Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Punjab Crime: ‘घटस्फोट घेईन पण विद्यार्थ्याला सोडणार नाही’… 20 वर्षीय विद्यार्थ्याच्या प्रेमात पडली शिक्षिका; पतीची आत्महत्या

चंदीगडमध्ये 32 वर्षीय शिक्षिकेचे 20 वर्षीय विद्यार्थ्यासोबत प्रेमसंबंध असल्याचा आरोप समोर आल्यानंतर तिच्या पतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. मृताच्या भावाच्या तक्रारीवरून पत्नी आणि तिच्या कथित प्रियकराविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 27, 2026 | 08:38 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • 32 वर्षीय शिक्षिकेचे 20 वर्षीय विद्यार्थ्यासोबत प्रेमसंबंध असल्याचा आरोप.
  • पत्नी माहेरी गेल्यानंतर मानसिक तणावात पतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा आरोप.
  • पत्नी आणि विद्यार्थ्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा; पोलिस तपास सुरू.
पंजाब: पंजाब येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिला शिक्षिकेचे तिच्या २० वर्षीय विद्यार्थ्यांसोबत प्रेमसंबंध असल्याचे समोर आले आहे. ही बाब समजल्यानंतर तिच्या पतीने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. कुटुंबीयांनी महिला शिक्षिकेची समजूत घालण्याचा प्रयत्न केला मात्र तिने नवऱ्यासोबत घटस्फोट घेईल पण विध्यार्थ्याला सोडणार नाही. महिला या होणाऱ्या प्रयत्नांमुळे संतापली आणि ती आपल्या मुलीला घेऊन माहेरी गेली. यांनतर तिच्या पतीने गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून घडलेली घटना चंदीगड येथील आहे.

काय घडलं नेमकं?

या प्रकरणातील मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव मोनू असे आहे. तो आपल्या पत्नीसोबत मौलीजागरण येथील मौली कॉम्प्लेक्समध्ये राहत होता. मोनूचं लग्न आठवर्षांपूर्वी कोमलशी झाला. या दांपत्याला सहा वर्षांची एक मुलगी आहे.त्याची पत्नी कोमल घरी शिकवणी घ्यायची. अनेक विध्यार्थी तिच्याकडे शिकवायला येत असत.

सात आठवड्यांपूर्वी कुटुंबाला समजले की कोमलचे एका 20 वर्षांच्या विद्यार्थ्यासोबत अनैतिक संबंध आहेत. सनी नावाचा तो विद्यार्थी शिकवणीसाठी त्यांच्या घरी यायचा. जेव्हा हे दोघे एकटे असत, तेव्हा त्यांच्यात अनैतिक संबंध निर्माण झाले. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर कुटुंबाने कोमलला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र तिने नकार दिला आणि सांगितले की पतीला घटस्फोट द्यावा लागला तरीही ती विद्यार्थ्यासोबतचे संबंध तोडणार नाही. या वारंवार समजावल्यामुळे पत्नीला राग आला. ती आठवडाभरापूर्वी आपल्या सहा वर्षांच्या मुलीसह आणि सर्व सामान घेऊन माहेरी निघून गेली. ही बाब मोनूला कळताच तो मानसिक तणावाखाली गेला. तो कुटुंबीयांसमोर रडत असल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. त्यांनतर मोनूने टोकाचे पाऊल उचलले.

कशी उघडकीस आली घटना?

मोनूचा धाकटा भाऊ, कपिल, 22 जुलै रोजी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास कामावरून घरी परतला. तो घराच्या दुसऱ्या मजल्यावर गेला आणि त्याला त्याचा मोठा भाऊ मोनू छताच्या पंख्याला लटकलेला आढळला. त्याने तात्काळ आरडाओरडा केला. कुटुंबीयांनी त्याला तातडीने पंचकुला येथील सेक्टर 6 मधील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले, जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

गुन्हा दाखल

मोनूच्या भाऊ कपिल याच्या तक्रारीवरून पत्नी कोमल आणि तिचा प्रियकर सनी यांच्याविरुद्ध आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांचे म्हणणे आहे की, तक्रारीत आरोप आणि पुराव्यांची चौकशी सुरु आहे. तपासाच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल.

💡

Frequently Asked Questions

  • Que: हे प्रकरण कुठे घडले?

    Ans: चंदीगडमध्ये.

  • Que: मृताच्या कुटुंबीयांनी कोणावर आरोप केले आहेत?

    Ans: पत्नी आणि तिच्या कथित प्रियकरावर.

  • Que: पोलिसांनी कोणता गुन्हा दाखल केला आहे?

    Ans: आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा.

Web Title: Punjab crime ill get a divorce but wont leave the student teacher falls in love with 20 year old student husband commits suicide

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 27, 2026 | 08:38 AM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला
1

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई
2

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई

Social Media Donation Fraud: ‘जकात’च्या नावाखाली देणगीचा गोरखधंदा? SIOच्या नावाने आवाहन; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा
3

Social Media Donation Fraud: ‘जकात’च्या नावाखाली देणगीचा गोरखधंदा? SIOच्या नावाने आवाहन; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

ATM Card Scam: फेविक्विकने ATM कार्ड जाम करून खात्यातून पैसे लंपास; बिहारला पळणाऱ्या तिघांना धावत्या ट्रेनमधून अटक
4

ATM Card Scam: फेविक्विकने ATM कार्ड जाम करून खात्यातून पैसे लंपास; बिहारला पळणाऱ्या तिघांना धावत्या ट्रेनमधून अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.