पुण्यात चोरट्यांनी वेगवेगळ्या भागांतील सदनिकेचे कुलूप तोडून ३२ लाख रुपयांचा ऐवज लांबविला आहे. धनकवडी, वडगाव शेरी, हडपसर भागात चोरीच्या घटना घडल्या आहेत.
पुणे शहरात दोन दिवसात चोरट्यांनी कोंढवा, चंदननगर, मुंढवा तसेच चतु:श्रृंगी परिसरातील बंद फ्लॅट फोडले आहेत. चार घरफोडीच्या घटनांमध्ये चोरट्यांनी जवळपास सव्वा दोन लाखांचा ऐवज चोरून नेला आहे.
पुरंदर तालुक्यातील वाल्हे नजीक दौंडज येथे भरदिवसा घरात दरोडा टाकून पळून चाललेल्या चोरांना ग्रामस्थ आणि पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून जेलबंद केले आहे.
चतु:शृंगी, वाघोली आणि कोंढव्यात प्रत्येकी एका ठिकाणी घराच्या उघड्या दरवाजातून प्रवेश करून चोरट्यांनी सुमारे पाच लाख रुपये किमतीचे दागिने, लॅपटॉप व मोबाइल चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे.
पुणे शहरात घरफोड्या करणाऱ्या चोरट्यांनी धुमाकूळ घातलेला असतानाच आता थेट चोरट्यांनी पोलिस चौकीपासून अवघ्या पन्नास फुटावरील तब्बल ९ दुकाने एकाच रात्रीत फोडली आहेत.
भरदुपारी घरात घुसून कुटुंबाला सुरा दाखवत साडेतीन लाख रुपयांचा ऐवज लुटणाऱ्या तसेच भरदिवसा घरफोड्या करणाऱ्या सख्या भावांची टोळीला पकडण्यात पुणे ग्रामीण पोलिसांना यश आले आहे.
लॉ कॉलेज रस्त्यावरील एका ज्येष्ठाचा फ्लॅट फोडून पावणे ५ लाख रुपयांचा ऐवज चोरून पोबारा केला. त्यासोबतच विश्रांतवाडीत देखील बंद फ्लॅट फोडत चोरट्यांनी २८ हजारांचा ऐवज चोरला आहे.
राज्यात घरफोड्या करणाऱ्या चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, चोरटे बंद घरे फोडून लाखो रुपयांवर डल्ला मारत आहेत. अशातच आता लोकमान्यनगर, आंबेगाव, पद्मावती, विश्रांतवाडी भागात चोरीच्या घटना घडल्या आहेत.
ताडीवाला रस्त्यावरील रेल्वे कॉलनीतील घरातून चोरट्यांनी ३ लाख ८ हजारांचे सोन्याचे दागिने लांबविल्याची घटना घडली आहे. याबाबत ४३ वर्षीय व्यक्तीने बंडगार्डन पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
एका घरफोडीच्या गुन्ह्यात लोणी काळभोर पोलिसांनी केवळ ९ दिवसांत तपास करत मध्यप्रदेशातून अट्टल चोराला अटक केली आहे. प्रतिक हिराचंद लिडकर असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे.
उटगी (ता. जत) येथे एका घरात सशस्त्र दरोडा टाकण्यात आला आहे. चोरट्यांनी केलेल्या हल्ल्यात दाेन जण गंभीर जखमी झाले आहेत. पावणेदोन लाख रुपये किमतीचा मुद्देमाल चोरट्यांनी लांबविला आहे.
पुलाची शिरोलीत शनिवारी रात्री अकरा ते रविवारी पहाटेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी दोन ठिकाणी घरफोडी केली आहे. यामध्ये सुमारे दिड लाख रुपये किंमतीचे सोन्या चांदीचे दागिने व अडीच लाखांची रोख रक्कम…
मावळ तालुक्यातील तिकोना पेठ येथे असलेल्या अभिनेत्री संगीता बिजलानी यांच्या बंद बंगल्यात शिरलेल्या चोरट्यांनी ५७ हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेल्याची घटना उघडकीस आली आहे.