Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IT के चक्कर मैं मत पडना! नोकरीचे आमिष दिले अन् उमेदवारांकडून थेट…; पुण्यातील धक्कादायक प्रकार

Cyber Crime: तरुणांचे आर्थिक नुकसान आणि करिअरवर होणारा परिणाम लक्षात घेता अशा रॅकेटविरोधात कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 21, 2026 | 05:23 PM
IT के चक्कर मैं मत पडना! नोकरीचे आमिष दिले अन् उमेदवारांकडून थेट...; पुण्यातील धक्कादायक प्रकार

IT के चक्कर मैं मत पडना! नोकरीचे आमिष दिले अन् उमेदवारांकडून थेट...; पुण्यातील धक्कादायक प्रकार

Follow Us
Close
Follow Us:

नोकरीचे आमिष दाखवून लाखोंची फसवणूक
पुण्यात घडला धक्कादायक प्रकार
अनेक तरुणांची झाली फसवणूक

पिंपरी: आयटी क्षेत्रातील नोकरी म्हणजे मोठा पगार आणि स्थिर करिअर, अशी (Pune Crime) सर्वसाधारण धारणा असताना पुण्यात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नोकरी देण्याच्या आमिषाने उमेदवारांकडून १ ते ३ लाख रुपये उकळून प्रत्यक्षात पगार व प्रकल्प न देण्याचा प्रकार उघडकीस आला असून अनेक तरुणांची फसवणूक झाल्याची तक्रार करण्यात आली आहे.

आयटी कर्मचाऱ्यांची संघटना आयटी कर्मचाऱ्यांसाठी मंच (FITE) यांच्या वतीने पुण्यातील एका आयटी कंपनीविरोधात विमान नगर पोलिस स्टेशन येथे अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली आहे. संबंधित कंपनीकडे कोणतेही ठोस प्रकल्प किंवा ग्राहक नसतानाही नोकरीची हमी देत मोठी रक्कम घेतल्याचा आरोप आहे. सुरुवातीला नियुक्ती दिल्याचे सांगितले गेले; मात्र प्रत्यक्षात काम, पगार किंवा सातत्यपूर्ण रोजगार देण्यात आला नाही. काहींना अल्पावधीतच काम न देता सेवेतून कमी करण्यात आल्याचेही समोर आले आहे.

या प्रकरणी फोरमच्या प्रतिनिधींनी सहाय्यक पोलिस आयुक्त प्रांजल सोनावणे तसेच पोलिस उपायुक्त सौम्या मुंडे यांची भेट घेतली. संबंधित कंपनीचे मालक व सल्लागारांना चौकशीसाठी बोलावण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. फोरमचे प्रशांत पंडित, सौरभ कुलकर्णी आणि पवनजीत माने यांनी तक्रार प्रक्रियेत पुढाकार घेतला.

Cyber Crime: व्यावसायिकाला ३६ लाखांचा गंडा; एका लिंकवर क्लिक करणे पडले महागात

हजारो नोकरी इच्छुकांना लक्ष्य केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून पोलिस तपास सुरू आहे. तरुणांचे आर्थिक नुकसान आणि करिअरवर होणारा परिणाम लक्षात घेता अशा रॅकेटविरोधात कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

व्यावसायिकाला ३६ लाखांचा गंडा

फेसबुक वर झालेली महिलेची ओळख एका व्यावसायिकाला महागात पडली आहे. क्रिप्टोक्रम करन्सीच्या माध्यमातून लाखो रुपये मिळविण्य मिळविण्याचे प्रलोभन दाखवत या भामट्या महिलेने या व्यावसायिकाला ३६ लाख ६५ हजार रुपयांना ऑनलाइन चुना लावला आहे. फसवणुकीची ही घटना 4 जानेवारी २०२६ ते १ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत मिरजोळे एमआयडीसी रत्नागिरी येथील गांधी फॅब्रिकेटर्स या फिर्यादीच्या दुकानात घडली आहे.

ई-चलनाची ‘ती’ फाईल डाऊनलोड केली अन् क्षणांत 18 लाख गेले; सायबर चोरट्यांचे कारस्थान

याप्रकरणी फसवणूक झालेल्या व्यावसायिकाने सुहानी शर्मा आणि डॅनियल या दोघांविरोधात रत्नागिरी सायबर पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसात दिलेल्या फिर्यादीमध्ये या व्यावसायिक फिर्यादीने म्हटले आहे की फेसबुक या समाज माध्यमावर सुहानी शर्मा या महिलेशी त्यांची ओळख झाली होती.

Web Title: Online fraud with rs 1 to 3 lakhs it sector job scam pimpri pune crime news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 21, 2026 | 05:20 PM

Topics:  

  • crime news
  • cyber crime
  • Pune Crime

संबंधित बातम्या

Crime News: पोलिस ठाण्यातच महिलांची फ्री-स्टाईल हाणामारी, केस ओढत, एकमेकींचे फाडले कपडे; सहा जणींवर गुन्हा दाखल
1

Crime News: पोलिस ठाण्यातच महिलांची फ्री-स्टाईल हाणामारी, केस ओढत, एकमेकींचे फाडले कपडे; सहा जणींवर गुन्हा दाखल

चिंचवडमध्ये टोळक्याचा राडा, दोघांना घरात घुसून मारहाण; नेमकं काय घडलं?
2

चिंचवडमध्ये टोळक्याचा राडा, दोघांना घरात घुसून मारहाण; नेमकं काय घडलं?

धक्कादायक ! 6 वर्षांच्या चिमुकलीसोबत नराधमाचे अनैसर्गिक कृत्य; कोर्टाने सुनावली मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा
3

धक्कादायक ! 6 वर्षांच्या चिमुकलीसोबत नराधमाचे अनैसर्गिक कृत्य; कोर्टाने सुनावली मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा

पैशांसाठी सासरच्यांकडून छळ, विवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल; गळफास घेऊन संपवलं जीवन
4

पैशांसाठी सासरच्यांकडून छळ, विवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल; गळफास घेऊन संपवलं जीवन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.