Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 18 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Plane Crash: लष्करी विमान कोसळून झालेल्या भीषण अपघातात आतील सर्व १७ जणांचा मृत्यू; हवाई सुरक्षेवर प्रश्नचिन्ह!

Plane Crash: सायबेरिया थरारला! केमेरोवोमध्ये AN-12 लष्करी विमान कोसळून मोठी दुर्घटना; आगीच्या लोळात खाक झाले विमान, १७ जणांचा मृत्यू! हवाई सुरक्षेवर गंभीर प्रश्न... पाहा सविस्तर वृत्त!

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Nov 18, 2026 | 04:40 PM
Plane Crash: लष्करी विमान कोसळून झालेल्या भीषण अपघातात आतील सर्व १७ जणांचा मृत्यू; हवाई सुरक्षेवर प्रश्नचिन्ह!

Plane Crash: लष्करी विमान कोसळून झालेल्या भीषण अपघातात आतील सर्व १७ जणांचा मृत्यू; हवाई सुरक्षेवर प्रश्नचिन्ह!

Follow Us
Follow Us:
  • रशियाच्या सायबेरियात लष्करी विमान कोसळून १७ जणांचा मृत्यू
  • हवेतच विमानाला आग लागल्याने ताबा सुटून जमिनीवर कोसळले व स्फोट
  • बचावकार्य युद्धपातळीवर सुरू असून अपघाताची उच्चस्तरीय चौकशी सुरू
Plane Crash: रशियाच्या सायबेरिया भागातून एक अत्यंत दुःखद आणि मोठी बातमी समोर आली आहे. केमेरोवो परिसरामध्ये एक लष्करी मालवाहू विमान जमिनीवर कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेत विमानातील सर्व १७ जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण रशियात शोककळा पसरली असून, हवाई सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

हेही वाचा:Affair News: पत्नी खोलीत न दिसल्याने शेजाऱ्याच्या दारात पोहोचला अन् हादरला; संसाराचा अंत करत घेतला टोकाचा निर्णय; घडलं तरी काय?

नेमकी घटना कशी घडली?

रशियन वृत्तसंस्थांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, AN-12 या प्रकारचे हे लष्करी विमान मंगळवारी केमेरोवो शहराच्या दक्षिणेकडील यागुनोवो (Yagunovo) गावाजवळ दुर्घटनाग्रस्त झाले. अनेक प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या धाकधूक वाढवणाऱ्या माहितीनुसार, हे विमान हवेत असतानाच अचानक त्याच्या एका भागाला भीषण आग लागली होती. आगीच्या लोळांमुळे विमानाचा तांत्रिक ताबा सुटला आणि काही क्षणांतच ते वेगाने जमिनीच्या दिशेने खाली कोसळू लागले. जमिनीवर आदळताच विमानाचा अत्यंत मोठा स्फोट झाला, ज्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

प्रशासकीय प्रतिसाद आणि बचावकार्य

या अपघातानंतर तातडीने आपत्कालीन बचाव पथके घटनास्थळी रवाना झाली आणि युद्धपातळीवर मदतकार्य सुरू करण्यात आले. मात्र, विमानाची झालेली भीषण अवस्था पाहता आतील एकाही प्रवाशाला किंवा कर्मचाऱ्याला वाचवण्यात यश आले नाही.

केमेरोवोचे राज्यपाल इल्या सेरेदयुक (Ilya Seredyuk) यांनी स्वतः सोशल मीडिया आणि व्हिडिओ संदेशाच्या माध्यमातून या दुर्घटनेला दुजोरा दिला आहे. यागुनोवो परिसरात ही दुर्घटना घडल्याचे स्पष्ट करत त्यांनी आपण तातडीने स्वतः घटनास्थळी दाखल झाल्याची माहिती दिली. प्रशासकीय यंत्रणा आणि मदत पथके पूर्ण क्षमतेने बचावकार्यात गुंतली असून आवश्यक ती सर्व मदत पुरवली जात असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा: Robbery News: तुकाराम मुंडे यांच्या बंगल्यावर दरोडेखोरांचा हल्ला; चाकूचा धाक दाखवून लांबवले सोने आणि रोकड!

तपास सुरू

दरम्यान, हे विमान नेमके कोणत्या तांत्रिक बिघाडामुळे कोसळले किंवा त्यामागे इतर काही घातपात आहे का, याचा सखोल तपास संबंधित उच्चस्तरीय अधिकाऱ्यांकडून सुरू करण्यात आला आहे. AN-12 सारख्या विश्वासार्ह मानल्या जाणाऱ्या विमानाच्या अपघातामुळे तांत्रिक बाबींवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: रशियात कोसळलेले विमान कोणत्या प्रकारचे होते आणि त्यात किती लोक होते?

    Ans: रशियाच्या केमेरोवोमध्ये कोसळलेले विमान AN-12 प्रकारचे लष्करी मालवाहू विमान होते. या अपघातात विमानातील सर्व १७ जणांचा मृत्यू झाला आहे.

  • Que: ही दुर्घटना नेमकी कुठे आणि कशी घडली?

    Ans: ही दुर्घटना मंगळवारी सायबेरियातील केमेरोवो शहराच्या दक्षिणेकडील यागुनोवो (Yagunovo) गावाजवळ घडली. प्रत्यक्षदर्शींच्या मते, हवेत असताना विमानाला आग लागली आणि ते जमिनीवर कोसळून स्फोट झाला.

  • Que: प्रशासनाकडून काय कारवाई करण्यात आली आहे?

    Ans: केमेरोवोचे राज्यपाल इल्या सेरेदयुक यांनी घटनास्थळी भेट देऊन बचावकार्याची पाहणी केली. सध्या मदतकार्य सुरू असून, अपघाताच्या कारणांचा सखोल तपास उच्चस्तरीय अधिकाऱ्यांकडून केला जात आहे.

Web Title: Russia siberia military plane crash kemerovo yagunovo 17 dead sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 18, 2026 | 04:40 PM

Topics:  

  • airplane news
  • plane crash news
  • Russian

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.