आर्यन खान ड्रग्स प्रकरणी (Aaryan Khan Case) रोज काही ना काही धक्कादायक बाबी समोर येत आहे. या कथित खंडणी कांडात समीर वानखेडे आणि अभिनेता शाहरुख खानबाबत मोठी बातमी समोर येत आहे समीर वानखेडे यांनी शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयात सीबीआयच्या कारवाईला आव्हान दिले आहे. आर्यन खान प्रकरणी सूडाच्या भावनेने कारवाई केली जात असल्याचा दावा वानखेडे यांनी याचिकेत केला आहे. तसेच, समीर वानखेडे आणि शाहरुख खानमध्ये अनेक वेळा संभाषण झाल्याची माहिती समोर येत आहे.
[read_also content=”शाहरुखकडून करोडोंच्या वसुलीत समीर वानखेडेला मिळणार होते ‘एवढे’ पैसै; आकडा ऐकून चक्रावून जाणार, जाणून घ्या काय होती प्लॅनिंग https://www.navarashtra.com/latest-news/sameer-wankhede-suppose-to-get-8-crore-rupees-from-revovery-from-shahrukh-khan-in-aaryan-khan-drug-case-nrps-401532.html”]
समीर वानखेडेवर (Sameer Wankhede) आर्यन खानच्या कुटुंबाकडून 25 कोटी रुपये वसूल करण्याचा प्लॅन केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी आर्यन खानला आरोपी न करण्यासाठी 25 कोटी रुपयांची लाच मागितल्याचं सांगण्यात येत आहे. या आरोपाखाली सीबीआयने समीर वानखेडविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. सीबीआयने अलीकडेच वानखेडे आणि इतर चार जणांविरुद्ध एफआयआर नोंदवला होता. वानखेडे यांनी उच्च न्यायालयाच्या सुट्टीतील खंडपीठासमोर दाखल केलेल्या याचिकेत सीबीआयकडे दाखल केलेल्या एफआयआरच्या संदर्भात आपल्यावर कोणतीही जबरदस्ती कारवाई करू नये, अशी विनंतीही केली आहे. वानखेडे यांच्या अर्जावर खंडपीठाचा निर्णय येणे बाकी आहे.