाईमुळे पुण्यासह राज्यभरात मोठी खळबळ उडाली आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

कोंढवा परिसरात दहशतवादी संबंधांबद्दल माहिती मिळाल्यानंतर, दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) आणि पुणे पोलिसांनी १९ ठिकाणी छापे टाकले. अनेक संशयितांची चौकशी करण्यात आली आणि काही महत्त्वाचे पुरावे जप्त करण्यात आले. एका गुप्त माहितीवरून कारवाई करत, रात्री उशिरापासून पहाटेपर्यंत ही कारवाई सुरू राहिली. छापे टाकलेल्या घरांमधील लोकांची ओळख आणि पार्श्वभूमी तपासण्यात आली. पोलिस अधिकाऱ्यांनी हे प्रकरण राष्ट्रीय सुरक्षेचा विषय असल्याचे सांगितले आहे.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

बुधवार रात्रीपासूनच पुण्यातील कोंढवा भागाला छावणीचं स्वरूप आलं आहे. देशविरोधी कारवाई होणार असल्याचे इनपुट्स पुणे पोलिस आणि एटीएसला मिळाले होते. तसेच हीच कारवाई पिंपरी-चिंचवडमध्ये देखील सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. कोंढवा परिसरात संशयितांच्या हालचालींवर लक्ष केंद्रित केले होते. पुणे पोलिस आणि एटीएसचे जवळपास 350 कर्मचारी पुण्यातील कोंढवा भागात तैनात करण्यात आले आहेत. काही संशयितांना देखील ताब्यात घेण्यात आलं आहे. त्यांच्यापैकी काही जणांची कसून चौकशी देखील करण्यात आली.दोन वर्षांपूर्वी याच कोंढवा परिसरातून संशयित दहशतवाद्यांना अटक करण्यात आली होती.आणि पुन्हा एकदा देशविरोधी कारवाई करण्यासाठी काही संशयित तयारी असल्याते एटीएस व पोलिसांना समजताच ही कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे कोंढवा परिसराला छावणीचे स्वरुप आले आहे.

 

 

Web Title: Puneats search operation in kondhwa kothrud area with pune police crime news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 09, 2025 | 12:23 PM

Topics:  

  • ats
  • Pune Crime
  • pune news
  • Pune Police

संबंधित बातम्या

Pune Police : चोरट्यांवर पोलिसांचेच पांघरुन; खोटं बोलून ‘लायटर’ दाखवणाऱ्या पोलिसांचे पितळ पडले उघडे
1

Pune Police : चोरट्यांवर पोलिसांचेच पांघरुन; खोटं बोलून ‘लायटर’ दाखवणाऱ्या पोलिसांचे पितळ पडले उघडे

वडगाव शेरीतील राड्यात नवा ट्विस्ट; “मार खाणारा तो पठारे मी नव्हे” ॲड. सचिन पठारे यांचे स्पष्टीकरण
2

वडगाव शेरीतील राड्यात नवा ट्विस्ट; “मार खाणारा तो पठारे मी नव्हे” ॲड. सचिन पठारे यांचे स्पष्टीकरण

Pune Crime: घरात घुसून तलवारीने वार, महिला आणि मुलगा गंभीर जखमी; घटनेचा थरारक व्हिडिओ समोर
3

Pune Crime: घरात घुसून तलवारीने वार, महिला आणि मुलगा गंभीर जखमी; घटनेचा थरारक व्हिडिओ समोर

Pune : गनिमी कावा सेवा संघाकडून गौतमी पाटीलच्या निषेधार्थ आंदोलन!
4

Pune : गनिमी कावा सेवा संघाकडून गौतमी पाटीलच्या निषेधार्थ आंदोलन!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.