Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नेरुळमध्ये पाच दिवसांपासून पाणीपुरवठा ठप्प; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे मंजुळा बिल्डिंग परिसरातील नागरिक हैराण

नेरुळमधील नागरिकांना पाणीपुरवठा टंचाईचा सामना करावा लागत आहेत. त्यामुळे येथील नागरिकांनी प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला आहे. तसेच समस्या न सोडवल्यास आंदोलन करण्याचा इशारा देखील नागरिकांनी दिला आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 15, 2025 | 08:35 AM
नेरुळ मधील मंजुळा बिल्डिंग परिसरातील नागरिकांना पाच दिवसांपासून पाणीपुरवठा नाही

नेरुळ मधील मंजुळा बिल्डिंग परिसरातील नागरिकांना पाच दिवसांपासून पाणीपुरवठा नाही

Follow Us
Close
Follow Us:

सावन वैश्य-

नेरुळ येथील मंजुळा बिल्डिंग परिसरात गेल्या पाच दिवसांपासून भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. सायंकाळी पाणीपुरवठा होत नसल्याने परिसरातील नागरिकांचे हाल होत असल्याचे पाहायला मिळत आहेत. वारंवार तक्रारी करूनही महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने कोणतीही ठोस कारवाई न केल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

Nashik Crime: नाशिक हादरलं! भरदिवसा युवकावर धारदार शस्त्राने हल्ला;दुचाकीवरून उतरून थेट तरुणाच्या पोटावर चाकूने सपासप वार

पाणीपुरवठा समस्येबाबत नागरिकांनी केल्या तक्रारी

दिवाळी सारखा सण तोंडावर आला असतानाच नेरुळ सेक्टर 23 प्लॉट नो अ 77 मधील मंजुळा वसाहतीत पाण्याची बोंबाबोंब सुरु आहे. गेल्या 5 दिवसांपासून येथील नागरिक पाण्याच्या तुटवड्याचा सामना करत आहेत. या इमारतीतील संध्यकाळी होणाऱ्या पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत नसल्याने येथील नागरिकांमध्ये प्रशासनाविरोधात आक्रोश आहे. येथील स्थानिक नागरिकांनानी पाणीपुरवठा विभागाकडे या पिण्याच्या पाण्याबाबत अनेक तक्रारी केल्या. मात्र पालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांना या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.

Parbhani Crime: नातेवाइकांचा विरोध आणि प्रेमभंगातून तरुणाची रेल्वेसमोर आत्महत्या, व्हॉट्सअॅप स्टेटसवर ठेवला भावनिक संदेश

उपाययोजना न झाल्यास नागरिकांचा आंदोलनाचा इशारा

जीवन जगताना पाणी हा अविभाज्य घटक आहे. हाच अविभाज्य घटकाचा पुरवठा होत नसल्याने येथील नागरिकांना पिण्यासाठी, स्वयंपाकासाठी आणि दैनंदिन गरजांसाठी बाहेरून पाण्याचे टँकर्स मागवावे लागत आहे. महिला आणि लहान मुलांचे हाल होत असून, दूषित पाणी पिण्याची भीतीही नागरिकांमध्ये निर्माण आहे. अशातच दिवाळी सारखा सण तोंडावर आल्याने घरी पाहुणे आल्यावर त्यांचा पाहुणचार कसा करावा असा प्रश्न या नागरिकांसमोर उपस्थित होत आहे. तसेच या परिसरातील नागरिकांनी प्रशासनाला तातडीने लक्ष घालून पाणीपुरवठा सुरळीत करावा अशी मागणी केली आहे. जर त्वरित उपाययोजना न झाल्यास ऐन सणासुदीच्या दिवसांत आंदोलनाचा इशाराही नागरिकांनी दिला आहे. त्यामुळे आता या परिस्थितीत प्रशासन काय भुमिका घेणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

नवी मुंबईतील पाम बीच मार्गावर भीषण अपघात

अलीकडेच नवी मुंबईतील पाम बीच मार्गावर भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली होती. दोन दुचाकींचा अपघात झाला असून या घटनेत चार जण जखमी झाले होते. यातील दोघे गंभीर जखमी झाल्याचं देखील सांगण्यात आलं होतं. बेलापूरच्या दिशेने जात असलेल्या दुचाकीस्वाराचा गाडीवरील ताबा सुटला आणि त्याची दुचाकी दुभाजकावर जाऊन आदळली. तर याचवेळी मागून येणारी स्कूटी याच दुचाकीवर आदळली. त्यामुळे या घटनेत चौघेजण जखमी झाले. वाशी ते सीबीडी बेलापूर या मार्गिकेवर ही घटना घडल्याची माहिती आहे. अपघाताची माहिती मिळताच नेरुळ पोलीस ठाण्याचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सर्व जखमींना तातडीने रुग्णालया उपचारासाठी दाखल केले.

Web Title: Residents of manjula building in nerul have not had water supply for five days

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 15, 2025 | 08:20 AM

Topics:  

  • crime news
  • Marathi News
  • Navi Mumbai

संबंधित बातम्या

डिमांड ड्राफ्टच्या माध्यमातून तब्बल 9 लाखांची फसवणूक; कर्जाचे हफ्ते फेडण्यासाठी डीडी दिला अन् नंतर…
1

डिमांड ड्राफ्टच्या माध्यमातून तब्बल 9 लाखांची फसवणूक; कर्जाचे हफ्ते फेडण्यासाठी डीडी दिला अन् नंतर…

अमलीपदार्थ नमुन्यांच्या पुनर्तपासणीस नकार; मुंबई पोलिसांच्या अमलीपदार्थ विरोधी पथकाला विशेष एनडीपीएस न्यायालयाचा झटका
2

अमलीपदार्थ नमुन्यांच्या पुनर्तपासणीस नकार; मुंबई पोलिसांच्या अमलीपदार्थ विरोधी पथकाला विशेष एनडीपीएस न्यायालयाचा झटका

Ratnagiri News : लोटेतील लक्ष्मी अग्रो (पिपास) कंपनीविरोधात बेमुदत धरणे आंदोलन सुरु
3

Ratnagiri News : लोटेतील लक्ष्मी अग्रो (पिपास) कंपनीविरोधात बेमुदत धरणे आंदोलन सुरु

Dharashiv Crime : जिल्ह्यात भ्रष्टाचाराचा पितळ उघड ; अधिकाऱ्यांच्या दारातच निकृष्ट रस्ते, लाखोंचा अपहार आला समोर
4

Dharashiv Crime : जिल्ह्यात भ्रष्टाचाराचा पितळ उघड ; अधिकाऱ्यांच्या दारातच निकृष्ट रस्ते, लाखोंचा अपहार आला समोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.