Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Khandala Ammonium Nitrate Truck Case: खंडाळ्यात तब्बल १०५ टन स्फोटक अमोनियम नायट्रेट जप्त; चालकांसह कंपनी अधिकाऱ्यांवर गुन्हा

Khandala Crime: संशयास्पद स्थिती पाहताच कर्मचाऱ्यांनी तात्काळ खंडाळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांना माहिती दिली. त्यानंतर महेंद्र जगताप यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेऊन गाड्यांची पाहणी केली.

  • By anuradha sagar
Updated On: Sep 29, 2026 | 02:50 PM
Khandala News, Satara Police, Ammonium Nitrate, Crime News,

Khandala News, Satara Police, Ammonium Nitrate, Crime News,

Follow Us
Follow Us:
  • खंडाळा तालुक्यातील पारगाव येथे १०५ टन स्फोटक अमोनियम नायट्रेट जप्त
  • सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवून ३ ट्रकद्वारे केली जात होती तेलंगणाकडे वाहतूक
  • रात्रगस्तीवरील पोलिसांच्या सतर्कतेमुळे बसस्थानकाजवळ उघडकीस आला प्रकार
Khandala Crime : खंडाळा तालुक्यातील पारगाव-खंडाळा येथे अमोनियम नायट्रेट या स्फोटक पदार्थाची ३ मालट्रकमधून एकूण १०५ टन सुरक्षिततेच्या मानकाचे उल्लंघन करीत वाहतूक केल्याप्रकरणी तीन मालट्रक चालकांसह पनवेल,तळोजा येथील फर्टिलायझर कंपनीच्या वाहतूक अधिका-यांविरुध्द खंडाळा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेमुळे खंडाळा तालुक्यात खळबळ उडाली आहे.खंडाळा पोलीसांनी दाखविलेल्या तत्परतेने पुढील मोठा अनर्थ टळला आहे.

Raj Thackeray-Rahul Gandhi Politics: राज ठाकरे अन् राहुल गांधी एकत्र येणार? बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

 

पनवेल, तळोजा येथील दिपक फर्टिलायझर येथून तेलंगणा राज्यातील हैद्राबादमार्गे नलगोंडाजवळील चित्याल याठिकाणी मालट्रक (क्रं-टिएस-०२-युडी-३१७०,टिएस-०२-युडी-३१७७,टिएस-०२-३१७२)मधून तब्बल १०५ टन अमोनियम नायट्रेट या स्फोटक पदार्थाची सुरक्षिततेच्या नियमांचे उल्लंघन करीत पारगाव-खंडाळा येथील एसटी बसस्थानकाजवळ उभे असल्याचे खंडाळा पोलीस स्टेशनच्या रात्रगस्तीवर असलेल्या पोलीस कर्मचारी यांच्या निदर्शनास आले. त्यानुसार याबाबतची माहिती संबंधितांनी तत्काळ खंडाळा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांना दिली.

त्यानंतर पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांनी तत्काळ घटनास्थळी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसहित धाव घेतली.यावेळी संबंधित मालट्रक चालक रुपेशकुमार परमेश्वर तांती (वय४६,रा.सरकपुर,तालुका बलदोर जि.खागरिया राज्य बिहार),अजकुमार अशोक प्रसाद(वय ३६,रा.गोपालवाडा जिल्हा मध्यपुरा राज्य बिहार),फुलचंद झालु पासवान (वय ४६,रा.महेशकुट,तालुका गोगरी जिल्हा खगडिया राज्य बिहार) व दिपक फर्टिलायझर कंपनीचे वाहतूक अधिकारी यांनी अमोनियम नायट्रेट हा स्फोटक पदार्थ असल्याचे माहित असतानाही वाहतूक परवाना नियमांचे व सुरक्षिततेच्या नियमांचा भंग केल्याप्रकरणी खंडाळा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिकाऱ्यांना आता ‘तिसरा डोळा’; वाहन तपासणी होणार पारदर्शक, 10 बॉडीवेअर कॅमेरे मिळाले

याप्रकरणी तीन मालट्रकसह तब्बल १०५ टन अमोनियम नायट्रेट जप्त करीत खंडाळा पोलीसांनी सुरक्षिततेच्यादृष्टीने संबंधित मालट्रक जप्त केली आहे. या   घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी शासनाच्या सुरक्षा विभागाचे अधिकारी,सातारा येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत यादव व अधिकारी कर्मचारी यांनी भेट देऊन पाहणी केली.याप्रकरणी मालट्रक चालक रुपेशकुमार परमेश्वर तांती,अजकुमार अशोक प्रसाद,फुलचंद झालु पासवान व दिपक फर्टिलायझर कंपनीचे वाहतूक अधिकारी यांच्याविरुध्द खंडाळा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेची पोलीस अंमलदार सुरज पवार यांनी खंडाळा पोलीस स्टेशनला फिर्याद दिली असून पोलीस उपनिरीक्षक शितल माने ह्या करीत आहे.

 

Web Title: Satarakhandala police seize 105 ton explosive ammonium nitrate deepak fertilisers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 29, 2026 | 02:50 PM

Topics:  

  • khandala news
  • Satara Police

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.