Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 4 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sugarcane Agitation: कर्तव्य प्रथम! नागठाण्यात ३१ तासांपासून रास्ता रोको; SP Nikhil Pingle स्वतः रस्त्यावर

Sugarcane Agitation: आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनला असताना संभाव्य कोंडी टाळण्यासाठी पोलिसांनी पर्यायी मार्ग, सेवा रस्ते आणि महत्त्वाच्या चौकांमधील वाहतूक व्यवस्थेवर विशेष लक्ष दिले.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 04, 2026 | 09:23 PM
Swabhimani Shetkari Protest

Swabhimani Shetkari Protest

Follow Us
Follow Us:
  • महामार्गावरील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक स्वतः रस्त्यावर
  • नागठाण्यात ३१ तासांपासून रास्ता रोको; १४० पोलिसांचा फौजफाटा तैनात
  • वाहतूक कोंडी टाळण्यासाठी निखिल पिंगळे यांचे प्रत्यक्ष नियंत्रण
सातारा/Sugarcane Agitation: स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर नागठाणे परिसरात गेल्या ३१ तासांपासून सुरू असलेल्या रास्ता रोको आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक (Raju Shetti) व्यवस्थेवर मोठा ताण निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर प्रवाशांची गैरसोय कमी करून वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी स्वतः रस्त्यावर उतरून परिस्थितीवर लक्ष केंद्रित केले. केवळ कार्यालयातून सूचना देण्याऐवजी प्रत्यक्ष घटनास्थळी उपस्थित राहून त्यांनी वाहतूक नियोजनाची जबाबदारी सांभाळली.

आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनला असताना संभाव्य कोंडी टाळण्यासाठी पोलिसांनी पर्यायी मार्ग, सेवा रस्ते आणि महत्त्वाच्या चौकांमधील वाहतूक व्यवस्थेवर विशेष लक्ष दिले. अजंठा चौक, बॉम्बे रेस्टॉरंट चौक यांसह प्रमुख चौकांमध्ये पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला. सेवा रस्त्यांवरील वाहतुकीचे नियमन करताना वाहनचालकांना अडचण निर्माण होऊ नये, यासाठीही विशेष खबरदारी घेण्यात आली.

Satara News : पाच हजारांच्या पहिल्या हप्त्यासाठी स्वाभिमानीने महामार्ग रोखला! नागठाण्यात शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन

या संपूर्ण व्यवस्थेसाठी सुमारे १४० पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. वाहतुकीची परिस्थिती, वाहनांच्या रांगा आणि प्रवाशांची सुरक्षितता यांचा आढावा घेत पोलीस अधीक्षक पिंगळे यांनी प्रत्यक्ष रस्त्यावरून यंत्रणेला दिशा दिली. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्याबरोबरच सर्वसामान्य प्रवाशांची होणारी गैरसोय कमी करणे, हे पोलिसांसमोरील दुहेरी आव्हान होते.

लोकशाही मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनाच्या परिस्थितीत संयम राखत वाहतूक व्यवस्थापन करणे ही पोलिसांसाठी कसोटीची बाब असते. अशा वेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी उपस्थित राहून यंत्रणेचे नेतृत्व करणे कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवणारे ठरते. पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी स्वतः रस्त्यावर उपस्थित राहून केलेल्या नियंत्रणामुळे महामार्गावरील वाहतूक व्यवस्थापनाला वरिष्ठ पातळीवरून थेट दिशा मिळाली. कर्तव्याला प्राधान्य देत प्रत्यक्ष मैदानात उतरलेल्या त्यांच्या कार्यपद्धतीची या निमित्ताने चर्चा होत आहे.

Raju Shetti: राजू शेट्टींच्या आंदोलनाआधीच पोलिसांची नोटीस; किणी टोल नाक्यावर चक्काजाम केल्यास कारवाईचा इशारा

साला प्रतिटन ५ हजार रुपये दर मिळावा आणि दर जाहीर केल्याशिवाय साखर कारखाने सुरू करू नयेत, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी आंदोलनाची भूमिका घेतली आहे. मात्र, हे आंदोलन सुरू होण्यापूर्वीच कोल्हापूर पोलिसांनी शेट्टी यांना भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ मधील कलम १६८ अन्वये नोटीस बजावली आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: नागठाण्यात किती तासांपासून रास्ता रोको सुरू आहे?

    Ans: नागठाण्यात ३१ तासांपासून रास्ता रोको सुरू आहे.

  • Que: सातारा जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक का चर्चेत आले आहेत?

    Ans: महामार्गावरील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी स्वतः रस्त्यावर परिस्थिती सांभाळली.

Web Title: Satara police sp nikhil pingale present to control sugarcane agitation nh 4 swabhimani shetkri raju shetti tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 04, 2026 | 09:23 PM

Topics:  

  • Raju Shetti
  • Satara Police
  • Sugarcane Farmers

संबंधित बातम्या

Satara News : पाच हजारांच्या पहिल्या हप्त्यासाठी स्वाभिमानीने महामार्ग रोखला! नागठाण्यात शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन
1

Satara News : पाच हजारांच्या पहिल्या हप्त्यासाठी स्वाभिमानीने महामार्ग रोखला! नागठाण्यात शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन

Raju Shetti: राजू शेट्टींच्या आंदोलनाआधीच पोलिसांची नोटीस; किणी टोल नाक्यावर चक्काजाम केल्यास कारवाईचा इशारा
2

Raju Shetti: राजू शेट्टींच्या आंदोलनाआधीच पोलिसांची नोटीस; किणी टोल नाक्यावर चक्काजाम केल्यास कारवाईचा इशारा

Raju Shetti : ऊसदरासाठी पुणे-बंगळुरू महामार्गावर स्वाभिमानीचा दुहेरी एल्गार! राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर-सांगलीचे श
3

Raju Shetti : ऊसदरासाठी पुणे-बंगळुरू महामार्गावर स्वाभिमानीचा दुहेरी एल्गार! राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर-सांगलीचे श

Raju Shetti: ऊसदरावरून संघर्ष पेटणार? राजू शेट्टींचा ३ नोव्हेंबरला महामार्ग रोखण्याचा इशारा
4

Raju Shetti: ऊसदरावरून संघर्ष पेटणार? राजू शेट्टींचा ३ नोव्हेंबरला महामार्ग रोखण्याचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.