Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Solapur Crime : वाळूमाफियांना अभय कोणाचं ? बेकायदा वाळू तस्करांनी पोखरलं चंद्रभागेचं नदीपात्र,पोलीस यंत्रणा मूग गिळून गप्प

वाळूतस्करांनी महसूल व पोलीस यंत्रणेच्या नाकावर टिच्चून थेट नदीपात्रातून वाळू उत्खनन करून ट्रक, टिप्पर, गाढवा व ट्रॅक्टरने वाळूची चोरटी वाहतूक सुरू केली आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 14, 2026 | 05:09 PM
Solapur Crime : वाळूमाफियांना अभय कोणाचं ? बेकायदा वाळू तस्करांनी पोखरलं चंद्रभागेचं नदीपात्र,पोलीस यंत्रणा मूग गिळून गप्प
Follow Us
Follow Us:
  • बेकायदा वाळू तस्करांनी पोखरलं चंद्रभागेचं नदीपात्र,
  • पोलीस यंत्रणा मूग गिळून गप्प
सोलापूर : पंढरपूर तालुक्यातून वाहणाऱ्या चंद्रभागा नदीच्या पात्रांमध्ये वाळूतस्करांची अहोरात्र जत्रा भरत आहे. वाळूतस्करांनी महसूल व पोलीस यंत्रणेच्या नाकावर टिच्चून थेट नदीपात्रातून वाळू उत्खनन करून ट्रक, टिप्पर, गाढवा व ट्रॅक्टरने वाळूची चोरटी वाहतूक सुरू केली आहे. मात्र, गेल्या कित्येक दिवसांपासून वाळूतस्करीचा हा गोरखधंदा अव्याहत सुरू असल्याने चंद्रभागा नदीचे पात्र सध्या अनेक भागात पोखरले आहे. त्यामुळे भविष्यात पावसाळ्यात याचे दुष्परिणाम नदीकाठालगतच्या गावांना भोगावे लागणार आहे. महसूल व पोलिसांची यंत्रणा कुठेही तालुक्यात वाळूतस्करीबाबत अजिबात गंभीर नाही. मुळात वाळूतस्करी रोखण्याचे काम महसूलसह खनिकर्म विभागाकडे असते.

मात्र, काही भागात घाटाचे लिलाय केल्यानंतर सदर घाटातून करारनाम्यातील अटी-शर्ती डावलून चालणाऱ्या वाळूतस्करीमध्ये महसूलच्याच काही अधिकारी-कर्मचाऱ्यांनी हप्तासंस्कृती विकसित केली. त्यामुळे महसूलची अघोषित एनओसी वाळूतस्करीसाठी मिळताच त्या-त्या भागातील पोलीस यंत्रणेलाही मॅनेज करण्याचे प्रकार घडले. इतकेच काय तर खनिकर्म विभागाच्या भरारी पथकातील कर्मचाऱ्यांपर्यंत सेटींग लावण्याचे प्रकार तस्करांनी केले. आरटीओंच्या पथकांनाही प्रसाद देण्याचे मासिक सूत्र ठरविले. एकंदरीत वाळूतस्करीचा हा गोरखधंदा अगदी यंत्रणांच्या छुप्या पाठबळातून चालतो आहे. त्यातच आता पंढरपूर तालुक्यातून वाहणाऱ्या चंद्रभागा नदीच्या पात्रात वाळूतस्करांची जत्रा भरत आहे. दररोज वाळूतस्करांची जत्रा भरत आहे.

Ahilyanagar Crime: बेपत्ता तक्रार देणारा मुलगाच निघाला खुनी, मुलगा-जावयानेच वडिलांची केली हत्या; तपासात धक्कादायक माहिती समोर

इसबावी जॅकवेल, शिरढोण, गुरसाळे, मुंडेवाडी या भागातील वाळूतस्करीत सक्रिय झालेला एक व्यक्ती सध्या बराच चर्चेत आला. पोलीस दलात सिंघम अधिकारी म्हणून ज्यांचे नाव घेतले जाते त्याच अधिकाऱ्याचे हा वाळूतस्कर सर्वत्र नाव सांगत असल्याचे या भागातील काही नागरिकांनी दै. ‘नवराष्ट्र’ला सांगितले. आपले त्या अधिकाऱ्यााची थेट संबंध असल्याचे सांगून लोकांशी मुजोरी करण्याचा प्रकारही त्याने चालविल्याचे बोलले जाते. त्यामुळे विनाकारण एखाद्या चांगल्या पोलीस अधिकाऱ्याची बदनामी अशा प्रकारचे तस्कर करीत असेल तर त्यावर प्रतिबंध लावणे गरजेचे आहे.

चुटूरपुटूर रॉयल्टी घेऊन हजारो ब्रास मातीचे उत्खनन
इसबावीजॅकवेल, शंकरगाव, देगाव, अजनसोड, शेगाव, सरकोली, मुंढेवाडी, सुस्ते, गुरसाळे, शिरढोण या भागातील अनेकांची वाळूची वाहने बिनधास्त धावत आहेत. वाळूतस्करांवर कुठलाही लगाम लावण्यास महसूल यंत्रणा लावायला तयार नाही. या भागातील एसडीओंसह तहसीलदारांची तर अवैध गौण खनिजाच्या प्रकरणांमध्ये कारवाई किती हा प्रश्न आहे. वाळूतस्करीच नव्हेतर वीट भट्टीधारकांसाठी चुटपूट रॉयल्टी घेऊन हजारो ब्रास मातीचे उत्खनन व वाहतूक या तालुक्यात होत आहे. प्रदूषण नियंत्रण परवानग्याविना मंडळाच्या पंढरपूर तालुक्यात अनेक वीटभट्टी ही चालविल्या जात आहे, त्यावर स्थानीक महसूल यंत्रणेचे अर्थपूर्ण मौन असताना वाळूतस्करानी चक या तालुक्यात धुडगूस घातला आहे. कधीकाळी साजेची सोय नसलेल्या अनेकांनी वाळूतस्करानी गडगंज माया कमावली, आता त्यांच्याकडूनच स्थानिक यंत्रणेला सुखरूप वाळूतस्करीसाठी मोठी रसदही पुरविली जात असल्याची माहिती आहे.

पंढरपूर पोलिसांची अवैध धंद्यांवरच डोळेझाक
पोलीस दलात सध्या अवैध धंद्यावर कारवाया नेमक्या कुठल्या भागात करायच्या अथवा कुठल्या भागात करायच्या नाही, अत्ता काहीसा प्रकार चालला की काय अशी अवस्था आहे. पंढरपूर पोलीसांच्या हद्दीत चालणाऱ्या जुगार अड्नुधांवर कारवाई झाली नाही. वृत्तपत्रातून वृत्त प्रकाशित झाले की काही दिवसांकरीता अवैध धंदे गुंडाळले जातात. सामसुम झाली की, पुन्हा अवैध धंदे चालक सक्रिय होतात. विशेष म्हणजे माध्यमांच्या प्रतिनिधींचीही वरिष्ठांकडे बदनामी करण्याचे प्रकार केले जातात. माध्यमातील सर्वांनाच एका रांगेत बसविण्याचे प्रकार काही अधिकारी करून वरिष्टांची दिशाभूल करीत असल्याचेही समजते. जाहिराती अथवा पाकीट न दिल्याने पत्रकार बातम्या छापतात, असे सांगूनहीं बदनाम्या करण्याचे प्रयोग केले जातात, त्यामुळे माध्यमातील प्रतिनिधींनीही अशा अधिकारी किंवा कर्मचायाविरुद्ध कठोर भूमिका घेण्याची गरज आहे.

Ratnagiri Crime: संतापजनक! रत्नागिरीत अल्पवयीन मुलावर अत्याचार; कृत्याचा VIDEO सोशल मीडियावर व्हायरल

Web Title: Solapur crime illegal sand smugglers have eroded the chandrabhaga riverbed the police system has remained silent

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 14, 2026 | 05:09 PM

Topics:  

  • navrashtra news
  • Solapur Crime

संबंधित बातम्या

Satara News: अंत्यविधीला येणाऱ्यांसाठी ‘ही’ सुविधा ठरणार मोठा आधार; महिला-पुरुषांसाठी स्वतंत्र व्यवस्था
1

Satara News: अंत्यविधीला येणाऱ्यांसाठी ‘ही’ सुविधा ठरणार मोठा आधार; महिला-पुरुषांसाठी स्वतंत्र व्यवस्था

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.