Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime News: रांजणगावात अवतरला बोगस अन्न औषध प्रशासन अधिकारी; पोलिसांकडून तोतया अधिकाऱ्याला अटक

Shikrapur Crime News: तोतया अधिकाऱ्याने स्वीट होम चालकांना बाजूला घेत सदर प्रकरण येथेच मिटवून घेऊ असे सांगुन त्यांच्याकडे दहा हजार रुपयांची मागणी केली. 

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 21, 2025 | 02:35 AM
Crime News: रांजणगावात अवतरला बोगस अन्न औषध प्रशासन अधिकारी; पोलिसांकडून तोतया अधिकाऱ्याला अटक
Follow Us
Close
Follow Us:
शिक्रापूर: रांजणगाव गणपती ता. शिरूर येथील हॉटेल व्यवसायिकांना अन्न औषध प्रशासनअधिकारी असल्याचे भासवून त्यांच्याकडे पैशांची मागणी करणाऱ्या तोतया अन्न औषध प्रशासन अधिकाऱ्याला रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून उगमाराम खानुराम असे पोलिसांनी अटक केलेल्या तोतया अधिकाऱ्याचे नाव आहे.

रांजणगाव गणपती ता. शिरूर येथील मंगलाराम देवासी यांच्या न्यू चामुंडा स्वीट होम तसेच ठाकूर देवासी यांच्या चामुंडा स्वीट होम येथे आणि सोनेसांगवी रोड येथील अमित देवासी यांच्या जय भवानी स्वीट होम येथे एक इसम आला. त्याने प्रत्येक स्वीट होम मधून काही पदार्थ पार्सल घेतले त्यानंतर काही वेळाने तुमच्या पदार्थांमध्ये भेसळ आहे मी स्वतः अन्न औषध प्रशासन अधिकारी असल्याचे सांगत सर्वांना त्यांच्यावर कारवाई करण्याची भिती दाखवली.दरम्यान स्वीट होम चालकांना बाजूला घेत सदर प्रकरण येथेच मिटवून घेऊ असे सांगुन त्यांच्याकडे दहा हजार रुपयांची मागणी केली.  यावेळी स्थानिकांना माहिती देत पोलिसांना बोलावून घेत सदर  इसमाकडे चौकशी केली असता त्याने  उडवाउडावीची उत्तरे दिली.  त्यावेळी सदर इसम हा बनावट व तोतयागिरी करणारा बोगस अन्न व औषध प्रशासन अधिकारी असल्याचे समोर आले.

हेही वाचा: बँक मॅनेजरकडून महिलेची 94 लाखांची फसवणूक

याबाबत मंगलाराम येना राम देवासी सध्या रा. रांजणगाव गणपती ता. शिरूर जि. पुणे मूळ रा. जिवंतकला ता. राणी जि. पाली राजस्थान यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी उगमाराम खानुराम रा. स्पाईन रोड चिंचवड चौक चिंचवड पुणे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यानंतर  त्याला तातडीने अटक केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब येळे हे करत आहे.

बँक मॅनेजरकडून महिलेची 94 लाखांची फसवणूक

कोरेगाव भीमा ता. शिरुर येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या असिस्टंट एरिया मॅनेजरने खातेदार महिलेचा चेक घेऊन पैसे बँकेच्या खात्यात वर्ग न भरता स्वतः सह पत्नी व मैत्रिणीच्या खात्यात वर्ग करुन महिलेला बनावट पावत्या दिल्याची घटना घडली आहे. यामध्ये महिलेची तब्बल ९३ लाख ४० हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली. शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे स्टेट बँक ऑफ इंडियाचा कोरेगाव भीमा शाखेतील असिस्टंट एरिया मॅनेजर विकास गुलाब बेलदार याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वढू बुद्रक ता. शिरुर येथील योगिता आरगडे या महिलेच्या कुटुंबीयांनी कोरेगाव भीमा येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेमध्ये महिलेचे बचत खाते काढून शेतीच्या उत्पन्नातून मिळणारे पैसे सदर खात्यावर जमा केलेले होते.  २०२३ मध्ये महिलेने बँकेत जाऊन तत्कालीन बँक मॅनेजर नेहा नलावडे यांना भेटून आमच्या खात्यावरील पैसे बँकेतील चांगला परतावा मिळणाऱ्या स्कीममध्ये गुंतवायचे असल्याबाबत सांगितले.

Web Title: Ranjagngaon midc police arrest fake fda officer marathi crime news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 21, 2025 | 02:35 AM

Topics:  

  • crime news
  • Shikrapur
  • Shikrapur Crime

संबंधित बातम्या

पुणे पोलिसांची ड्रोनद्वारे अवैध धंद्यावर कारवाई; एकाच दिवशी तब्बल…
1

पुणे पोलिसांची ड्रोनद्वारे अवैध धंद्यावर कारवाई; एकाच दिवशी तब्बल…

मुंढव्यात राडा, हॉटेल मालकासह पब बॉईज अन् रहिवशांमध्ये वाद; नेमकं काय घडल?
2

मुंढव्यात राडा, हॉटेल मालकासह पब बॉईज अन् रहिवशांमध्ये वाद; नेमकं काय घडल?

गेवराई हादरलं! आईने दोन वर्षीय चिमुकलीसह स्वत:च्या गळ्यालाही दोर लावला
3

गेवराई हादरलं! आईने दोन वर्षीय चिमुकलीसह स्वत:च्या गळ्यालाही दोर लावला

पुण्यात एकाला दगडाने मारहाण, उजव्या हाताचे हाड फ्रॅक्चर; नेमकं काय घडलं?
4

पुण्यात एकाला दगडाने मारहाण, उजव्या हाताचे हाड फ्रॅक्चर; नेमकं काय घडलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.