नवी दिल्ली : दिल्लीतील बहुचर्चित श्रद्धा हत्याकांडप्रकरणी (Shraddha Walkar Murder Case) एक नवी माहिती (Update) समोर येत आहे. दिल्लीतील साकेत न्यायालयाने (Saket Court) आरोपी आफताब पूनावालाविरुद्ध (Aftab Poonawalla) दाखल केलेल्या आरोपपत्राची (Charge Sheet) दखल घेतली आहे. हे प्रकरण २१ फेब्रुवारीला तपासासाठी ठेवण्यात आले आहे. आफताबला बंद दरवाजाआड न्यायालयात हजर करण्यात आले. दिल्लीतील श्रद्धा हत्येप्रकरणी पोलिसांनी ६ हजार ६२९ पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे.
तत्पूर्वी, आफताब पूनावाला यांने न्यायदंडाधिकाऱ्यांना विचारले होते की ते आरोपपत्र मिळवू शकतील का? त्यावर न्यायदंडाधिकारी यांनी ७ फेब्रुवारीला याची दखल घेणार असल्याचे सांगितले. आफताबने सांगितले की, त्याला आणखी एका वकीलाची नियुक्ती करायची आहे, त्यामुळेच त्याचा खटला लढणाऱ्या वकिलाला खटल्याच्या आरोपपत्राची प्रत देऊ नये.
[read_also content=”मोबाइल फॉरमॅट करून केली आत्महत्या, एकाच गावातील चार तरुणांच्या मृत्यूने व्यक्त होतोय संताप https://www.navarashtra.com/crime/kolhapur-crime-news-mysterious-suicides-case-shaken-a-village-in-maharashtra-nrvb-367858.html”]
मिळालेल्या माहितीनुसार, १५० हून अधिक लोकांच्या जबाबाशिवाय फॉरेन्सिक आणि इलेक्ट्रॉनिक पुराव्याच्या आधारे आरोपपत्र तयार करण्यात आले आहे. छतरपूरच्या जंगलातून सापडलेल्या हाडांचा डीएनए अहवाल चार्टशीटमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. याशिवाय आफताब पूनावालाच्या नार्को चाचणीचा अहवालही त्यात समाविष्ट असून, पॉलीग्राफ चाचणीचा अहवालही आरोपपत्रात समाविष्ट करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, श्रद्धा वालकरचा तिचा लिव्ह-इन पार्टनर आफताब अमीन पूनावाला याने गळा दाबून खून केला होता आणि तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे केले होते आणि दिल्लीच्या वेगवेगळ्या भागात फेकून दिले होते.