Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Beed Crime: बीडमध्ये कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे…! मुंडे गँगची तरूणाला बेदम मारहाण

बीड जिल्हा प्रशासनाने नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ३ जून २०२५ पर्यंत जिल्ह्यात ड्रोन व अन्य मानव रहित यंत्र उडविण्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: May 17, 2025 | 09:21 AM
Beed Crime: बीडमध्ये कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे…! मुंडे गँगची तरूणाला बेदम मारहाण
Follow Us
Close
Follow Us:

बीड : संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे चर्चेत आलेल्या बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा गुन्हेगारी घटनेने खळबळ उडवली आहे. परळी येथील शिवराज हनुमान दिवटे या तरुणाचे अपहरण करून त्याला निर्घृण मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी घडली. या मारहाणीचा भयावह व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये समाधान मुंडे आणि त्याचे काही साथीदार शिवराज दिवटे याला बेदम मारहाण करताना स्पष्टपणे दिसत आहेत. शिवराजला जमिनीवर पाडून चारही बाजूंनी काठ्या आणि बांबूच्या साहाय्याने प्रचंड मारहाण करण्यात आली.

शिवराज वेदनेने जोरजोरात ओरडत असतानाही समाधान मुंडे आणि त्याच्या साथीदारांनी मारहाण थांबवली नाही. या क्रूर हल्ल्यात शिवराज गंभीर जखमी झाला असून, सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. परळी येथील रिलायन्स पेट्रोल पंपासमोरून शुक्रवारी सायंकाळी सुमारे ४ वाजता शिवराज हनुमान दिवटे याचे अपहरण करण्यात आले. शिवराज जलालपूर येथे सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या कार्यक्रमावरून घरी परतत असताना ही घटना घडली.

शरद पवार-अजित पवार एकत्र येणार का? राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘या’ बड्या नेत्यानं केलं मोठं विधान

 

अपहरणानंतर त्याला टोकवाडी येथील रत्नेश्वर मंदिर परिसरात नेण्यात आले, जिथे समाधान मुंडे आणि इतर आरोपींनी त्याच्यावर अमानुष मारहाण केली. विशेष म्हणजे, या मारहाणीचा व्हिडीओ समाधान मुंडेच्या साथीदारांनी मुद्दाम चित्रीत केला होता, जो दहशत पसरविण्याच्या उद्देशाने नंतर सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला.

या धक्कादायक व्हिडीओमुळे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेला उजाळा मिळाला आहे. या प्रकरणी बीड पोलिसांनी समाधान मुंडे आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांच्या नेतृत्वाखाली या प्रकरणात तात्काळ कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून  होत आहे. त्यामुळे आता पोलिसांची पुढील कारवाई काय करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Almatti Dam: अलमट्टी धरणाचा मुद्दा तापणार! रविवारी अंकली टोलनाक्यावर…

बीड जिल्हा प्रशासनाने नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ३ जून २०२५ पर्यंत जिल्ह्यात ड्रोन व अन्य मानव रहित यंत्र उडविण्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असून, संभाव्य धोके लक्षात घेऊन ही प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू करण्यात आली आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे. नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Web Title: Shivraj divate a young man was brutally beaten up by the munde gang in parli beed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 17, 2025 | 09:21 AM

Topics:  

  • Beed Crime
  • Beed Police

संबंधित बातम्या

Beed Crime: ऊसतोड मजुरांच्या दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार; गावातील किराणा दुकानदार व ट्रॅक्टर चालक अटकेत
1

Beed Crime: ऊसतोड मजुरांच्या दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार; गावातील किराणा दुकानदार व ट्रॅक्टर चालक अटकेत

Beed News: बीड जिल्ह्यात 9वीत शिकणाऱ्या 14 वर्षीय मुलीने संपवलं जीवन, गावात शोककळा
2

Beed News: बीड जिल्ह्यात 9वीत शिकणाऱ्या 14 वर्षीय मुलीने संपवलं जीवन, गावात शोककळा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.