पालघर मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मालकिणीला जाब विचारायला गेलेल्या कर्मचाऱ्यांच्या अंगावर कार घातल्याचा धक्कदायक प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
नेमकं काय प्रकरण?
मिळालेल्या माहितीनुसार, पालघर पूर्वेच्या वेवूर येथील मस्तांग इंटरप्राइजेस या कंपनीतील कामगारांना पूर्वसूचना न देता कामावरून कमी करण्यात आले. १२ तास काम करा, नाही तर घरी बसा असं फर्मान कंपनीने सोडलं होतं. त्यामुळे कामगारांनी कंपनीच्या मालकीणीशी बोलण्यासाठी तिची कार थांबवण्याचा प्रयत्न केला. कामगारांनी पुकारलेल्या आंदोलनादरम्यान संतप्त झालेली कंपनीची मालकीण नाजनीन कात्रक यांनी कामगारांच्या अंगावर कार घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याचा व्हिडीओ देखील समोर आला आहे.
संतप्त मालकिणीने गाडी अंगावर घातल्याने विद्या यादव (27) ही कामगार महिला गंभीर जखमी झाली आहे. या प्रकरणी सुरुवातीला पालघर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यासाठी टाळाटाळ केली होती. मात्र काही काळानंतर कंपनी मालकिणीच्या विरोधात हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ड्रायव्हरला खाली उतरायला सांगून…
महत्वाचं म्हणजे यावेळी अपंग असलेल्या कंपनी मालक नाजनीन यांनी ड्रायव्हरला खाली उतरायला सांगून स्वतः कारचा ताबा घेतला. त्यानंतर कामगारांच्या अंगावर कार घातली. यामध्ये विद्या रामकुमारी यांच्या पायावरून गाडी नेल्याने ती जखमी झाली. त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
आजारपण आणि एकटेपणाला कंटाळून वयोवृद्ध जोडप्यांनी उचलले टोकाचे पाऊल
नागपूर: नागपूरमधून एक हृदय पिळवटून टाकणारा प्रकार समोर आला आहे. आजारपण, वृद्धावस्था आणि एकटेपणाला कंटाळून एका वृद्ध दाम्पत्याने विष प्राशन करत आत्महत्या करण्याचं प्रयत्न केला. या घटनेत ८० वर्षीय गंगाधर हरणे यांचा मृत्यू झाला आहे. तर त्यांची पत्नी निर्मला हरणे (70 वर्ष) या रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहेत. ही घटना नागपूरच्या सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील समर्थनगर परिसरात बुधवारी घडली.
गंगाधर हरणे आणि निर्मला हरणे यांचा मुलगा नोकरीसाठी नागपूरच्या बाहेर राहतो. तर मुलीचा विवाह झाल्यानंतर सासरी राहते. त्यामुळे नागपुरातील घरात हरणे दांपत्य एकटेच राहत होते. त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहून ठेवले. सुसाईड नोटमध्ये वृद्धावस्था, आजारपण आणि एकटेपणाला कंटाळून आत्महत्या केल्याचे नमूद करण्यात आले आहे.
मांजरीची क्रूर हत्या, इंस्टाग्रामवर व्हिडीओ पोस्ट केला अन्…; आरोपीला ठोकल्या बेड्या