Disha Patani: बॉलीवूड हादरलं! अभिनेत्री दिशा पटानीच्या घरावर गोळीबार; 'या' गॅंगस्टर्सनी घेतली जबाबदारी
दिशा पटानी बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री
बरेली येथील घराबाहेर गोळीबार
रोहित गोदारा आणि गोल्डी ब्रार टोळीने घेतली जबाबदारी
Disha Patani Firing News: बरेलीमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री दिशा पटाणीच्या घरावर गोळीबार झाला आहे. बरेली येथील घरावर हा गोळीबार झाला आहे. या गोळीबाराची म्हणजेच हल्ल्याची जबाबदारी रोहित गोदारा आणि गोल्डी ब्रार टोळीने घेतली आहे.
अभिनेत्री दिशा पटाणी उत्तर प्रदेशच्या बरेली येथे वास्तव्य करते. दरम्यान तिच्या बरेली येथील घरावर गोळीबार करण्यात आला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
दिशा पटाणी आणि तिच्या कुटुंबाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. पोलिसांचा मोठा बंदोबस्त तिच्या घराभोवती ठेवण्यात आला आहे. या घटनेतील आरोपींचा शोध सुरू आहे. हल्ला करण्यामाचा हेतु काय होता, याचा तपास केला जात आहे. अभिनेत्री दिशा पटाणी हिच्या घरावर गोळीबार करण्याची जबाबदारी रोहित गोदारा आणि गोल्डी ब्रार यांनी घेतल्याचे समजते आहे. दोन बदमाश गाडीवरून आले आणि त्यांनी चार ते पाच राऊंड फायरिंग केल्याचे समोर आले आहे.
रोहित गोदारा आणि गोल्डी ब्रार यांची पोस्ट काय?
रोहित गोदारा आणि गोल्डी ब्रार यांनी पोस्ट करत या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. हा हल्ला दिशाची बहीण खुशबू पटाणी यांनी संत प्रेमानंद महाराज आणि अनिऋद्धाचार्य यांच्याबाबत केलेल्या व्यक्तव्यासाठी आहे. भविष्यात कोणत्याही धर्म किंवा संतांविषयी भाष्य केल्यास परिणाम भोगण्यास तयार राहावे असा इशारा सोशल मीडियाच्या पोस्टमधून देण्यात आला आहे. रोहित गोदारा आणि गोल्डी ब्रार यांनी काही काळाने ही सोशल मीडिया पोस्ट डिलीट केल्याचे समोर आले आहे.
अमेरिकेच्या डेन्व्हर शहरातील शाळेत गोळीबाराचा थरार
अमेरिकेच्या (America) डेन्व्हर शहरात एक दु:खद घटना घडली आहे. एका शाळेत अंदाधुंद गोळीबार करण्यात आला आहे. या हल्ल्यात ३ विद्यार्थी गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे. जेफरसन काऊंटी विभागाच्या प्रवक्त्या जॅकी केली यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना डेन्व्हरच्या शहरात एव्हरग्रीन हायस्कूल मध्ये घडली. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण पसरलेले आहे.
US Firing : अमेरिकेच्या डेन्व्हर शहरातील शाळेत गोळीबाराचा थरार ; हल्ल्यात ३ विद्यार्थ्यी गंभीर जखमी
जखमींना रुग्णालयात दाखल
माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी विद्यार्थ्यांना कोरोरॅडोच्या लेकवुडमधील सेंट अँथनी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. परंतु तिन्ही विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. या गोळीबारामध्ये हल्लेखोरही जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.