Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 16 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ahilyanagar Crime: अल्पवयीन मुलीचे अपहरण अन् मग जंगलात नेऊन लैंगिक अत्याचार! प्रकरणाला ‘लव्ह जिहाद’चे स्वरूप

राहुरी तालुक्यात 15 वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर जंगलात लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणाला 'लव्ह जिहाद'चे स्वरूप आल्याने राजकीय आणि सामाजिक वातावरण तापले आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Feb 21, 2026 | 07:56 PM
अल्पवयीन मुलीचे अपहरण अन् मग जंगलात नेऊन लैंगिक अत्याचार!

अल्पवयीन मुलीचे अपहरण अन् मग जंगलात नेऊन लैंगिक अत्याचार!

Follow Us
Follow Us:
  • राहुरी तालुक्यातील भीषण घटना
  • 15 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार
  • प्रकरणाला लव्ह जिहादचे स्वरूप
राहुरी तालुक्यात अल्पवयीन (वय १५) मुलीचे अपहरण करून तिला तब्बल ५ दिवस जंगलात ठेवत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. आता या प्रकरणाला ‘लव्ह जिहाद’चे स्वरूप आल्याने राजकीय आणि सामाजिक वातावरण तापले आहे. दरम्यान, घटनेची माहिती समजताच राहुरी पोलिसांनी मोठी कारवाई करत नाशिक-सुरत रोडलगत रामशेज किल्ला परिसरातील जंगलातून मुलीची सुटका केली आहे. मुख्य आरोपीसह तिघांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणावरून मुलीच्या गावातही संताप व्यक्त होत असून, कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

खून का बदला खून! दुहेरी हत्याकांडातील आरोपीची कुरकुंभजवळ हत्या; परिसरात तणावाचे वातावरण

या घटनेची सविस्तर माहिती

१३ फेब्रुवारी रोजी कॉलेजला जाते असे सांगून घराबाहेर पडलेली १५ वर्षीय मुलगी परतलीच नाही. बराच वेळ ती घरी न आल्याने अस्वस्थ झालेल्या पालकांनी तत्काळ राहुरी पोलिस ठाणे गाठले. घडलेल्या प्रकाराची माहिती देत तक्रार दाखल केली. एकूण प्रकार पाहता आणि त्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तातडीने तपासाची प्रक्रिया सुरू केली. तांत्रिक विश्लेषण, मोबाईल लोकेशन ट्रॅकिंग आणि गोपनीय माहितीच्या आधारे मुलगी आणि तिचे अपहरण करणारे आरोपी जंगलात असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी वेगाने हालचाल करत जंगल गाठून तेथून मुलीची सुटका केली, तसेच आरोपींना ताब्यात घेतले.

संतप्त ग्रामस्थांनी गाव बंद ठेवले

या गंभीर घटनेत बळी पडलेल्या मुलीच्या गावातही अत्यंत संताप व्यक्त होत आहे. त्यांनी देखील हा प्रकार म्हणजे लव्ह जिहाद असल्याचे सांगत आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच गाव बंद ठेवून या प्रकराचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे.

Karjat Crime: दुचाकी चोरांना बेड्या, तपासात नऊ गुन्हे उघडकीस; गुन्हे प्रकटीकरण पथकाचे कौतुक

लैंगिक अत्याचाराचे लावले गंभीर आरोप

यातील मुख्य आरोपी मुक्तार हैदर पठाण याच्यावर अपहरण आणि लैंगिक अत्याचाराचे गंभीर आरोप ठेवण्यात आले आहेत. पीडितेचा जबाब घेतल्यानंतर पोलिसांनी आरोपींवर पॉक्सो आणि लैंगिक अत्याचाराची कलमे लावली आहेत. एकूण प्रकार आणि मुलीची अवस्था पाहता राहुरी तालुक्यासह जिल्ह्यातून संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणाला आता धार्मिक वळण लागले आहे. भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डिले यांनी हा प्रकार म्हणजे ‘लव्ह जिहाद’ असल्याचे म्हटले असून, संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

पोलिसांनी अटक केलेले आरोपी

या अपहरण आणि अत्याचार प्रकरणातील मुख्य – आरोपी मुक्तार हैदर पठाण (वय १८), कौसर हैदर पठाण (वय २२) आणि आकाश शरद संसारे (वय १९) हे आहेत. त्यांना पोलिसांनी अटक केली आहे.

Web Title: Ahilyanagar crime news 15 years old girl harrased by 3 suspects

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 21, 2026 | 07:56 PM

Topics:  

  • Ahilyanagar
  • crime news

संबंधित बातम्या

Mahabaleshwar Crime news: रिसॉर्ट चोरी प्रकरणी मुख्य आरोपीला कारावास, ५ जण निर्दोष
1

Mahabaleshwar Crime news: रिसॉर्ट चोरी प्रकरणी मुख्य आरोपीला कारावास, ५ जण निर्दोष

घरबसल्या नोकरी देण्याच्या आमिषाने एकाची फसवणूक; तब्बल सव्वा चार लाखांना घातला गंडा
2

घरबसल्या नोकरी देण्याच्या आमिषाने एकाची फसवणूक; तब्बल सव्वा चार लाखांना घातला गंडा

गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला ठोकल्या बेड्या; पुण्यातील ‘या’ भागातून घेतले ताब्यात
3

गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला ठोकल्या बेड्या; पुण्यातील ‘या’ भागातून घेतले ताब्यात

जुन्या वादातून दोन तरुणांवर गोळीबार, तीन राऊंड फायर; श्रीगोंदा तालुक्यातील घटनेनं खळबळ
4

जुन्या वादातून दोन तरुणांवर गोळीबार, तीन राऊंड फायर; श्रीगोंदा तालुक्यातील घटनेनं खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.