
Sambhajinagar Crime news:
Sambhajinagar Crime news: छत्रपती संभाजीनगमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुले चोरणाऱ्या टोळीच्या संशयावरून एकाला नागरिकांनी जबर मारहाण केली. या मारहाण करण्यात आली. पण पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत एका व्यक्तीला ताब्यात घेतल्याने मॉब लिंचिंगचा प्रकार टळला. मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगरातील वाळूज भागात बुधवारी (३ डिसेंबर) सायंकाळी एका वीस महिन्याच्या मुलाचे अपहरण करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली. मुलाला उचलून नेण्याचा प्रयत्न करताना घरातील मुलीने आरडाओरड केल्यामुळे आईने तत्काळ धाव घेत पाठलाग केला. महिलांच्या मदतीने एक आरोपी पकडण्यात आला. संतप्त नागरिकांनी त्यास चोप दिला. पोलिसांनी हस्तक्षेप केल्यामुळे पुढील अनर्थ टळला.
कोल्हापुरातील सीपीआरमधील रक्त तपासणीचा पर्दाफाश; गरीब रुग्णांची होणारी लूट उघडकीस
मिळालेल्या माहितीनुसार, वाळूज येथील रामराई रोड परिसरात घराच्या समोर लहान मुलगा व त्याची बहीण खेळत होते. त्यावेळी गेटमधून आलेल्या एका व्यक्तीने मुलाला उचलले. हे पाहून बहिणीने आरडाओरड करत घरात धाव घेताच आई बाहेर आली. तिने पाहिले असता तीन जण मुलाला घेऊन जात असल्याचे दिसले. महिलेने आरडाओरड करत त्यांचा पाठलाग सुरू केला. परिसरातील इतर महिलाही मदतीला धावल्या आणि त्यापैकी एका व्यक्तीस पकडण्यात यश मिळाले. दोन आरोपी मात्र पसार झाले. (crime news)
घटनास्थळी जमाव जमल्याने पकडलेल्या व्यक्तीस मारहाण करण्यात आली. मुलांचे अपहरण करणारी टोळी फिरत असल्याच्या अफवेमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपीला ताब्यात घेतले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली.पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
रामराई रस्त्यावर मोठा जमावाकडून एका माणसाला मारहाण होत आहे. अशी माहिती मिळताच वाळूज पोलिसांनी वेळीच घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले. आणि जमावाची समजूत काढून शांत केले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. नाहीतर जमावाकडून झालेल्या मारहणीतून त्याचा जीव गेला असता, दरम्यान, वाळूज पोलिसांनी आरोपीची चौकशी करून त्याच्यावर प्रतिबंधक कारवाई केली. याबाबत वाळूज पोलिस ठाण्याचे निरीक्षक शिवचरण पांढरे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, – मुले चोरणारी कोणतीही टोळी आलेली नाही. आमची रात्रंदिवस गस्त असते. तसा प्रकार अद्यापही दिसून आला नाही. हा जो प्रकार घडला, तो केवळ अफवेमुळे घडला. कोणीही अफवांवर विश्वास ठेवू – नका, पोलिसांशी संपर्क साधा असे आवाहनही करण्यात आले आहे.
छत्रपती संभाजीनगर (शहर प्रतिनिधी) घर बांधण्यासाठी ३ लाख रुपये माहेरहून आण असा तगादा लावत विवाहितेला वारंवार शिवीगाळ व मारहाण करुन छळ करण्यात आला. ही घटना २३ एप्रिल २०२४ ते २० डिसेंबर २०२४ दरम्यान रमानगरात घडली. प्रकरणात २० वर्षीय विवाहींनि फिर्याद दिली. त्यानुसार, पत्ती विजय गंगावणे, सासू संगीता गंगावणे, सासरे विजय गंगावणे, नणंद आम्रपाली दाणे, दीपाली बनकर, रुपाली मोकळे तसेच सुजाता (सर्व छत्रपती संभाजीनगर) यांनी सतत वाद घालून पीडितेचा मानसिक छळ केला. तू काळी आहेस असे म्हणत तिचा वेळोवेळी अपमान करण्यात आला. शिवीगाळ करून मारहाण करण्यात आल्याचेही तिने तक्रारीत नमूद केले आहे.
लग्नाच्या वेळी पन्नास हजार रुपये स्वीकारूनही सासरच्या मंडळींनी तिला पुन्हा माहेरहून घर बांधण्यासाठी तीन लाख रुपये आणण्याचा तगादा लावला. पैसे आणण्यास नकार दिल्यावर तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे. प्रकरणात उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हवालदार फिरंगे करीत आहेत.