Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rajsthan Crime News: पाकिस्तानी ISIसाठी गुप्तहेरी; राजस्थान गुप्तचर विभागाकडून मंगत सिंगला अटक

या कारवाईसंदर्भात एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मंगत सिंग गेल्या दोन वर्षांपासून सोशल मीडियाद्वारे पाकिस्तानी गुप्तचर संस्थांच्या संपर्कात होता.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Oct 11, 2025 | 10:38 AM
Rajsthan Crime News:

Rajsthan Crime News:

Follow Us
Close
Follow Us:
  • पाकिस्तानी ISIसाठी गुप्तहेरी
  • राजस्थान गुप्तचर विभागाकडून मंगत सिंगला अटक
  • ऑपरेशन सिंदूरचा भाग म्हणून ही अटक

Rajsthan Crime News:  राजस्थान पोलिसांच्या गुप्तचर विभागातून एक मोठी बातमी समोर आली आहे. राजस्थान गुप्तचर विभागाने पाकिस्तानच्या इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजेंस (ISI) साठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अलवर येथून मंगत सिंगला अटक केली आहे.

अलवर जिल्ह्यातील गोविंदगड येथील रहिवासी असलेला मंगत सिंग याच्यावर अधिकृत गुप्तहेर कायदा, १९२३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऑपरेशन सिंदूरचा भाग म्हणून ही अटक करण्यात आली आहे. मंगत सिंग याच्या अलवर छावणी परिसरात देखरेखीदरम्यान संशयास्पद हालचाली आढळून आल्याने गुप्तचर विभागाने ही कारवाई केली आहे.

ED ची मोठी कारवाई! 17,000 कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात अनिल अंबानी ग्रुपच्या सीएफओला अटक

अटक प्रक्रिया आणि संशयास्पद संपर्क

या कारवाईसंदर्भात एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मंगत सिंग गेल्या दोन वर्षांपासून सोशल मीडियाद्वारे पाकिस्तानी गुप्तचर संस्थांच्या संपर्कात होता. ईशा शर्मा नावाच्या एका महिला पाकिस्तानी हँडलरने त्याला हनीट्रॅप केले आणि सहकार्याच्या बदल्यात पैसे देऊ केले. जयपूरमधील केंद्रीय चौकशी केंद्रात विविध गुप्तचर संस्थांनी केलेल्या चौकशीनंतर आणि त्याच्या मोबाईल फोनची तांत्रिक तपासणी केल्यानंतर आरोपीचा सहभाग निश्चित झाला.

जैसलमेरमधील पाकिस्तानच्या हेर महेंद्र प्रसाद आणि हनीफ खान यांना यापूर्वी राजस्थान पोलिसांच्या सीआयडी (सुरक्षा) गुप्तहेरांनी अटक केली होती. महेंद्र डीआरडीओ गेस्ट हाऊसचा व्यवस्थापक असून चंदन फील्ड फायरिंग रेंजमध्ये काम करत होता, तर हनीफ खान पैशाच्या बदल्यात पाकिस्तानला गोपनीय लष्करी माहिती पाठवत होता. सीआयडीचे आयजी विष्णुकांत यांनी सांगितले की, राज्यातील हेरगिरीच्या कारवायांवर सतत लक्ष ठेवले जात आहे आणि सुरक्षा एजन्सी सतर्क आहेत.

रोहित शर्माची क्रेझ, चाहत्यांनी लावले हिटमॅनच्या नावाचे नारे! कोच अभिषेक नायरने बनला बाॅडीगार्ड; Video Viral

ऑपरेशन ‘सिंदूर’ नंतर, राजस्थान गुप्तचर विभागाने अलवर परिसरात पाळत ठेव सुरु केली होती. अलवर कॅन्टोन्मेंट आणि गोविंदगड येथील रहिवासी मंगत सिंगच्या हालचाली संशयास्पद आढळल्याने त्यावर लक्ष ठेवले गेले. तपासात असे समोर आले की, मागील दोन वर्षांपासून मंगत सिंग सोशल मीडियाद्वारे पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेशी संपर्कात होता आणि ऑपरेशन ‘सिंदूर’ दरम्यान त्याने पाकिस्तानला महत्वाची माहिती पुरवली होती.

त्याला १० ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आली. अनेक केंद्रीय आणि स्थानिक एजन्सींच्या संयुक्त तपासानंतर त्याच्या मोबाईल फोनमधून महत्त्वाचे पुरावे जप्त केले गेले आहेत. पोलिस सध्या मोबाईल फोनमधून मिळालेल्या माहितीची सखोल चौकशी करत आहेत.

गुप्तचर विभागाचे डीआयजी राजेश मील यांनी सांगितले की, मंगत सिंग सतत दोन पाकिस्तानी नंबरशी संपर्कात होता आणि सैन्याशी संबंधित महत्त्वाची माहिती पाठवत होता. या बदल्यात त्याला मोठ्या प्रमाणात पैसे मिळत होते. चौकशी दरम्यान अनेक महत्त्वाचे खुलासे झाले आहेत. पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या या एजंटने अलवर आर्मी मुख्यालयासह लष्कराच्या विविध क्षेत्रांची माहिती पाकिस्तानी आयएसआयला पाठवल्याची माहिती समोर आली आहे.

 

Web Title: Rajasthan crime news spying for pakistani isi mangat singh arrested by rajasthan intelligence department

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 11, 2025 | 10:13 AM

Topics:  

  • pakistan
  • Rajsthan

संबंधित बातम्या

IND & AFG Relation अफगाणिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा पाकिस्तानला इशारा, दिल्लीच्या भूमीवरून अमेरिकेलाही संदेश
1

IND & AFG Relation अफगाणिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा पाकिस्तानला इशारा, दिल्लीच्या भूमीवरून अमेरिकेलाही संदेश

पाकिस्तानचा काबूलमध्ये बॉम्बहल्ला, दहशतवादीला मारण्यासाठी ४८ लाख लोकसंख्या असलेल्या काबूलवर हल्ला, कोण आहे नूर वली मेहसूद?
2

पाकिस्तानचा काबूलमध्ये बॉम्बहल्ला, दहशतवादीला मारण्यासाठी ४८ लाख लोकसंख्या असलेल्या काबूलवर हल्ला, कोण आहे नूर वली मेहसूद?

अमेरिकेने पाकिस्तानच्या पाठीत खुपसला खंजीर, देणार नाही मिसाईल; US War Department ने मुळापासून दावा काढला खोडून, थेट…
3

अमेरिकेने पाकिस्तानच्या पाठीत खुपसला खंजीर, देणार नाही मिसाईल; US War Department ने मुळापासून दावा काढला खोडून, थेट…

Operation Sindoor मध्ये नवऱ्याचा मृत्यू अन् सादिया पेटली! ‘जैश’च्या मदतीने तयार करणार ‘महिला सुसाईड बॉम्बर’
4

Operation Sindoor मध्ये नवऱ्याचा मृत्यू अन् सादिया पेटली! ‘जैश’च्या मदतीने तयार करणार ‘महिला सुसाईड बॉम्बर’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.