मध्यरात्रीच्या सुमारास दोन भीषण अपघात झाल्याचं समोर आलं आहे. पहिला अपघात चिपळूण कराड मार्गावर झाला आहे. या अपघातात ५ जण जागीच ठार झाल्याचे समोर आले आहे. तर दुसरा अपघात लातूर जिल्ह्यातील तावशी ताडा पाटी येथे घडला आहे. एका खाजगी प्रवासी बसने आयशर टेम्पोला मागून जोरदार धडक दिल्याचे समोर आले आहे. अपघातावेळी बसमध्ये एकूण ३० प्रवासी होते, दोन वाहक आणि एक सहाय्यक देखील यांच्यासोबत प्रवास करत होता. या अपघातात काही प्रवासी जखमी झाले आहे.
पुण्यात एकाला दगडाने मारहाण, उजव्या हाताचे हाड फ्रॅक्चर; नेमकं काय घडलं?
पहिला अपघात
पहिला अपघात हा चिपळूण कराड मार्गावर झाला आहे. तिहेरी अपघातात ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. गॅस वाहून नेणाऱ्या ट्रकवर रिक्षा आणि थार जोरदार आढळल्या. यामध्ये रिक्षातील चार तर थार मधील एकाच जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना रात्री उशिरा घडली आहे. भरधाव थार चालकाच्या चुकीमुळे रिक्षामधील प्रवाश्यांचा जीव गेला आहे. मृतांमध्ये एका लहान बाळाचा समावेश आहे, थार कारसह रिक्षाचा चक्काचूर झाला आहे. घटनेची माहिती मिळताच चिपळूण पोलिस घटनास्थळी दाखल झाले.
दुसरा अपघात
लातूर जिल्ह्यातील तावशी ताडा पाटी मध्यरात्री श्रेयश ट्रॅव्हल्सच्या प्रवासी बसला अपघात झाला. लातूरवरून पुण्याकडे जाणाऱ्या या बसने सीएनजी सिलेंडरची वाहतूक करणाऱ्या आयशर टेम्पोला मागून जोरदार धडक दिली. अपघातामुळे बसचे मोठे नुकसान झाले असून प्रवाशांमध्ये काही काळ गोंधळ उडाला. बसमधून एकूण ३० प्रवासी होते. दोन वाहक आणि एक सहाय्यक प्रवास करत होते. त्यातील सर्व प्रवासी सुखरूप आहेत. काही प्रवाश्यांना किरकोळ मार लागला असून काहींना गंभीर दुखापत झाली आहे. प्राथमिक उपचारानंतर अनेक किरकोळ जखमी प्रवाशांनी लातूरला परतण्याचा निर्णय घेतला. या अपघातात दोन्ही वाहनांचे प्रचंड नुकसान झाले आहे. घटनास्थळी पोलिसांनी तात्काळ धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. रुग्णवाहिका तातडीने दाखल होऊन जखमींना प्रथमोपचार देण्यात आले. गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी औसा येथे हलविण्यात आले आहे.
इंदूरहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या बसला लागली भीषण आग
इंदूरकडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या खासगी लक्झरी बसला भीषण आग लागल्याचे समोर आले आहे. बसचा तयार फुटल्यानंतर अचानक बसला आग लागली. यावेळी बसमध्ये एकूण ३९ प्रवासी होते. ही दुर्घटना मुंबई आग्रा रोडवरील आडगाव येथील हॉटेल स्वागत समोर सकाळी ६ ते 6.30 च्या दरम्यान घडल्याचं सांगितलं जात आहे.
आग लागल्याच्या लक्षात येताच सोमा टोलच्या अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांना पाचारण करण्यात आली आहे. सोमा टोलच्या अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी आज आटोक्यात आणली. घटनास्थळावरील पोलीस निरीक्षक कैलास वाघ आणि चांदवड पोलीस स्टेशनचे कर्मचारी. सोमा टोलचे कर्मचाऱ्यांनी बसमधील प्रवाश्यांना बाहेर काढलं आहे. वेळेत सर्व प्रवाश्यांना बाहेर काढण्यात आलं. मिळालेल्या माहितीनुसार, सर्व ३९ प्रवासी सुखरूप आहेत, कोणालाही इजा झालेली नाही. परंतु या सर्व प्रवाश्यांचे सर्व सामान जाळून खाक झाला आहे.
वालचंदनगरमघील भाळे टोळीवर ‘मोक्का’ कारवाई ; 10 जणांना ठोकल्या बेड्या