Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Sankashti Chaturthi |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

स्वत:च्या लग्न खर्चासाठी भरदिवसा चोरी, बंटी- बबली पोलीसांच्या जाळ्यात

भरदिवसा झालेल्या घरफोडीचा छडा लावण्यात शहापूर पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी एका महिलेसह दोघांना अटक केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 11, 2025 | 12:48 PM
स्वत:च्या लग्न खर्चासाठी भरदिवसा चोरी, बंटी- बबली पोलीसांच्या जाळ्यात

स्वत:च्या लग्न खर्चासाठी भरदिवसा चोरी, बंटी- बबली पोलीसांच्या जाळ्यात

Follow Us
Close
Follow Us:

इचलकरंजी : मित्र-मैत्रिणीने स्वत:च्या लग्न खर्चासाठी भरदिवसा बंद घराचे कुलूप तोडुन चोरी केली होती. चार दिवसापूर्वी कोरोची (ता. हातकणंगले) येथील विवेकानंदनगरमध्ये भरदिवसा झालेल्या घरफोडीचा छडा लावण्यात शहापूर पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी एका महिलेसह दोघांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून सोन्या-चांदीचे दागिने, मोबाईल व बुलेट असा 4 लाख 51 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

सिध्दांत श्रीकांत सगरे (वय 24, रा. धुळेश्‍वरनगर कबनुर) आणि त्याची मैत्रीण दिया सचिन गायकवाड (वय 20 रा. इंदिरानगर कोरोची) अशी त्यांची नावे आहेत. कोरोचीतील विवेकानंद परिसरात भारती सजन ढाले या कुटुंबासह राहण्यास आहेत. 7 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी नऊ ते दुपारी सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडुन चोरट्यांनी 48 हजाराची सोन्याची 10 ग्रॅमची चेन, 4 हजार 800 रुपयांचे कानातील सोन्याचे टॉप्स, 4 हजार 800 रुपयांच्या कानातील सोन्याच्या रिंगा, 1 लाखाचा सोन्याचा नेकलेस, 50 हजाराची सोन्याची बोरमाळ, 35 हजाराची मोहनमाळ, 20 हजाराची एक सोन्याची बाळ चेन, 20 हजाराची सोन्याची अंगठी, 1 हजाराची एक बाळ अंगठी, 2 हजाराचे चांदीचे ब्रासलेट, 1 हजाराचा चांदीचा कडदोरा असा 2 लाख 86 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता. या प्रकरणी शहापूर पोलिसात फिर्याद दाखल करण्यात आली होती.

या घरफोडीचा तपास सुरु असताना पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार शहापुरातील तुळजाभवानी मंदिर परिसरात दुचाकीवरून फिरणार्‍या सिध्दांत सगरे आणि दिया गायकवाड या दोघांना संशयावरून ताब्यात घेतले. त्यांची तपासणी केली असता त्यांच्याकडे असलेल्या पिशवीत सोन्या-चांदीचे दागिने मिळुन आले. त्याबाबत विचारणा केल्यानंतर त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर दोघांना पोलिस ठाण्यात आणून पोलिस खाक्या दाखवताच दोघांनी कोरोचीतील घरफोडीची कबुली दिली. सगरे व गायकवाड हे दोघे मित्र-मैत्रिण असून स्वत:च्या लग्न खर्चासाठी त्यांनी ही चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून घरफोडीतील सोन्या-चांदीचे दागिने, गुन्ह्यात वापरलेली दुचाकी आणि मोबाईल असा एकूण 4 लाख 51 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ही कारवाई शहापूरच्या पोलीस पथकाने केली आहे.

दोन दिवसांत तब्बल 25 वाहनांची चोरी

पुणे शहरातील घरफोड्या, सोनसाखळी चोरट्यासोबतच वाहनचोर देखील सुसाट सुटले आहेत. अवघ्या दोन दिवसांत शहरातून तब्बल २५ वाहन चोरीच्या घटना घडल्या आहेत. विशेष म्हणजे, मध्यवर्ती भाग असलेल्या खडक, फरासखाना परिसरासह येरवडा, चंदननगर, आंबेगाव, वाघोली, लोणी काळभोर येथून या वाहनाची चोरी झाली आहे. सार्वजनिक रस्ते असो वा खासगी ठिकाणे अश्या सर्वच ठिकाणी वाहनचोर सक्रिय असल्याने पुणेकर हैराण झाले आहेत.

Web Title: Shahapur police have arrested two people for breaking into a house and stealing

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 11, 2025 | 12:18 PM

Topics:  

  • crime news
  • House Theft
  • Theft Case

संबंधित बातम्या

पुण्यात वाहनचोर मोकाटच, नागरिक त्रस्त; दोन दिवसांत तब्बल 25 वाहनांची चोरी
1

पुण्यात वाहनचोर मोकाटच, नागरिक त्रस्त; दोन दिवसांत तब्बल 25 वाहनांची चोरी

Crime News Live Updates : नागपूरच्या कडबी चौकात व्यापाऱ्यावर फायरिंग, हल्लेखोरांनी 50 लाख लुटले
2

Crime News Live Updates : नागपूरच्या कडबी चौकात व्यापाऱ्यावर फायरिंग, हल्लेखोरांनी 50 लाख लुटले

चोरीचे सोने खरेदी करणं सोनाराच्या अंगलट; तब्बल 9 तोळे सोने केले गेले जप्त
3

चोरीचे सोने खरेदी करणं सोनाराच्या अंगलट; तब्बल 9 तोळे सोने केले गेले जप्त

घातपात की आणखी काही? समृध्दी महामार्गावर ठोकले शेकडो खिळे; Viral Video मागचं सत्य काय? वाचून म्हणाल….
4

घातपात की आणखी काही? समृध्दी महामार्गावर ठोकले शेकडो खिळे; Viral Video मागचं सत्य काय? वाचून म्हणाल….

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.