Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ग्रामसेवकास शिवीगाळ करणं एकाला भोवलं; कोर्टाने सुनावली ‘ही’ शिक्षा

ग्रामसेवक चंद्रवदन साळुंके यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार कराड विशेष न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाले होते. यासाठी अतिरिक्त सरकारी वरिल राजशेखर डी. परमाज यांनी सरकार पक्षातर्फे खटल्याचे संपूर्ण कामकाज पाहिले.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 31, 2025 | 11:49 AM
रणजित कासलेला कोर्टाचा दणका; तब्बल 'इतक्या' दिवसांची सुनावली कोठडी

रणजित कासलेला कोर्टाचा दणका; तब्बल 'इतक्या' दिवसांची सुनावली कोठडी

Follow Us
Close
Follow Us:

कराड : सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी मोरगिरी (ता. पाटण) येथील रविंद्र ज्ञानदेव मिसाळ यास दोन वर्षे सश्रम कारावास आणि सात हजार रुपये दंडाची शिक्षा कराड येथील विशेष न्यायाधीश दिलीप भा. पतंगे यांनी सुनावली.

ग्रामसेवक चंद्रवदन साळुंके यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार कराड विशेष न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाले होते. यासाठी अतिरिक्त सरकारी वरिल राजशेखर डी. परमाज यांनी सरकार पक्षातर्फे खटल्याचे संपूर्ण कामकाज पाहून सदरील गुन्हा दोष सिद्धीस नेला. सरकार पक्षातर्फे एकूण पाच साक्षीदार तपासण्यात आले. यापैकी फिर्यादी आणि तपासी अधिकारी उपविभागीय पोलीस अधिकारी पाटण विभाग विवेक लावंड यांची साक्ष महत्वपूर्ण ठरली.

दरम्यान, २४ मे २०२३ रोजी रोजी गावची ग्रामसभा होती. त्या ग्रामसभेला कोरम पूर्ण नसल्याने सभा तहकूब करून पुढे ढकलण्यात आल्यामुळे सर्व ग्रामस्थ निघून गेले. यानंतर फिर्यादी हे ग्रामपंचायतीसमोर उभे असताना आरोपी रविंद्र ज्ञानदेव मिसाळ हा येऊन ‘तुम्ही मला वित्त आयोगाची बँक स्टेटमेंट माहिती का दिली नाही’ असे विचारले. तेव्हा फिर्यादी यांनी वित्त आयोगाची माहिती तुमच्या अर्जात नमूद नाही, तरीही मी झेरॉक्स काढून देतो, असे सांगितले असता आरोपीने फिर्यादीच्या अंगावर धावून जावून त्यांच्या हातातील ग्रामसभा प्रोसेसिंग बुक हिसकावून त्यातील लिहिलेली पाने फाडली व त्यांना शिवीगाळ करून धक्काबुक्की केली.

दरम्यान, पाटण पोलीस ठाणे येथे याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील आर. डी. परमाज यांनी सरकारतर्फे एकूण २५ साक्षीदार तपासले. साक्षी व पुरावे ग्राह्य धरून महत्वाच्या धरून आरोपी रविंद्र मिसाळ यांना दोन वर्षे सश्रम कारावास व सात हजार रुपये दंड न भरल्यास सहा महिने साधा कारावास अशी शिक्षा सुनावली.

Web Title: Punishment for one who misbehave with gram sevak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 31, 2025 | 11:49 AM

Topics:  

  • Court Decision
  • Satara News

संबंधित बातम्या

दोन सख्ख्या भावांनी केली भावाची हत्या; न्यायालयाने आरोपी भावंडांना सुनावली ‘ही’ शिक्षा
1

दोन सख्ख्या भावांनी केली भावाची हत्या; न्यायालयाने आरोपी भावंडांना सुनावली ‘ही’ शिक्षा

मंत्री शंभूराज देसाई अनवाणी पोहचले शेतकऱ्यांच्या बांध्यावर; माणमधील आपत्तीग्रस्तांना मिळाला दिलासा
2

मंत्री शंभूराज देसाई अनवाणी पोहचले शेतकऱ्यांच्या बांध्यावर; माणमधील आपत्तीग्रस्तांना मिळाला दिलासा

‘पुनर्वसन मार्गी न लागल्यास जलसमाधी घेणार’; धरणग्रस्तांच्या बैठकीत इशारा
3

‘पुनर्वसन मार्गी न लागल्यास जलसमाधी घेणार’; धरणग्रस्तांच्या बैठकीत इशारा

Satara News : नुकसानग्रस्त भागांत पालकमंत्र्यांनी दिली भेट; पंचनामे करुन भरपाई देण्याचे थेट दिले आदेश
4

Satara News : नुकसानग्रस्त भागांत पालकमंत्र्यांनी दिली भेट; पंचनामे करुन भरपाई देण्याचे थेट दिले आदेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.