Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune ZP President : भोरला मिळणार ‘झेडपी’चे अध्यक्षपद? ‘या’ नेत्याचे नाव चर्चेत

पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर आता राजकीय घडामोडींचा केंद्रबिंदू अध्यक्षपदाच्या निवडीकडे सरकला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 14, 2026 | 05:47 PM
भोरला मिळणार 'झेडपी'चे अध्यक्षपद? 'या' नेत्याचे नाव चर्चेत

भोरला मिळणार 'झेडपी'चे अध्यक्षपद? 'या' नेत्याचे नाव चर्चेत

Follow Us
Follow Us:
  • भोरला झेडपी अध्यक्षपदाची संधी पुन्हा चर्चेत
  • ४४ वर्षांची प्रतीक्षा संपण्याची शक्यता
  • अंतिम निर्णयाबाबत उत्सुकता शिगेला
पुणे : पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर आता राजकीय घडामोडींचा केंद्रबिंदू अध्यक्षपदाच्या निवडीकडे सरकला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडे स्पष्ट बहुमत असल्याने अध्यक्षपद त्यांच्याच वाट्याला जाणे जवळपास निश्चित मानले जात असले, तरी पक्षांतर्गत इच्छुकांची संख्या मोठी असल्याने अंतिम निर्णयाबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या पार्श्वभूमीवर भोर तालुक्याचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

 

कामथडी-भोंगवली गटातून विजयी झालेले विक्रम खुटवड यांचे नाव अध्यक्षपदासाठी पुढे येत आहे. १९८२ नंतर भोर तालुक्याला जिल्हा परिषद अध्यक्षपदाची संधी मिळालेली नाही. त्यामुळे तब्बल ४४ वर्षांनंतर भोरचे स्वप्न पूर्ण होणार का, हा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. निवडणूक प्रचारादरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माजी उपाध्यक्ष रणजित शिवतरे यांना अध्यक्षपदाबाबत सकारात्मक संकेत दिल्याची चर्चा होती. मात्र, शिवतरे यांचा पराभव झाल्याने भोरची संधी पुन्हा हुकल्याचे मानले जात होते. त्याच वेळी खुटवड यांच्या विजयाने तालुक्याच्या आशा पुन्हा जाग्या झाल्या आहेत.

चार दशकांहून अधिक काळ भोरला पदाने दिली हुलकावणी

भोर तालुक्यातून १९८२ साली सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ नेते (स्व.) माधवराव टापरे यांनी जिल्हा परिषद अध्यक्षपद भूषविले होते. त्यानंतर चार दशकांहून अधिक काळ भोरला या पदाने हुलकावणी दिली आहे. त्यामुळे यंदा पक्षनेतृत्व अनुभव, निष्ठा आणि प्रादेशिक संतुलन या घटकांचा विचार करून भोरला संधी देणार का, याकडे लक्ष लागले आहे.

हे सुद्धा वाचा : सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यांची बैठक; ‘या’ तालुक्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र राहणार

इतर तालुक्यांतील दावेदारही झाले सक्रीय

पुमे जिल्ह्यातील इतर तालुक्यांतील दावेदारही सक्रीय झाले असून, अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठींकडेच राहणार आहे. मात्र, ४४ वर्षांची प्रतीक्षा आणि नव्या नेतृत्वाचा दावा या दोन मुद्द्यांमुळे भोरची बाजू यंदा अधिक ठळकपणे समोर येत आहे. अध्यक्षपदाची माळ अखेर कोणाच्या गळ्यात पडते, यावर जिल्ह्यातील सत्तासमीकरणांची दिशा ठरणार आहे.

होे सुद्धा वाचा : सर्वसाधारण सभेतील संकेतांचा सत्ताधाऱ्यांना विसर; विरोधी पक्षाच्या आक्षेपानंतर बिडकरांकडून दखल

Web Title: The name of a leader from bhor taluka is in the discussion for the post of pune zilla parishad president

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 14, 2026 | 05:47 PM

Topics:  

  • Ajit Pawar NCP
  • pune news
  • ZP Politics

संबंधित बातम्या

Pune News: पुणे रेल्वे स्थानकावर ‘हमाली’ महागली! जादा पैसे मागितल्यावर कुलींवर होणार कारवाई
1

Pune News: पुणे रेल्वे स्थानकावर ‘हमाली’ महागली! जादा पैसे मागितल्यावर कुलींवर होणार कारवाई

केतन अग्रवालच्या मृत्यूची खिल्ली उडवणे पडलं महागात; महिला डॉक्टरला पाच वर्षांसाठी केले निलंबित
2

केतन अग्रवालच्या मृत्यूची खिल्ली उडवणे पडलं महागात; महिला डॉक्टरला पाच वर्षांसाठी केले निलंबित

पुण्यातील रेडीमिक्स काँक्रीट प्रकल्पांवर प्रदूषण नियंत्रणासाठी कठोर अंमलबजावणी; पंकजा मुंडे
3

पुण्यातील रेडीमिक्स काँक्रीट प्रकल्पांवर प्रदूषण नियंत्रणासाठी कठोर अंमलबजावणी; पंकजा मुंडे

प्रार्थनेला आले यश! पुण्याच्या जलवाहिन्यांमध्ये अडकलेला रानगवा; झाली यशस्वी ‘घरवापसी’
4

प्रार्थनेला आले यश! पुण्याच्या जलवाहिन्यांमध्ये अडकलेला रानगवा; झाली यशस्वी ‘घरवापसी’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.