Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ram Temple Security Alert: अयोध्या राम मंदिराला बॉम्बने उडवण्याचा कट? 20 वर्षीय संशयिताच्या चौकशीत धक्कादायक माहिती

कर्नाटकातील दावणगिरी जिल्ह्यातून ताब्यात घेतलेल्या 20 वर्षीय सुहैलच्या चौकशीत अयोध्येतील श्रीराम मंदिराबाबत संशयास्पद माहिती समोर आल्याचा दावा करण्यात आला आहे. त्याच्या मोबाईल तपासात काही संशयास्पद संपर्क आणि ऑनलाइन गटांशी संबंधित माहिती मिळाल्याचे सांगितले जात आहे. सुरक्षा यंत्रणा पुढील तपास करत आहे

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 25, 2026 | 02:26 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • सुहैलला कर्नाटकातील हरिहर परिसरातून ताब्यात घेण्यात आले.
  • मोबाईल तपासात संशयास्पद माहिती मिळाल्याचा तपास यंत्रणांचा दावा.
  • अयोध्या राम मंदिर सुरक्षेबाबत यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.
कर्नाटक: अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या सुरक्षेबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. कर्नाटकातील दावणगिरी जिल्ह्यातून ताब्यात घेण्यात आलेल्या 20 वर्षीय संशयिताच्या चौकशीत देशाला हादरवून सोडणारी माहिती समोर आल्याचा दावा तपास यंत्रणांकडून करण्यात आला आहे. या प्रकरणानंतर सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत.

काय नेमकं प्रकरण?

हरिहर परिसरातून ताब्यात घेतलेल्या सुहैल नावाच्या तरुणाची विविध सुरक्षा यंत्रणांकडून चौकशी सुरू आहे. प्राथमिक तपासात त्याच्या मोबाईलमधून काही संशयास्पद माहिती आणि संपर्क मिळाल्याचा दावा करण्यात आला आहे. चौकशीत त्याने ‘अयोध्येतील श्रीराम मंदिरात स्फोट घडवून आणण्याची माझी इच्छा होती’, असे सांगितल्याचे सूत्रांनी नामूद केले आहे. या कथित कबुलीबाबत अधिकृत तपास यंत्रणांनी अद्याप सार्वजनिकरित्या सविस्तर माहिती दिलेली नाही.

मोबाईल तपासणीत काय सापडलं?

सुहैलच्या मोबाईल फोनमधून अनेक संशयास्पद माहिती समोर आली आहे. त्याच्या फोनमध्ये पाकिस्तानचा कंट्री कोड असलेल्या मोबाईल क्रमांकाची नोंद ‘राणा बॉय’ या नावाने सेव्ह असल्याचे आढळले. याशिवाय पाकिस्तानशी संबंधित सोशल मीडिया गट, शस्त्रास्त्रांसह काढलेली छायाचित्रे आणि काही गुप्त ऑनलाइन गटांमधील सक्रिय सहभागाचे पुरावे मिळाल्याचा दावा तपास यंत्रणांनी केला आहे.

‘मेनन अँड जित्तू -३३३’ आणि ‘राणाभाई – ३३३’ गटांशी संबंध?

पोलिस तपासात सुहैल हा ‘मेनन अँड जित्तू-३३३’ आणि ‘राणाभाई-३३३’ नावाच्या संशयास्पद ऑनलाइन गटांमध्ये सक्रिय असल्याचे उघड झाल्याचे वृत्त आहे. या गटांद्वारे देशविघातक कारवाया, कट्टरतावादी विचारांचा प्रसार आणि संभाव्य दहशतवादी नेटवर्कशी संपर्क ठेवला जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

Ketan Agarwal Muder Case: लोहगड हत्याकांडाचा थरारक खुलासा; 3 प्लॅन, ‘डेथ पॉईंट’ आणि सिग्नल मिळताच चेतनने…

सुहैल पेंटरच्या वेशात

सुहैल हा उत्तर प्रदेशातील शाहजहानपूर परिसरातील रहिवासी असून तो हरिहरजवळील औद्योगिक भागातील एका कारखान्यात पेंटर म्हणून काम करत होता. मात्र त्याच्या हालचाली संशयास्पद वाटू लागल्यानंतर पोलिसांनी त्याच्यावर पाळत ठेवली. अधिक तपासासाठी सुहैलला मंगळवारी सायंकाळी तुमकूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. त्याचे आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनांशी संबंध आहेत का, याचा शोध तपास यंत्रणा घेत आहेत. सुहैल आणि त्याच्या संपर्कातील काही व्यक्ती भारतात विध्वंसक कारवाया घडवून आणण्याच्या तयारीत असल्याचा संशय प्राथमिक तपासात व्यक्त केला जात आहे.

सुरक्षा यंत्रणा सतर्क

अयोध्येतील श्रीराम मंदिर हे देशातील अत्यंत संवेदनशील धार्मिक स्थळांपैकी एक आहे. त्यामुळे हे प्रकरण अतिशय गंभीरतेने घेतले जात असून केंद्रीय गुप्तचर यंत्रणा, दहशतवादविरोधी पथके आणि राज्य पोलिस यांच्यात समन्वयाने तपास सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

अग्रवालच्या जामिनाला पोलिसांचा विरोध, अटींचा भंग झाल्याचा दावा; न्यायालयात नेमकं काय घडलं?

💡

Frequently Asked Questions

  • Que: संशयित सुहैलला कुठून ताब्यात घेण्यात आले?

    Ans: कर्नाटकातील दावणगिरी जिल्ह्यातील हरिहर परिसरातून त्याला ताब्यात घेण्यात आले.

  • Que: तपासात कोणती बाब समोर आली?

    Ans: त्याच्या मोबाईलमधून काही संशयास्पद संपर्क आणि माहिती मिळाल्याचा दावा आहे.

  • Que: या प्रकरणाचा तपास कोण करत आहे?

    Ans: राज्य पोलीस आणि विविध सुरक्षा यंत्रणा या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Web Title: Ram temple security alert plot to blow up ayodhyas ram temple shocking details revealed during interrogation of 20 year old suspect

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 25, 2026 | 02:26 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव
1

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक
2

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत
3

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले
4

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.