Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

खून का बदला खून! दुहेरी हत्याकांडातील आरोपीची कुरकुंभजवळ हत्या; परिसरात तणावाचे वातावरण

२०२१ मधील त्या रक्तरंजित घटनेतील एका आरोपीची शुक्रवारी रात्री पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील कुरकुंभजवळ निघृण हत्या केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 21, 2026 | 06:08 PM
खून का बदला खून! दुहेरी हत्याकांडातील आरोपीची कुरकुंभजवळ हत्या; परिसरात तणावाचे वातावरण

खून का बदला खून! दुहेरी हत्याकांडातील आरोपीची कुरकुंभजवळ हत्या; परिसरात तणावाचे वातावरण

Follow Us
Close
Follow Us:
  • खून का बदला खून!
  • दुहेरी हत्याकांडातील आरोपीची कुरकुंभजवळ हत्या
  • परिसरात तणावाचे वातावरण
पाटस : दौंड तालुक्यातील पाटस परिसरात पाच वर्षांपूर्वी घडलेल्या दुहेरी हत्याकांडाची सावली पुन्हा एकदा गडद झाली आहे. २०२१ मधील त्या रक्तरंजित घटनेतील एका आरोपीची शुक्रवारी रात्री पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील कुरकुंभजवळ निघृण हत्या केली आहे. या थरारक प्रकारामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. महेश उर्फ मन्या संजय भागवत (वय २९, रा. पाटस, ता. दौंड) असे मृत युवकाचे नाव आहे.

 

पोलिसांच्या माहितीनुसार, शुक्रवारी (दि. २०) रात्री सुमारे ८.१५ वाजण्याच्या सुमारास महेश भागवत हा आपल्या साथीदारांसह दुचाकीवरून पाटसकडे परतत होता. मुकदमवाडी उड्डाणपुलावर पोहोचताच पाठीमागून आलेल्या पिकअप वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत ते खाली कोसळले. यानंतर हल्लेखोरांनी महेश भागवत याच्यावर कोयता व सत्तूरसारख्या धारदार शस्त्रांनी सपासप वार केले. गंभीर जखमी झालेल्या भागवतचा घटनास्थळीच मृत्यू झाला. हल्लेखोर मात्र अंधाराचा फायदा घेत पसार झाले.

या प्रकरणी महेश मारुती टुले यांनी दौंड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आनंद माकर, विकी शितकल, संतोष शितकल (रा. आंबिकानगर, पाटस) तसेच अन्य दोन अज्ञात व्यक्तींविरुद्ध खून आणि जीवघेण्या हल्ल्याचे गुन्हे दाखल केले आहेत. पोलिस निरीक्षक गोपाळ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

दरम्यान, ४ जुलै २०२१ रोजी पाटस येथील तामखडा परिसरात शिवम शितकल आणि गणेश माकर या दोन तरुणांची निघृण हत्या झाली होती. त्या दुहेरी हत्याकांडात महेश उर्फ मन्या भागवत याच्यासह काही जणांवर यवत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. संबंधित आरोपी सध्या जामिनावर बाहेर होते. कुरकुंभजवळ झालेल्या या हल्ल्यात त्या जुन्या प्रकरणातील तिघांना लक्ष्य केल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यापैकी महेश भागवतचा मृत्यू झाला. उर्वरित दोघे जखमी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

हे सुद्धा वाचा : बुधवार पेठेतील मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश; बांगलादेशी महिलांना पुण्यात आणणारा सूत्रधार उघड

हत्याकांडाचा सूड उगवला गेला का?

या घटनेमुळे २०२१ च्या दुहेरी हत्याकांडाचा सूड उगवला गेला का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. पाटस आणि परिसरात पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले असून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला असून, संशयितांच्या शोधासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत.

Web Title: The accused in the double murder case was murdered near kurkumbh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 21, 2026 | 06:08 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • crime news
  • Murder Case

संबंधित बातम्या

Twisha Sharma Case: समर्थ सिंगच्या अडचणीत वाढ; तब्बल इतके दिवस झाली CBI कोठडीत रवानगी
1

Twisha Sharma Case: समर्थ सिंगच्या अडचणीत वाढ; तब्बल इतके दिवस झाली CBI कोठडीत रवानगी

MLC Election 2026: “कठीण पेपर संपलाय, आता फक्त…”, अमित शाहा यांच्या भेटीनंतर मुख्यमत्र्यांनी स्पष्टच सांगितलं! म्हणाले…
2

MLC Election 2026: “कठीण पेपर संपलाय, आता फक्त…”, अमित शाहा यांच्या भेटीनंतर मुख्यमत्र्यांनी स्पष्टच सांगितलं! म्हणाले…

अजित पवारांच्या विमान अपघाताला ४ महिने पूर्ण; रोहित पवारांचा फडणवीस सरकारवर निशाणा, CID तपासावरही उपस्थित केले प्रश्न!
3

अजित पवारांच्या विमान अपघाताला ४ महिने पूर्ण; रोहित पवारांचा फडणवीस सरकारवर निशाणा, CID तपासावरही उपस्थित केले प्रश्न!

Loni Kalbhor Murum scam: काम ‘जलजीवन’चे, घोटाळा मुरुमाचा! कोट्यवधींचा महसूल बुडवल्याचा गंभीर आरोप
4

Loni Kalbhor Murum scam: काम ‘जलजीवन’चे, घोटाळा मुरुमाचा! कोट्यवधींचा महसूल बुडवल्याचा गंभीर आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.