बीड: बीडमध्ये पितापुत्रांना अमानुषपणे मारहाण करणाऱ्या सतीश उर्फ खोक्या भोसलेला Satish Bhosale अखेर पोलिसांनी अटक केली आहे. बीड पोलिस आणि उत्तर प्रदेश पोलिसांनी संयुक्त कारवाई करत प्रयागराज येथून त्याला ताब्यात घेतले. सतीश भोसले हा आमदार सुरेश धस यांचा निकटवर्ती मानला जातो. गेल्या काही दिवसांपासून तो फरार होता, मात्र पोलिसांनी सतत तपास करून त्याचा ठावठिकाणा शोधून काढला.
या प्रकरणात त्याच्यावर NDPS कायद्यांतर्गत गुन्हा दाखल असून, वनविभागानेही त्याच्याविरोधात तक्रार नोंदवली होती. आता त्याला महाराष्ट्रात आणून पुढील कारवाई केली जाणार आहे. मागील १५-२० दिवसांत त्याच्यावर तीन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले होते, त्यामुळे तो अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न करत होता. मात्र, पोलिसांनी त्याचा शोध घेत अखेर प्रयागराजमधून त्याला ताब्यात घेतले.
सतीश भोसलेला अटक झाली ही चांगली बाब आहे, अस म्हणत सुरेश धस म्हणाले की, मी कुठेही कॅमेरे घेऊन जात नव्हतो, कॅमेरेवालेच माझ्या मागे असायचे, त्यामुळे कुठे जाताना कॅमेरा घेऊन जावे, हे मी ठरवणार नाही. धनंजय मुंडे दवाखान्यात असल्याने मी त्यांना भेटायला गेलो होतो. हे खरं आहे. दुसरी गोष्ट अशी की, माझा पक्ष आणि माझा संबंध नसताना हे प्रकरण तेवत का ठेवलं, असं विचारलं. संतोष देशमुख हे भाजपचे बुथप्रमुख होत. त्यामुळे मी हे प्रकऱण तेवत ठेवलं. जोपर्यंत त्यांच्या खुन्यांना फाशी होत नाही तोपर्यंत मी प्रकरण तेवत ठेवणार.
महात्मा गांधींच्या दांडी यात्रेला 94 वर्षे पूर्ण; भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील महत्त्वाचा टप्पा
सुरेश धस म्हणाले की, ‘ सतीश भोसले प्रयागराजला मिळाल की आणखी कुठे मिळाला ते पोलिस पाहून घेतील. मी उदाहरण दिलं होतं की कृष्णा आंधळे काहीही करू शकतो. तो अजून फरार आहे. तोही सापडेल.सतीश भोसले प्रकरणात सुरेश धस यांना सहआरोपी करा, अशी मागणी अजय मुंडे यांनी केली आहे. अजय मुंडे लहान आहेत, लहान मुलांबाबत मी काही बोलणार नाही. धनंजय मुंडेंना माझं म्हणण आहे, याला त्याला बोलायला लावण्यापेक्षा तुम्ही बोला मग मी उत्तर देईन.विजय वडेट्टीवार म्हणतात खोका पण सापडला पाहिजे, असा प्रश्न विचारला असता, खोका, बोका, आणि त्याचा आकापण सापडला पाहिजे. पोलिसांनी चौकशी करावी, जेजे सापडतील त्या सर्वांना तुरुंगात टाकावं.