crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )
गडचिरोली : गडचिरोलीतून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लग्नाचे आमिष दाखवून २३ वर्षीय तरुणीचे लैंगिक शोषण करत अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी देसाईगंज शहरातील एका नामांकित सराफ व्यापारी आणि त्याच्या साथीदाराला पोलिसांनी अटक केली आहे. पीडित तरुणीची सराफ व्यवसायिकासोबत मैत्री झाली होती. त्यातून लागाचें आमिष दाखवत आरोपीने तिच्यावर अत्याचार केल्याचं पीडितेने तक्रारीत म्हंटल आहे. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे सुनील पंडलिक बोके (48) आणि अक्षय कुंदनवार (32) हे दोघेही देसाईगंजचे रहिवासी आहेत.
पुण्यात एकाला दगडाने मारहाण, उजव्या हाताचे हाड फ्रॅक्चर; नेमकं काय घडलं?
नेमकं काय घडलं?
आरोपी सुनील पंडलिक बोके याचे गांधी वार्ड परिसरात राधा ज्वेलर्स नावाचे सोन्या- चांदीचे दुकान आहे. या दुकानात कामाच्या निमित्ताने पीडित तरुणीचा संपर्क सुनील बोके याच्याशी झाला. त्यानंतर सुनीलने तिला लग्नाचे आमिष दाखवत तिच्याशी जवळीक साधली आहे. तिच्या विश्वासाचा गैरफायदा घेत त्याने विविध ठिकाणी तिच्यावर शारीरिक अत्याचार केले. तसेच तरुणीसोबत काही खासगी फोटो काढले आणि ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देखील दिली. सराफाकडून होणाऱ्या सततच्या मानसिक त्रासामुळे आणि धमक्यांमुळे पीडितेने त्याच्याशी संबंध तोडले आणि मोबाईल क्रमांक ब्लॉक केला.
त्यानंतर देखील सुनीलने त्याचा मित्र अक्षय कुंडांवर यांच्यामार्फत पीडितेवर पुन्हा दबाव आणण्याचा प्रयत्न केला. तसेच,मुलीचे काही फोटो आणि व्हिडीओ शोषलं मीडियावर शेअर करण्याची धमकी देखील दिली. त्यानंतर,पीडितेने जिल्ह्यातील देसाईगंज पोलिसांत आरोपींविरुद्ध तक्रार दाखल केली. दाखल तक्रारीनुसार पोलिसांनी सुनील बोके आणि अक्षय कुंदनवार या दोघाविरुद्ध गुन्ह्याची नोंद करून दोघांनाही अटक केली आहे. याप्रकरणी, दोघांनाही न्यायालयात हजर केले असता न्यायलायने 19 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
संतापजनक! फॅमिली फ्रेंडने केले घृणास्पद कृत्य, सहा वर्ष केलं लैंगिक अत्याचार
राज्यात गुन्हेगारीचं प्रमाण वाढत असून पुण्यातून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. पुण्यातील भरती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत माणुसकीला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. कुटुंबाचा जवळचा मित्र असलेल्या एका नराधमाने तब्बल सहा वर्षे आपल्या मित्राच्या मुलीचं लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी ४४ वर्षीय आरोपीला अटक केली आहे.
Accident News: मध्यरात्री दोन भीषण अपघात; ५ जणांचा मृत्यू, तर अनेक जण जखमी