
स्मृती मानधनासोबत विवाह मोडल्यानंतर पलाश मु्च्छलचा सांगलीत कांड! (Photo Credit- X)
A serious fraud allegation has been made against music composer and singer Palash Muchhal, after a man from Sangli accused him of cheating him of ₹40 lakh. The victim claimed that Palash Muchhal took the money promising to compose music for a project, but failed to deliver the… pic.twitter.com/NpPCUWRZYi — Pune Mirror (@ThePuneMirror) January 22, 2026
विज्ञान माने हा युवक स्मृती मानधनाचा बालमित्र असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, पलाश मुच्छल आणि स्मृती मानधना यांचा विवाह मोडल्यानंतर हे फसवणुकीचं प्रकरण उघडकीस आलं. या प्रकरणानंतर माने यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. या तक्रारीमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
पलाशने दिलेल्या आश्वासनावर विश्वास ठेवून विज्ञानने 40 लाख रूपये गुंतवले. त्यानं पलाशला रोख तसेच काही रक्कम ऑनलाइन पेमेंटद्वारे दिली. मात्र, संबंधित चित्रपटाचे काम अर्धवट राहिले. ते वेळेत पूर्ण झाले नाही. त्यानंतर विज्ञानने पलाशला आपली गुंतवलेली रक्कम पुन्हा मागितली. मात्र, पलाशने रक्कम देण्यास टाळले. तसेच विज्ञानला सतत असमाधानकारक उत्तरे दिले. काही दिवसानंतर पलाशने विज्ञानचे फोन उचलणेही टाळले.
यानंतर विज्ञानने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला. त्यानं सांगली जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे आर्थिक फसवणूक झाल्याची तक्रार दाखल केली आहे. तसेच संबंधित प्रकरणातील काही व्यवहारांचे फोटोही त्यानं तक्रारीसोबत जोडले आहेत. या प्रकरणावर पोलीस प्रशास नेमकं काय पाऊल उचलते, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. दरम्यान, या प्रकरणानंतर पलाश मुच्छल किंवा त्याच्या टीमकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.