Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 17 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ratnagiri Crime: कामावर जाण्यासाठी घराबाहेर पडला, पण परतलाच नाही! वालोपेत टपरीमागे तरुणाचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह

Ratnagiri Crime: रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील वालोपे येथे सांगलीच्या तरुणाची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नवनाथ कांबळे असे मृत तरुणाचे नाव असून तो लोटे एमआयडीसीतील एका खासगी कंपनीत कामाला होता. डोक्यात जांभा दगड घालून त्याची हत्या करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Nov 17, 2026 | 05:40 PM
कामावर जाण्यासाठी घराबाहेर पडला, पण परतलाच नाही! वालोपेत टपरीमागे तरुणाचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह

कामावर जाण्यासाठी घराबाहेर पडला, पण परतलाच नाही! वालोपेत टपरीमागे तरुणाचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह

Follow Us
Follow Us:
  • चिपळूणमध्ये सांगलीच्या तरुणाची निर्घृण हत्या!
  • डोक्यात जांभा दगड घालून संपवलं
  • परिसरात खळबळ
चिपळूण : रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वालोपे रेल्वे स्टेशन नाका परिसरात एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. डोक्यात जांभा दगड घालून तरुणाला ठार मारल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मंगळवारी पहाटे झोलाई माऊली पार्कसमोरील एका टपरीच्या मागे या तरुणाचा मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. (Ratnagiri Crime)

कामावर जाण्यासाठी घरातून बाहेर पडला अन्…

नवनाथ कांबळे असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो मूळचा सांगली जिल्ह्यातील वांगी येथील रहिवासी होता. वालोपे येथे कोकण रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलात (RPF) कार्यरत असलेल्या आपल्या नातेवाईकाकडे तो वास्तव्यास होता. लोटे एमआयडीसी परिसरातील एका खासगी कंपनीत तो नोकरी करत होता.

पिंपरी-चिंचवडकरांची प्रतीक्षा संपणार! मार्चपासून भामा-आसखेडचे 167 एमएलडी पाणी मिळणार

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास नवनाथ कामावर जाण्यासाठी घरातून बाहेर पडला होता. मात्र, मंगळवारी पहाटे वालोपे रेल्वे स्टेशन नाका परिसरातील एका टपरीच्या मागे त्याचा मृतदेह आढळला. डोक्यात जांभा दगड घालून त्याची हत्या करण्यात आल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.

पोलिसांची घटनास्थळी धाव

घटनेची माहिती मिळताच चिपळूण पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी शैलेश सणस, पोलीस निरीक्षक आवारे, पोलीस उपनिरीक्षक निकम, पोलीस उपनिरीक्षक सावंत, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अमोल यादव यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कामथे उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

हत्येमागील कारण अद्याप अस्पष्ट

नवनाथ कांबळे यांची हत्या नेमकी कोणत्या कारणातून करण्यात आली, याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही. वैयक्तिक वादातून हत्या झाली की यामागे अन्य काही कारण आहे, याचा तपास पोलीस करत आहेत. आरोपींचा शोध घेण्यासाठीही पोलिसांकडून तपास सुरू आहे. दरम्यान, लोटे एमआयडीसीमध्ये काम करणाऱ्या तरुणाची अशा प्रकारे हत्या झाल्याने कामगार वर्गातही चिंता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणातील आरोपी लवकरात लवकर जेरबंद होणार का आणि हत्येमागील नेमके कारण काय, हे पोलीस तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.

Mumbai University : सिनेट सदस्य प्रदिप सावंत यांना कारणे दाखवा नोटीस; शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आक्रमक, मुंबई विद्यापीठाला विचारला

💡

Frequently Asked Questions

  • Que: चिपळूणमधील वालोपे येथे हत्या झालेल्या तरुणाचे नाव काय आहे?

    Ans: नवनाथ कांबळे असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव असून तो सांगली जिल्ह्यातील वांगी येथील रहिवासी होता.

  • Que: नवनाथ कांबळे यांची हत्या कशी करण्यात आली?

    Ans: डोक्यात जांभा दगड घालून त्यांची हत्या करण्यात आली. वालोपे रेल्वे स्टेशन नाका परिसरातील एका टपरीच्या मागे त्यांचा मृतदेह आढळला.

  • Que: नवनाथ कांबळे कुठे नोकरीला होते?

    Ans: लोटे एमआयडीसी परिसरातील एका खासगी कंपनीत कार्यरत होते. ते वालोपे येथे आपल्या आरपीएफ कर्मचारी नातेवाईकाकडे राहत होते.

Web Title: Chiplun valope sangli youth navnath kamble murder jambha stone sz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 17, 2026 | 05:40 PM

Topics:  

  • crime
  • police
  • Ratnagiri

संबंधित बातम्या

Kalyan Police News: ‘तुझी तक्रार घेणार नाही, तुला जे करायचे ते कर’; खडकपाडा पोलीस अधिकारी अमोल खोंडे पुन्हा चर्चेत!
1

Kalyan Police News: ‘तुझी तक्रार घेणार नाही, तुला जे करायचे ते कर’; खडकपाडा पोलीस अधिकारी अमोल खोंडे पुन्हा चर्चेत!

Ratnagiri Accident: काळ रात्रच जणू! मुंबई-गोवा हायवेवर भीषण अपघात! ट्रकची बसला धडक अन् 16 प्रवासी…
2

Ratnagiri Accident: काळ रात्रच जणू! मुंबई-गोवा हायवेवर भीषण अपघात! ट्रकची बसला धडक अन् 16 प्रवासी…

Savarde Minor Girl Case : सावर्डेतून बेपत्ता झालेल्या 13 वर्षीय मुलीचा मुंबईत शोध; संशयित युवक पोलिसांच्या ताब्यात
3

Savarde Minor Girl Case : सावर्डेतून बेपत्ता झालेल्या 13 वर्षीय मुलीचा मुंबईत शोध; संशयित युवक पोलिसांच्या ताब्यात

Navi Mumbai Crime: भुरट्या पत्रकाराचा मुखवटा उतरला! शैलेंद्र द्विवेदी लोणावळ्यातून जेरबंद; उलवे पोलिसांची कारवाई
4

Navi Mumbai Crime: भुरट्या पत्रकाराचा मुखवटा उतरला! शैलेंद्र द्विवेदी लोणावळ्यातून जेरबंद; उलवे पोलिसांची कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.