Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 24 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kalyan Crime News: आधी चोरी, नंतर लांब पल्ल्याचे भाडे अन् मग पसार! कल्याण पोलिसांची चोरट्यावर कारवाई

Kalyan Crime News: कल्याणमध्ये रिक्षा चोरी करणाऱ्या सागर राठोड याला महात्मा फुले पोलिसांनी अटक केली असून, त्याच्याकडून चोरीच्या तीन रिक्षा हस्तगत करण्यात आल्या आहेत. नेतिवली परिसरात राहणारा सागर नशेच्या व्यसनासाठी पैशांची गरज भागवण्यासाठी रिक्षा चोरी करत असल्याचे तपासात समोर आले आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Oct 24, 2026 | 03:06 PM
आधी चोरी, नंतर लांब पल्ल्याचे भाडे अन् मग पसार! कल्याण पोलिसांची चोरट्यावर कारवाई

आधी चोरी, नंतर लांब पल्ल्याचे भाडे अन् मग पसार! कल्याण पोलिसांची चोरट्यावर कारवाई

Follow Us
Follow Us:
  • नशेच्या व्यसनासाठी रिक्षा चोरायचा
  • लांब पल्ल्याची भाडी मारून पसार!
  • कल्याणमध्ये चोरट्याला अटक
कल्याण : शहरात रिक्षा चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांकडून कारवाई सुरू असतानाच, महात्मा फुले पोलिसांनी रिक्षा चोरी करणाऱ्या एका आरोपीला अटक केली आहे. सागर राठोड असे या आरोपीचे नाव असून, त्याच्याकडून चोरीच्या तीन रिक्षा हस्तगत करण्यात आल्या आहेत. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला. (Kalyan Crime News)

नशेच्या व्यसनासाठी रिक्षा चोरीचा मार्ग

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्याणमधील नेतिवली परिसरात राहणारा सागर राठोड हा नशेच्या व्यसनाच्या आहारी गेला होता. नशा करण्यासाठी पैशांची गरज भासत असल्याने तो रिक्षा चोरी करत असल्याचे तपासात समोर आले आहे.

आधी महिलेवर गोळी झाडली, पोलिस मागावर असतानाच आरोपीने स्वतःला संपवले; अहिल्यानगरमधील घटनेनं खळबळ

रिक्षा चोरायचा, लांब पल्ल्याची भाडी मारायचा!

सागर रिक्षा चोरी केल्यानंतर त्या रिक्षांमधून लांब पल्ल्याची भाडी मारत असे. मात्र, चोरी उघडकीस येण्याची शक्यता जाणवल्यानंतर तो संबंधित रिक्षा वेगवेगळ्या ठिकाणी उभी करून तेथून पसार व्हायचा. त्यानंतर दुसरी रिक्षा चोरण्याचा प्रयत्न करत असल्याचे समोर आले आहे. अशा पद्धतीने तो पोलिसांना चकवा देण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, त्याच्या हालचाली सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याने पोलिसांना तपासात महत्त्वाचा धागा मिळाला.

सीसीटीव्ही फुटेजमुळे आरोपीचा छडा

सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या पथकाने तपासाची चक्रे फिरवली. त्यानंतर सागर राठोड याला अटक करण्यात आली. पोलिसांनी त्याच्याकडून चोरीच्या तीन रिक्षा हस्तगत केल्या आहेत. या कारवाईमुळे रिक्षा चोरीच्या प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. चोरीच्या रिक्षांचा वापर करून लांब पल्ल्याची भाडी मारल्यानंतर त्या सोडून देण्याची त्याची पद्धत तपासातून समोर आली आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या नेतृत्वाखाली कारवाई

महात्मा फुले पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बलरामसिंग परदेशी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अधिकारी विकास मडके आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, आरोपीने आणखी काही रिक्षा चोरल्या आहेत का, तसेच या चोरीच्या घटनांमध्ये इतर कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत.

वैजापुरात चोरट्यांनी एकाच रात्रीत फोडली चार दुकाने; मुरारी पार्क, लाडगाव रोड परिसरात धुमाकूळ

💡

Frequently Asked Questions

  • Que: कल्याणमध्ये रिक्षा चोरी प्रकरणात कोणाला अटक करण्यात आली?

    Ans: कल्याणमधील नेतिवली परिसरात राहणाऱ्या सागर राठोड याला महात्मा फुले पोलिसांनी रिक्षा चोरी प्रकरणात अटक केली.

  • Que: आरोपीकडून किती चोरीच्या रिक्षा हस्तगत करण्यात आल्या?

    Ans: पोलिसांनी आरोपी सागर राठोड याच्याकडून चोरीच्या तीन रिक्षा हस्तगत केल्या आहेत.

  • Que: कल्याणमधील रिक्षा चोरी प्रकरणाचा उलगडा कसा झाला?

    Ans: सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या हालचालींच्या आधारे पोलिसांनी तपास केला. महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या पथकाने कारवाई करत आरोपीला अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे.

Web Title: Kalyan auto rickshaw theft accused arrested three stolen rickshaws recovered sz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 24, 2026 | 03:06 PM

Topics:  

  • crime
  • kalyan
  • police

संबंधित बातम्या

Lawrence Bishnoi चा कट्टर शत्रू ते मोस्ट वॉन्टेड गँगस्टर! एल्व्हिश यादवच्या घरावर गोळीबार करणारा कोण आहे ‘छोटा डॉन’ हिमांशू भाऊ?
1

Lawrence Bishnoi चा कट्टर शत्रू ते मोस्ट वॉन्टेड गँगस्टर! एल्व्हिश यादवच्या घरावर गोळीबार करणारा कोण आहे ‘छोटा डॉन’ हिमांशू भाऊ?

child marriage: परंडा तालुक्यात अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचारप्रकरणी गुन्हा दाखल; बालविवाहानंतर मुलगी गर्भवती
2

child marriage: परंडा तालुक्यात अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचारप्रकरणी गुन्हा दाखल; बालविवाहानंतर मुलगी गर्भवती

Dharashiv Cyber Crime: गॅस कनेक्शन अपडेट करताना सावधान! APK फाइल पाठवून ज्येष्ठ महिलेचे ७ लाख ९६ हजार लंपास
3

Dharashiv Cyber Crime: गॅस कनेक्शन अपडेट करताना सावधान! APK फाइल पाठवून ज्येष्ठ महिलेचे ७ लाख ९६ हजार लंपास

‘शाळेवर ग्रेनेड हल्ला, तर महालक्ष्मी रेसकोर्सवर बॉम्बस्फोट…’, मुंबईच्या महापौर कार्यालयाला पुन्हा बॉम्बस्फोटाची धमकी
4

‘शाळेवर ग्रेनेड हल्ला, तर महालक्ष्मी रेसकोर्सवर बॉम्बस्फोट…’, मुंबईच्या महापौर कार्यालयाला पुन्हा बॉम्बस्फोटाची धमकी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.