संग्रहित फोटो
हा प्रकार घोरपडी परिसरातील बी. टी. कवडे रोडवर १५ सप्टेंबर ते १ डिसेंबर २०२५ या कालावधीत घडल्याचे तक्रारीत नमूद आहे. या महिलेवर यापूर्वीही अशाच स्वरूपाचा कोथरूड पोलिसांत पहिला गुन्हा नोंद झाल्यानंतर हा दुसरा गुन्हा नोंद केला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, महिलेने स्वतःला हायकोर्टातील वकील असल्याचे सांगत तक्रारदार यांच्याशी ओळख केली. या ओळखीनंतर ते सातत्याने संपर्कात राहिले. नंतर तक्रारदार यांच्या पत्नीने दाखल केलेल्या प्रकरणात ती मदत करीत असल्याचे सांगून दोघांत ओळख वाढवली आणि जवळीक झाली. नंतर तिने लग्नासाठी तगादा लावला. मात्र, लग्नास नकार दिल्याने या महिलेने त्याला व त्याच्या आईला फोन करून अश्लील शिवीगाळ केली. ‘माझ्याशी लग्न कर, अन्यथा दोन लाख रुपये दे; नाहीतर तुझ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करीन,’ अशी धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यानूसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मुंढवा पोलिस पुढील तपास करीत आहेत.
दरम्यान, या महिलेने कोल्हापूर येतील एका पुरूषाचा छळ केल्याप्रकरणी कोथरूड पोलिसांत गेल्या आठवड्यात गुन्हा नोंद झाल्यानंतर हा दुसरा गुन्हा नोंद झाला आहे. या महिलेने अनेकांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला होता.






