
crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )
काय नेमकं घडलं?
मृत सक्षमच्या आई आणि प्रेयसीने जिल्ह्याधिकारी कार्यालयासमोर अंगावर पेट्रोल टाकून जाळून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र सुदैवाने पोलिसांनी तातडीने त्यांना आवरते घेतले त्यामुळे अनर्थ टाळला. या घटनेमुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काही काळ तणाव पसरला होता. सक्षम ताटेच्या हत्याप्रकरणात दोन पोलीस कर्मचारी हे आरोपी असून त्यांना अटक करा अशी मागणी सक्षमच्या कुटुंबीयांनी केली आहे. याच मागणीसाठी आई -प्रेयसी यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला.यावेळी स्थानिकांनी पोलीस प्रशासनाविरुद्ध संताप व्यक्त केला.
प्रकरण काय नेमकं?
सक्षम ताटे आणि आचल मामीडवार यांची ओळख २०२२ मध्ये झाली होती. या दोघांचे प्रेम संबंध होते. घरच्यांना माहिती झाल्यानंतर आंचलच्या कुटुंबाने तिला घरात कोंडून ठेवले. तरीही यांचं प्रेम काही कमी झाले नाही. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून कुटुंबाने सक्षमवर POCSO कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. त्यानंतर प्रकरण हाताळणाऱ्या एका महिला पोलिसाने स्पष्ट सांगितले होते की, दोघांचे नाते हे परस्पर संमतीने आहे, POCSO लागू होत नाही. परंतु आचलच्या कुटुंबाने हे ऐकण्यास पूर्ण नकार देत सक्षमविरुद्ध तक्रार कायम ठेवली.
आंचल ही जेव्हा १८ वर्षांची झाली तेव्हा तिने स्वतः पोलीस स्टेशनमध्ये जाऊन निवेदन दिले की तिला POCSO प्रकरण मागे घ्यायचे आहे, अशी माहिती आता समोर आली होती. सक्षमचे कुटुंब आंबेडकरवादी बौद्ध असून आचलचे कुटुंब पद्मशाली हिंदू आहे. जातभेद आणि प्रतिष्ठा या कारणामुळे मामीडवार कुटुंब या नात्याला तीव्र विरोध करत होते. या विरोधात त्यांनी सक्षमवर मानसिक दबाव टाकायला सुरुवात केली. एव्हढेच नाही तर मामीडवार कुटुंबाने सक्षमला हिंदू धर्म स्वीकारल्यास नातेसंबंध मान्य करू असे सांगितले होते. आणि सक्षमनेही आचलसाठी धर्मांतर करण्याची तयारी दर्शवली. मात्र कुटुंबाने दाखवलेला स्वीकार हा केवळ नाटक असल्याचे नंतर समोर आले. त्यांनी एक दिवस सक्षमला रस्त्यात गाठून त्याची हत्या केली. सक्षमचा मृतदेह घरी येताच प्रेयसी आणि त्याच्या कुटुंबाने एकच टाहो फोडला. सक्षमच्या प्रेयसीने त्याच्या मृतदेहासोबतच लग्न केले. तिने आपल्या वडील आणि भावना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली.
Ans: प्रेमसंबंध, जातभेद आणि ऑनर किलिंगमधून त्याची हत्या झाल्याचा आरोप आहे.
Ans: दोन पोलिसांवर कारवाई न झाल्याने न्यायासाठी आंदोलन करत टोकाचा निर्णय घेतला.
Ans: पोलिसांनी हस्तक्षेप करून दोघींना वाचवले, मात्र जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तणाव पसरला.