Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

क्रिकेटचा सामना संपला अन् दोघे पोहण्यासाठी डोहात उतरले; पण काही क्षणांत असं काय घडलं की कल्याणच्या दोन्ही मुलांचा दुर्दैवी अंत

क्रिकेट खेळण्यासाठी रत्नागिरीत आलेल्या त्या दोन मुलांना पुढच्या काही क्षणांत काय होणार आहे, याची कल्पनाही नव्हती. सामना संपल्यानंतर ते जवळच्या डोहात पोहण्यासाठी उतरले. मात्र, पाण्यात उडी घेतल्यानंतर दोघेही पुन्हा वर आलेच नाहीत. पोहण्यास बंदी असलेल्या या धोकादायक डोहात नेमकं काय घडलं? या घटनेने परिसर सुन्न झाला आहे.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Oct 09, 2026 | 09:19 AM
क्रिकेटचा सामना संपला अन् दोघे पोहण्यासाठी डोहात उतरले; पण काही क्षणांत असं काय घडलं की कल्याणच्या दोन्ही मुलांचा दुर्दैवी अंत

क्रिकेटचा सामना संपला अन् दोघे पोहण्यासाठी डोहात उतरले; पण काही क्षणांत असं काय घडलं की कल्याणच्या दोन्ही मुलांचा दुर्दैवी अंत

Follow Us
Follow Us:
  • क्रिकेटसाठी आलेल्या कल्याणच्या दोन मुलांचा मृत्यू.
  • धोकादायक डोहात बुडून १६ वर्षीय मुलांचा अंत.
  • पूर्णगड पोलिसांकडून पुढील तपास सुरू.
रत्नागिरी : क्रिकेटचा सामना संपल्यानंतर पोहण्यासाठी डोहात उतरलेल्या कल्याण येथील दोन १६ वर्षीय मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रत्नागिरीतील कोळंबे येथे घडली. सौरभ पवनकुमार झा आणि शुभम रमेश यादव अशी मृत मुलांची नावे आहेत. पोहण्यासाठी धोकादायक मानल्या जाणाऱ्या आणि बंदी असलेल्या डोहात ही घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

क्रिकेटचा सामना संपल्यानंतर डोहात उतरले

रत्नागिरीतील कोळंबे येथे गेल्या तीन दिवसांपासून १६ वर्षांखालील मुलांचे क्रिकेट सामने सुरू आहेत. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कल्याण येथील एका क्रिकेट अकॅडमीची २० जणांची टीम आली होती. टीमचा सामना संपल्यानंतर दुपारच्या सुमारास सौरभ झा आणि शुभम यादव हे दोघे क्रिकेटच्या मैदानाशेजारी असलेल्या डोहात पोहण्यासाठी गेले. त्यांच्यासोबत टीममधील इतर सहकारीही होते.

हेही वाचा: मेटाच्या यंत्रणेला सापडले ५३ लाख धक्कादायक कंटेंट; ९८ टक्के प्रकरणे तक्रारीआधीच उघड, नेमकं काय घडलं?

धोकादायक डोहात बुडून मृत्यू

संबंधित डोह जंगल परिसरात असून तो अतिशय धोकादायक मानला जातो. या डोहात पोहण्यास बंदी असल्याची माहिती आहे. मात्र, या धोक्याकडे दुर्लक्ष करून सौरभ आणि शुभम पाण्यात उतरले. दोघांनी डोहात उडी घेतली; मात्र त्यानंतर ते पुन्हा पाण्याच्या वर आलेच नाहीत. पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने दोघे बुडाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. हा प्रकार लक्षात येताच त्यांच्यासोबत असलेल्या इतर मुलांनी आरडाओरडा सुरू केला. आवाज ऐकून स्थानिक नागरिक घटनास्थळी धावले. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता. दोघांना पाण्याबाहेर काढण्यात आले, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर जखमा दिसून आल्या. डोहात उडी मारताना दगडावर आदळल्याने त्यांचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन आणि पुढील तपासातून स्पष्ट होणार आहे.

पूर्णगड पोलिसांकडून तपास सुरू

घटनेची माहिती मिळताच पूर्णगड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दोन्ही मुलांचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवले. या घटनेची माहिती त्यांच्या नातेवाइकांना देण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत. क्रिकेट खेळण्यासाठी रत्नागिरीत आलेल्या दोन अल्पवयीन मुलांचा अशा प्रकारे दुर्दैवी अंत झाल्याने त्यांच्या सहकाऱ्यांसह परिसरातील नागरिकांमध्ये शोक व्यक्त होत आहे.

Web Title: Ratnagiri kolambe two minor cricketers drown death dangerous pond sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 09, 2026 | 09:19 AM

Topics:  

  • Drowning in Water
  • Ratnagiri
  • Ratnagiri News Update

संबंधित बातम्या

बाजूला सारा गोवा, यंदा भेट द्या रत्नागिरीला भेट… बीच, किल्ले ते रानमेव्यापर्यंत इथे मिळेल अनेक गोष्टींचा अनुभव
1

बाजूला सारा गोवा, यंदा भेट द्या रत्नागिरीला भेट… बीच, किल्ले ते रानमेव्यापर्यंत इथे मिळेल अनेक गोष्टींचा अनुभव

Sunil Tatkare: नागरिकांच्या प्रश्नांवर दिरंगाई? सुनील तटकरे अधिकाऱ्यांवर भडकले; दिला थेट ‘हा’ इशारा
2

Sunil Tatkare: नागरिकांच्या प्रश्नांवर दिरंगाई? सुनील तटकरे अधिकाऱ्यांवर भडकले; दिला थेट ‘हा’ इशारा

Leopard CCTV Video: बिबट्याची दहशत सुरूच; देवरुखच्या साडवली परिसरातील थरारक दृश्य CCTV मध्ये, तातडीने पिंजरा लावण्याची मागणी
3

Leopard CCTV Video: बिबट्याची दहशत सुरूच; देवरुखच्या साडवली परिसरातील थरारक दृश्य CCTV मध्ये, तातडीने पिंजरा लावण्याची मागणी

Jaitapur: जैतापूर अजूनही रखडलेलाच, त्यात रत्नागिरीत ४ नवे अणुप्रकल्प! नागरिकांचा संतापाचा उद्रेक
4

Jaitapur: जैतापूर अजूनही रखडलेलाच, त्यात रत्नागिरीत ४ नवे अणुप्रकल्प! नागरिकांचा संतापाचा उद्रेक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.