Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ratnagiri Crime: बायपास झाल्याचे माहित असूनही छातीवर हल्ला, रत्नागिरीत जुन्या वादातून हत्या; 17 दिवसांनी आरोपी अटकेत

रत्नागिरीतील खेड येथे जुन्या वादातून 55 वर्षीय व्यक्तीची मारहाण करून हत्या करण्यात आली. 17 दिवस फरार असलेले तीन आरोपी पोलिसांनी सापळा रचून अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 25, 2026 | 12:41 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • जुन्या वादातून 55 वर्षीय व्यक्तीची हत्या
  • छातीवर मारहाण; बायपास माहिती असूनही हल्ला
  • 17 दिवस फरार आरोपींना पोलिसांनी अटक
रत्नागिरी: रत्नागिरी येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. खेड तालुक्यातील मेटे मोहल्ला येथे एका जुन्या भांडणातून एका ५५ वर्षीय व्यक्तीची छातीवर बुक्यांनी प्रहार करून हत्या केल्याची धकाकदायक घटना समोर आली आहे. या प्रकरणातील आरोपी हे १७ दिवसांपासून फरार होते. मात्र पोलिसांनी आता तिघांना अटक केली आहे. आरोपींवर भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय घडलं नेमकं?

6 एप्रिल 2026 रोजी संध्याकाळी मेटे मोहल्ला परिसरातील कब्रस्तान जवळील रस्त्यावर शफी अब्दुल्ला वरवटकर (55) आणि आरोपींमध्ये जुन्या भांडणावरून वाद झाला होता. आरोपींची नावे अशरफ महामुद बोट, गणी ईस्माईल बोट आणि कादिर शमशुद्दीन घारे असे आरोपींचे नावे आहेत.

पुण्यातील वारजे परिसरात गोळीबाराचा थरार! 5-6 जण सलूनमध्ये शिरले अन्…

शफी यांचे हृदयाचे बायपास ऑपरेशन झाले हे माहिती असूनही आरोपींनी त्याच्यावर वार केले. त्यांना शिवीगाळ करत छातीवर हाताच्या बुक्क्यांनी आणि लाथाबुक्क्यांनी गंभीर मारहाण केली. या हल्ल्यात शफी वरवटकर यांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता, मात्र हे तिन्ही आरोपी तेव्हापासून फरार होते.

सापळा रचून अटक

आरोपी खेड शहरात येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांनी मिळताच खेड एस.टी. स्टँड परिसरात सापळा रचून तिघांना अटक केली आहे. कादिर शमशुद्दीन घारे (48), गणी ईस्माईल बोट (54) आणि अशरफ महामुद बोट (५५) यांना रात्री 8.23 च्या सुमारास अटक करण्यात आली.

फेसबुक रिल्सचा सापळा! 5 रुपयांच्या नोटेसाठी 15 लाखांचे आमिष, वृद्धाची 9 लाखांहून अधिक फसवणूक

 रत्नागिरी येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रत्नागिरीतील भाटमिऱ्या परिसरात राहणाऱ्या हेमंत मारुती शिवलकर या वृद्धाला एका ‘ट्रॅक्टर’ असलेल्या 5 रुपयांच्या नोटेचे आमिष दाखवून तब्बल 9 लाख 21 हजार रुपयांना लुटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

उत्तर प्रदेशातील अमित चव्हाण नावाच्या संशयिताने फेसबुकवर रिल्स बनवून ‘5 रुपयांच्या नोटेवर ट्रॅक्टरचे चित्र असल्यास 15 लाख रुपये मिळतील’ अशी जाहिरात केली होती. हे रिल्स पाहून शिवलकर यांनी आरोपीशी संपर्क साधला आणि आपल्याकडे अशी नोट असल्याचे सांगितले. १५ लाख रुपये मिळवून देण्यासाठी काही शासकीय शुल्क किंवा प्रोसेसिंग फी भरावी लागेल, अशी बतावणी आरोपीने केली.

एकूण ९ लाख २१ हजारांची फसवणूक

ही फसवणूक सलग ५ महिने चालली. ऑगस्ट २०२५ पासून जानेवारी २०२६ या दरम्यान ही फसवणूक झाली. आरोपीने विविध खात्यांमध्ये शिवलकर यांनी गुगल पे द्वारे पैसे पाठवले. 15 लाख रुपये मिळतील या आशेने आजींनी थोडे-थोडे करत एकूण 9 लाख 21 हजार रुपये आरोपीला पाठवले. वारंवार पैसे भरूनही १५ लाख रुपये मिळत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे शिवलकर यांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने रत्नागिरी शहर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे उत्तर प्रदेशमधील अमित चव्हाणयाच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

“हा बाळाचा नाही, तिच्या निवडीचा प्रश्न”, सुप्रीम कोर्टाने ७ महिन्यांच्या गर्भपाताला दिली परवानगी

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात.

  • Que: हत्येचे कारण काय होते?

    Ans: जुन्या भांडणातून वाद होऊन मारहाण करण्यात आली.

  • Que: आरोपींना कशी अटक झाली?

    Ans: पोलिसांनी सापळा रचून खेड एसटी स्टँड परिसरातून त्यांना अटक केली.

Web Title: Ratnagiri crime attack on the chest despite knowledge of bypass surgerymurder in ratnagiri stemming from an old dispute accused arrested after 17 days

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 25, 2026 | 12:41 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Nagpur Accident: 70 वर्षीय महिला मॉर्निंग वॉकला गेली मात्र परतलीच नाही; नागपुरात हिट अँड रनचा थरार!
1

Nagpur Accident: 70 वर्षीय महिला मॉर्निंग वॉकला गेली मात्र परतलीच नाही; नागपुरात हिट अँड रनचा थरार!

Sangali Crime: सांगलीत हृदयद्रावक घटना! तलावात बुडून दोन शाळकरी मुलांचा मृत्यू, काय घडलं नेमकं?
2

Sangali Crime: सांगलीत हृदयद्रावक घटना! तलावात बुडून दोन शाळकरी मुलांचा मृत्यू, काय घडलं नेमकं?

Solapur Crime: ‘बाळूमामाचा अवतार’ म्हणवणाऱ्या मनोहर मामाला अटक; अघोरी विधीच्या नावाखाली लाखोंची फसवणूक
3

Solapur Crime: ‘बाळूमामाचा अवतार’ म्हणवणाऱ्या मनोहर मामाला अटक; अघोरी विधीच्या नावाखाली लाखोंची फसवणूक

Nandurbar Accident: नंदूरबारमध्ये भीषण अपघात; लग्नाच्या 10 दिवस आधी तरुणाचा मृत्यू, संतप्त नागरिकांनी वाहन पेटवले
4

Nandurbar Accident: नंदूरबारमध्ये भीषण अपघात; लग्नाच्या 10 दिवस आधी तरुणाचा मृत्यू, संतप्त नागरिकांनी वाहन पेटवले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.