त्यानुसार आरोपी सौरभ गायकवाड याच्यावर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात विरोधात भारतीय न्याय संहीता कलम १३७ (१) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दिगंबर सोनटक्के करीत आहेत.
२५ नोव्हेंबर २०२४ रोजी पीडित मुलीचा बालविवाह झाल्याची निनावी तक्रार जिल्हा पोलीस प्रमुख कार्यालयातील चाईल्ड केअर संस्थेकडे प्राप्त झाली होती. यावरून केअर संस्थेने तत्काळ संबंधित गावच्या ग्रामसेवकाला मुलगी हजर करण्याचे आदेश दिले. त्यावेळी नातेवाईकांनी फक्त साखरपुडा झाला असून, लग्न झाले नसल्याचे सांगितले. संस्थेने पुढील कारवाई म्हणून पीडित मुलगी आणि तिच्या कुटुंबीयांना दर महिन्याला जिल्हा बालकल्याण समितीकडे हजेरी लावण्याचे आदेश दिले होते.
बालविवाह रोखलेली ‘ती’ अल्पवयीन मुलगी सात महिन्यांची गर्भवती
गेल्या आठवड्यात हजेरीसाठी पीडित मुलगी आणि तिचे नातेवाईक बालकल्याण समितीत आले असता तिच्या शारीरिक स्थितीबाबत संशय निर्माण झाला. वैद्यकीय तपासणी केली असता ती सुमारे सात महिन्यांची गरोदर असल्याचे निष्पन्न झाले. पुढील चौकशीत तिचा खरोखरच विवाह झाला असल्याचे उघडकीस आले.