पूर्ववैमनस्यातून तरुणावर हल्ला; पोटातच चाकू खुपसला अन् तरुण...
रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथे एका सेवानिवृत्त शिक्षिकेचा राहत्या घरी हत्या झाल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे. या हत्याकांडामुळे चिपळूणमध्ये खळबळ उडाली असून पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला आहे. हत्या झालेल्या सेवानिवृत्त शिक्षिकेतणाव वर्षा जोशी (63 वर्षे) असं आहे. याप्रकरणी, अधिक तपास सुरु असून हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.
ही घटना चिपळूण शहरातील रावतळे परिसरात घडली आहे. वर्षा जोशी या वृद्ध शिक्षिकेचा मृतदेह घरात विवस्त्र अवस्थेत आढळून आला. या महिलेच्या अंगावर अनेक जखमा असून पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवला आहे. विशेष म्हणजे घरातील CCTV कॅमेराची हार्ड डिस्क देखील गायब करण्यात आली आहे. त्यामुळे मारेकऱ्यांनी कट रचून पद्धतशीरपणे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचं उघड होत आहे. आरोपींना पकडण्याचा आव्हान आता चिपळूण पोलिसांसमोर आहे. पोलीस अधिक तपास करत असून हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.
कोल्हापूर हादरलं! पती पत्नीमध्ये मध्यरात्री वाद, संतापलेल्या पतीने केला पत्नीचा निर्घृणपणे खून
कोल्हापुरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पतीने घरात झालेल्या वादानंतर पत्नीचा निर्घृणपणे हत्या केल्याची घटना समोर आली आहे. त्यानंतर पतीने पोलीस स्टेशनमध्ये फोन करून हत्येची माहिती दिली. या घटनेने परिसरामध्ये खळबळ उडाली आहे. आरोपीचे नाव परशुराम पांडुरंग पाटील (वय 44) असे असून, तो एका फौंड्रीत काम करतो. पतीने आपल्या पत्नीचा गळा दाबून आणि नंतर चाकूने गळा कापून अत्यंत निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कदायक घटना घडली. हत्याकेल्यानंतर ११२ नंबरवर फोन करून पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्याला अटक कर्ली आहे. ही ५ ऑगस्टच्या मध्यरात्री महालक्ष्मीनगर, आपटेनगर परिसरात घडली.
नेमकं काय घडलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी परशुराम पाटील हा मूळचा राधानगरी तालुक्यातील सावर्डे पाटण येथील असून,सध्या महालक्ष्मीनगर येथे आपल्या पत्नी अस्मिता (वय 44), दोन मुले आणि वडिलांसोबत भाड्याच्या घरात राहत होते. आरोपी परशुराम पाटील उद्यमनगरमधील फौंड्रीत काम करत होता. त्यांची मुले बाहेर होती आणि वडील दुसर्या खोलीत झोपले होते. तेव्हाच परशुराम आणि अस्मिता यांच्यात पैश्यांच्या कारणावरून वाद झाला. त्याच वादाच्या रागात परशुरामाने त्याच्या पत्नीचा गळा दाबून बेशुद्ध केलं, त्यानंतर घरातल्या चाकूने गळा कापून तिचा खून केला. नांतर त्यांनी स्वतःहून पोलिसांना फोन करून घटनेची कबुली दिली.