सौजन्य फोटो - AI Gemini
मिळालेल्या माहितीनुसार, हरदोई येथील रहिवासी असलेला एक तरुण आपल्या पत्नी आणि दोन चिमुकल्या मुलींसोबत कामासाठी लुधियाना येथे राहायला गेला होता. तेथे एका भाड्याच्या घरात त्यांचं छोटासा आणि आनंदी संसार सुरू होता. सगळं काही सुरळीत चाललं होतं, मात्र पाच महिन्यांपूर्वी त्यांच्या आयुष्यात एका व्यक्तीची एन्ट्री झाली आणि सर्व चित्रच पालटून गेलं.
काही दिवसांपूर्वी गावातीलच एक तरुण (ज्याचे नाव घनश्याम असल्याचे समोर येत आहे) त्यांच्याच घरात राहण्यासाठी आला होता. सुरुवातीला सर्व काही सामान्य वाटत होतं, पण हळूहळू नवऱ्याच्या मनात पत्नीच्या वर्तणुकीबद्दल शंकेची पाल चुकचुकायला लागली. त्याला काहीतरी गडबड असल्याचा संशय येत होता. त्याने या गोष्टीला विरोधही केला होता, पण त्यानंतर परिस्थिती अजूनच बिघडत गेली. त्या व्यक्तीने नवऱ्याला एका गोष्टीचे चॅलेंज दिले होते, असेही सांगण्यात येत आहे, ज्यामुळे नवऱ्याच्या मनातील राग आणि संशय अधिकच तीव्र झाला.
मंगळवारी रात्री संबंधित तरुणाने एक प्लॅन केला. तो घरातून बाहेर गेला, पण रात्री उशिरा साधारण १ वाजता तो पुन्हा घरी परतला. घरी गेल्यानंतर त्याला पत्नी खोलीत दिसली नाही, ज्यामुळे त्याचे काळीज धडधडायला लागलं. तो तिला शोधत शेजारच्या खोलीकडे गेला आणि तिथेच त्याने जे पाहिलं, त्याने त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण त्याची पत्नी त्याच व्यक्तीसोबत (घनश्याम) आक्षेपार्ह स्थितीत दिसून आली.
त्या रात्री पती-पत्नीमध्ये जोरदार वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, दुसऱ्या दिवशी पतीने टोकाचा निर्णय घेतला. त्याने विष प्यायले आणि त्याचवेळी पत्नीचा गळा दाबून तिच्यावर चाकूने सपासप वार केले. दोघांच्या या झटापटीत तरुणाला देखील चाकू लागला.
या घटनेनंतर गंभीर जखमी झालेल्या दोघांनाही आधी लुधियानाच्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, परंतु नंतर त्यांना हरदोई मेडिकल कॉलेजमध्ये हलवण्यात आले. सध्या दोघांचीही स्थिती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे. या धक्कादायक प्रकरणाचा तपास अजून सुरू आहे.
Ans: हरदोईच्या तरुणाने पत्नीला गावातीलच एका व्यक्तीसोबत (घनश्याम) आक्षेपार्ह स्थितीत पाहिल्यामुळे संशयाने टोकाचे पाऊल उचलले.
Ans: तरुण मंगळवारी रात्री अचानक घरी परतला आणि त्याने पत्नीला शेजाऱ्याच्या खोलीत घनश्यामसोबत रंगेहात पकडले.
Ans: विष प्राशन करून आणि चाकूने हल्ला करून दोघांनीही आत्महत्या/खुनाचा प्रयत्न केला, सध्या त्यांची स्थिती स्थिर असून हरदोई मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू आहेत.






