Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Gudi Padwa |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ratnagiri Crime: संतापजनक! रत्नागिरीत अल्पवयीन मुलावर अत्याचार; कृत्याचा VIDEO सोशल मीडियावर व्हायरल

रत्नागिरीमध्ये अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याची संतापजनक घटना उघड झाली. पोलिसांनी दोन आरोपींना अटक करून POCSO Act अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 14, 2026 | 10:21 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • रत्नागिरीमधील राजीवडा परिसरात अल्पवयीन मुलावर अत्याचार.
  • आरोपींनी कृत्याचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल केला.
  • पोलिसांनी दोघांना अटक; POCSO Act अंतर्गत गुन्हा दाखल.
रत्नागिरी: रत्नागिरी शहरातून एक धक्कदायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करून त्या कृत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसारित केल्याचे समोर आले आहे. रत्नागिरी शहर पोलिसांनी दोन तरुणांना अटक केली आहे. या घटनेने संताप व्यक्त केला जात आहे.

काय घडलं नेमकं?

घडलेली घटना २२ फेब्रुवारी २०२६ रोजी घडली. राजीवडा येथील जुबेर सलीम शेख आणि मुस्तकीन गडकरी या दोघांनी एका अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केले. या घटनेने पीडित अल्पवयीन घाबरला आणि त्याने सुरुवातीला या प्रकाराची कल्पना आपल्या पालकांना दिली नाही. मात्र आरोपींनी या कृत्याचा व्हिडीओ बनवून तो सोशल मीडियावर व्हायरल केला. हा व्हिडीओ पीडित मुलाच्या वडिलांच्या निर्दशनास पडला. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर त्यांना मोठा धक्का बसला.

Beed Crime: ‘बाजूला हो’ म्हणल्याचा राग; बीडमध्ये हॉटेल वेटरला अमानुष मारहाण, CCTV समोर

आरोपींना अटक

त्यांनी थेट रत्नागिरी शहर पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार नोंदवली. तक्रारीवरून शहर पोलिसांनी जुबेर शेख आणि मुस्तकिन गडकरी यांच्या विरोधात भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांसह अत्यंत कडक अशा बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम (POCSO Act) अंतर्गत गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दोन्ही संशयित आरोपींना अटक केली. त्यांनी हा व्हिडिओ आणखी कुठे प्रसारित केला आहे का, याचा तांत्रिक तपास पोलिस करत आहेत. पोलीस पुढील कारवाई करत आहे.

चलो निकलो यहा से! रत्नागिरी पोलिसांची मोठी कारवाई; बांग्लादेशी महिलेला केली अटक

संगमेश्वर तालुक्यात सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत गंभीर आणि खळबळजनक प्रकार उघडकीस आला असून, बांगलादेशातून बेकायदेशीरपणे भारतात घुसखोरी केलेल्या एका महिलेला संगमेश्वरमधील आंबेड खुर्द येथे चक्क आश्रय देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी संगमेश्वर पोलिसांनी (Ratnagiri) ६ मार्च २०२६ रोजी रात्री उशिरा मोठी धडक कारवाई करत, संबंधित बांगलादेशी महिलेसह तिला मदत करणाऱ्या तिच्या पतीवर गुन्हा दाखल केला आहे.

संगमेश्वर तालुक्यातील आंबेड खुर्द मुस्लिम मीहल्ला येथील युसूफ महंमद सय्यद याने सिनेम युसूफ सय्यद उर्फ शांतना अहमद खान (मूळ रा. खिलगाव, जिल्हा गाजीपुर, ढाका, बांगलादेश) ही परदेशी नागरिक आहे, हे पूर्णपणे माहित असतानाही तिच्याशी लग्न केले, आरोपी युसूफने तिला भारतात बेकायदेशीरपणे वास्तव्य करण्यासाठी केवळ आश्रयच दिला नाही, तर ती भारतीय नागरिक असल्याचे भासवण्यासाठी तिची बनावट सरकारी कागदपत्रे तयार करून घेतली. या बनावट आधारकार्ड आणि पॅनकार्डच्या आधारे चक्क कॅनरा बँकेत खाते उघडून भारतीय प्रशासकीय आणि बँकिंग व्यवस्थेची मोठी फसवणूक केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

Solapur Accident: रोजा इफ्तारनंतर चहा पिण्यासाठी बाहेर पडले अन्… सोलापूरमध्ये कार-कंटेनर अपघातात दोघांचा मृत्यू

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: ही घटना रत्नागिरी शहरातील राजीवडा परिसरात घडली.

  • Que: प्रकरण कसे उघड झाले?

    Ans: सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ मुलाच्या वडिलांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार केली.

  • Que: सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ मुलाच्या वडिलांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार केली.

    Ans: पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक करून त्यांच्याविरुद्ध POCSO Act अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Ratnagiri crime outrageous minor boy abused in ratnagiri video of the act goes viral on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 14, 2026 | 10:21 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.