प्रियकरासोबत पत्नीने केली शिवसैनिक विष्णू गवळी यांची हत्या, अनैतिक संबंध ठरले कारणीभूत (फोटो सौजन्य-ट्विटर)
पनवेल येथील ज्येष्ठ शिवसैनिक विष्णू गवळी (५८) यांची हत्या त्यांच्या पत्नी आणि प्रियकराने खांदेश्वरमधील राहत्या घरी केली. तीन दिवसांपूर्वी (शुक्रवारी) सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास गवळी यांचा अचानक मृत्यू झाला होता. विष्णू यांचा भाऊ शिवाजी याने शनिवारी मध्यरात्री पोलिसांत फिर्याद दिल्यानंतर खांदेश्वर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला.
विष्णू बाबाजी गवळी यांची पत्नी अश्विनी आणि चालक समीर ठाकरे यांच्यात अनैतिक संबंध होते. या अनैतिक संबंधांवरून विष्णू गवळी यांनी केलेल्या विरोधाच्या कारणावरून आणि विष्णू गवळी यांच्या नावावर असलेली प्रॉपर्टी स्वतःला मिळावी या कारणावरून पत्नी अश्विनी गवळी हिने समीर मोहन ठाकरे याच्याशी संगनमत करून विष्णू गवळी यांना राहत्या घरात गळा दाबून ठार मारले. याप्रकरणी खांदेश्वर पोलीस ठाण्यात 11 ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी अश्विनी गवळी हिला अटक केली असल्याची माहिती दिली. विष्णू गवळी, उद्धव बाळासाहेब ठाकरे हे शिवसेना पक्षाचे कार्यकर्ते होते. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
हे सुद्धा वाचा: जुना वाद अन् भररस्त्यात हत्या; मुंबईत 18 वर्षीय तरुणाची धारधार शस्त्राने हत्या, घटना कॅमेऱ्यात कैद
खंडेश्वर वसाहती येथील सेक्टर 9 मधील पीएल 5 टाईपमधील सिद्धिविनायक इमारतीत विष्णू गवळी हे कुटुंबासह राहत होते. आहेत. विष्णूची ३७ वर्षीय पत्नी अश्विनी आणि २६ वर्षीय ड्रायव्हर समीर ठाकरे यांचे अनैतिक संबंध होते. विष्णू यांना या नात्याबद्दल समजताच त्यांनी अश्विनी आणि समीर यांच्या भेटीला विरोध सुरू केला. विष्णू यांची होणारी अडचण टाळण्यासाठी आणि विष्णू यांच्या मृत्यूपश्चात अश्विनीला मिळणाऱ्या संपत्तीमुळे या दोघांनी विष्णू यांची हत्या केल्याचे पोलीसांच्या तक्रारीत म्हटले आहे.
बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावंत शिवसैनिक म्हणून विष्णू हे ओळखले जात. तसेच अंदमान पोर्टब्लेअर येथील महाराष्ट्र मंडळाचे ते काम करीत असून ते अनेक वर्षे वीर सावकरांच्या विचारांचे प्रचारक होते. सरकारी प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये ते स्वतःची ओळख लपवून गुप्तहेर म्हणून करत असत. त्यांच्या हत्येच्या बातमीमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.