काय घडलं नेमकं?
क्षुल्लक कारणावरून बीडच्या तेलगाव येथे हॉटेलमधील वेटरला अमानुष मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या मारहाणीत तरुण गंभीर जखमी झाला आहे. जखमी झालेल्या वेटर तरुणाचं नाव सागर विजय जाधव असे आहे. तेलगाव येथील त्रिमूर्ती ज्युस सेंटरमध्ये रिकामे ग्लास जिन्यावरून खाली घेऊन येत असताना पायरीवरून बाजूला हो असं बोलण्याचा राग मनात धरून तीन ते चार जणांनी त्याला बेदम मारहाण केली आहे. जखमी तरुणावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे.
घटनेचा सीसीटीव्ही समोर
या घटनेचा सीसीटीव्ही देखील समोर आले आहे. ज्यामध्ये दोन तरुणांकडे वेटरला बेदम मारहाण होत असल्याचे दिसत आहे. मारहाण करणाऱ्यांपैकी एका तरुणाने वेटरला उचलून आपटले तसेच खाली पाडून लाथाबुक्क्याही घातल्या. मारहाणीत तो तरुण गंभीर जखमी झाल्याचेही दिसत आहे.
कारवाई करण्याची मागणी
या घटनेने सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. गुन्हा दाखल करून तात्काळ आरोपीवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे. अद्याप या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
तीन मुली झाल्याने छळ, दुसऱ्या लग्नाचा दबाव; 24 वर्षीय विवाहितेची आत्महत्या
बीड येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका २४ वर्षीय महिलेने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. तीन मुली झाल्या म्हणून विवाहितेचा सासरच्या मंडळींकडून छळ सुरु होता. एवढेच नाहीतर दुसऱ्या लग्नाला परवानगी दे असा दबाव देखील टाकण्यात येत होता. त्यामुळे २४ वर्षीय पीडित महिने या सगळ्या छळाला कंटाळून आत्महत्या केली.
Nagpur News: नागपुरात अफवेचा कहर! ‘मुलं चोरणारी टोळी’ समजून वृद्ध महिलेला जमावाकडून बेदम मारहाण
Ans: ही घटना बीड जिल्ह्यातील तेलंगाव येथे घडली.
Ans: पायऱ्यांवरून बाजूला हो असे म्हणल्याच्या किरकोळ कारणावरून काही तरुणांनी वेटरला मारहाण केली.
Ans: मारहाणीत जखमी झालेल्या वेटरवर सध्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.






