Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Solapur Crime: कॉलेजमध्ये रॅगिंगचा कहर; 11वीच्या विद्यार्थ्याला तीन तास स्टम्पने मारहाण, कॉलेज प्रशासनावर गंभीर आरोप

बार्शी तालुक्यातील उक्कडगाव येथील महाविद्यालयात 11 वीच्या विद्यार्थ्याला चार विद्यार्थ्यांनी खोलीत घुसून स्टम्पने तीन तास मारहाण केली. काम करण्यास नकार दिल्याने छळ; विद्यार्थी गंभीर जखमी, उपचार सुरू.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Dec 23, 2025 | 01:55 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • उक्कडगाव कॉलेजमध्ये 11 वीच्या विद्यार्थ्याला बेदम मारहाण
  • रूम स्वच्छतेच्या कामाला नकार दिल्याने छळाचा आरोप
  • विद्यार्थी गंभीर जखमी; प्रशासनावर दोषींना पाठीशी घालण्याचा आरोप
सोलापूर: सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील उक्कडगाव येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ११ वी मध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याला चार विद्यार्थ्यांनी खोलीत घुसून बेदम मारहाण केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मारहाण झालेल्या विद्यार्थ्यांचे नाव प्रसिक बनसोड असे आहे. तो मारहाणीत गंभीर जखमी झाले असून त्याच्यावर धाराशिव येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहे. ही घटना उक्कडगाव येथील एका महाविद्यालयात घडली. या घटनेमुळे महाविद्यालय प्रशासनाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

कशी करण्यात आली मारहाण?
चार विद्यार्थ्यांनी रूममध्ये जबरदस्तीने प्रवेश करून त्याला स्टम्पने मारहाण केली. तब्बल तीन तास मारहाण करण्यात आली असा गंभीर आरोप पीडित विद्यार्थ्याने केला आहे.

पोलीस आयुक्तांच्या नावाचा गैरवापर, सहायक फौजदारावर निलंबनाची कारवाई; नेमकं प्रकरण काय?

का करण्यात आली मारहाण?
रूम स्वच्छ करणे, झाडू मारायला लावल्यावर कामे करण्यास नकार दिल्याने मारहाण केली असल्याचा पीडित मुलाचा आरोप आहे. इतकेच नव्हे तर, “महाविद्यालय प्रशासन दोषी विद्यार्थ्यांना पाठीशी घालत आहे,” असा गंभीर आरोपही त्याने केला आहे. या आधीही महाविद्यालयात असे प्रकार घडले असल्याचा दावा पीडित विद्यार्थ्याने केला आहे.

काठोर कारवाईची मागणी
या संतापजनक आणि धक्कादायक प्रकरणामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, पालक वर्गातूनही संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेनंतर संबंधित विद्यार्थ्यांवर कठोर कारवाई करावी, तसेच महाविद्यालय प्रशासनाच्या भूमिकेची चौकशी करावी, अशी मागणी होत आहे.

आईच्या प्रियकराने तीन वर्षांच्या चिमुकल्याचा गळा दाबून केली निर्घृण हत्या

सोलापूर जिल्ह्यातून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. आईच्याच प्रियकराने तीन वर्षाच्या चिमुकल्याची हत्या केल्याचे समोर आले आहे. प्रियकराने गळा दाबून हत्या केल्याने हा धक्कदायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरु आहे. मृत चिमुकल्याचे नाव फरहान जाफर शेख (वय ३) असे आहे. तर आरोपीचे नाव मौलाली उर्फ अकबर अब्दुल रज्जाक मुल्ला असे आहे. त्याला सोलापूरच्या एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे.

Solapur Crime: ‘शी’ कपड्याला लागल्याने संताप; आईच्या प्रियकराने तीन वर्षांच्या चिमुकल्याचा गळा दाबून केली निर्घृण हत्या

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: मारहाण कशी करण्यात आली?

    Ans: चार विद्यार्थ्यांनी खोलीत घुसून स्टम्पने तब्बल तीन तास मारहाण केल्याचा आरोप आहे.

  • Que: मारहाणीचे कारण काय सांगितले जाते?

    Ans: रूम स्वच्छ करणे व झाडू मारण्यास नकार दिल्याने मारहाण केल्याचे पीडिताचे म्हणणे आहे.

  • Que: सध्या पीडिताची स्थिती काय आहे?

    Ans: विद्यार्थी गंभीर जखमी असून धाराशिव येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Web Title: Solapur crime an 11th grade student was beaten with a stump for three hours

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 23, 2025 | 01:55 PM

Topics:  

  • crime
  • Solapur
  • Solapur Crime

संबंधित बातम्या

Dharashiv Crime : ६.९५ लाखांच्या निधीची अफरातफर; दोन अभियंत्यांसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
1

Dharashiv Crime : ६.९५ लाखांच्या निधीची अफरातफर; दोन अभियंत्यांसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

किडनी विक्रीप्रकरण! डॉ. सिंगच्या जामिनावर २४ ला सुनावणी; ‘असहकारचा’ मुद्दा न्यायालयात पोलिस मांडणार
2

किडनी विक्रीप्रकरण! डॉ. सिंगच्या जामिनावर २४ ला सुनावणी; ‘असहकारचा’ मुद्दा न्यायालयात पोलिस मांडणार

Punjab Crime: अनैतिक संबंधांसाठी आईच बनली जल्लाद! पोटच्या दोन मुलांना विष देऊन केली हत्या; आईसह मावशीला अटक
3

Punjab Crime: अनैतिक संबंधांसाठी आईच बनली जल्लाद! पोटच्या दोन मुलांना विष देऊन केली हत्या; आईसह मावशीला अटक

Uttarpradesh Crime: मामाने भाच्याचा विळ्याने गळा चिरून केली हत्या; अनैतिक संबंधांमुळे रक्तरंजित थरार
4

Uttarpradesh Crime: मामाने भाच्याचा विळ्याने गळा चिरून केली हत्या; अनैतिक संबंधांमुळे रक्तरंजित थरार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.