Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 19 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Student Suicide: लग्नासाठी तगादा अन् ‘ते’ फोटो व्हायरल करण्याची धमकी; १८ वर्षीय डिप्लोमा विद्यार्थिनीची आत्महत्या…

Student Suicide: "माझ्याशी लग्न कर, नाहीतर तुझे फोटो व्हायरल करेन..." - १८ वर्षीय तरुणीला ब्लॅकमेलिंग! सोलापूरच्या दक्षिण सोलापूर तालुक्यात हुशार डिप्लोमा विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या. रविकांत सुरवसेविरोधात गुन्हा दाखल.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Nov 19, 2026 | 12:08 PM
Student Suicide: लग्नासाठी तगादा अन् 'ते' फोटो व्हायरल करण्याची धमकी; १८ वर्षीय डिप्लोमा विद्यार्थिनीची आत्महत्या...

Student Suicide: लग्नासाठी तगादा अन् 'ते' फोटो व्हायरल करण्याची धमकी; १८ वर्षीय डिप्लोमा विद्यार्थिनीची आत्महत्या...

Follow Us
Follow Us:
  • १८ वर्षीय विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या
  • लग्नासाठी तगादा लावून खासगी फोटो व्हायरल करण्याची धमकी
  • रविकांत सुरवसे याच्याविरोधात गुन्हा दाखल
Student Suicide: दक्षिण सोलापूर तालुक्यातून एक अत्यंत दुःखद आणि संतापजनक घटना समोर आली आहे. लग्नासाठी वारंवार दबाव टाकत, बदनामीची भीती दाखवून एका १८ वर्षीय तरुणीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. अमूल्या मल्लिकार्जुन भुरळे असे मृत विद्यार्थिनीचे नाव असून, या घटनेमुळे संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

हेही वाचा: Dawood Ibrahim: ‘मुसाफिरखाना’ इमारतीवर महापालिकेचा हातोडा; हायकोर्टाच्या आदेशानंतर कारवाई, परिसरात तणाव!

काय आहे संपूर्ण प्रकरण?

मिळालेल्या माहितीनुसार, अमूल्या डिप्लोमाच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत होती. शिक्षणात ती अत्यंत हुशार होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून रविकांत महादेव सुरवसे नावाचा तरुण तिला लग्नासाठी सतत तगादा लावत होता. फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे, रविकांत अमूल्याला ‘माझ्याशी लग्न कर, नाहीतर तुझे खासगी फोटो सोशल मीडियावर व्हायरल करेन,’ अशी धमकी देत होता.

त्रासाला कंटाळून उचलले टोकाचे पाऊल

रविकांतच्या या सततच्या ब्लॅकमेलिंगला आणि त्रासाला कंटाळून अमूल्या प्रचंड तणावात होती. या मानसिक त्रासातूनच तिने मंगळवारी रात्री राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. नातेवाईकांनी तिला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी तपासले असता तिला उपचारापूर्वीच मृत घोषित केले.

हेही वाचा: Wife Murder: पत्नीची दगडाने ठेचून हत्या केल्यानंतर फरार पतीने उचलले टोकाचे पाऊल; शेतातील आग लावून…

आरोपीविरोधात गुन्हा दाखल

अमूल्याच्या या अकाली निधनामुळे भुरळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तिच्या पश्चात आई-वडील, दोन भाऊ आणि एक बहीण असा परिवार आहे. याप्रकरणी मृत मुलीचे वडील मल्लिकार्जुन भुरळे यांनी सिव्हिल पोलीस चौकीत फिर्याद दिली असून, रविकांत सुरवसे याच्याविरोधात गंभीर आरोप केले आहेत. पोलिसांनी आरोपी रविकांत सुरवसे याच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे. या घटनेनंतर आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: दक्षिण सोलापूरमधील १८ वर्षीय विद्यार्थिनीने आत्महत्या का केली?

    Ans: रविकांत महादेव सुरवसे याच्याकडून लग्नासाठी होणारा वारंवार त्रास आणि 'खासगी फोटो सोशल मीडियावर व्हायरल करेन,' अशी धमकी दिल्यामुळे १८ वर्षीय अमूल्या भुरळे हिने आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले.

  • Que: अमूल्या भुरळे कोणती शिकत होती?

    Ans: अमूल्या डिप्लोमाच्या द्वितीय वर्षात शिकत होती आणि शिक्षणात हुशार होती.

  • Que: याप्रकरणी पोलीस कारवाई काय झाली आहे?

    Ans: मृत मुलीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी रविकांत महादेव सुरवसे याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Solapur student amulya bhurule suicide blackmail arrest sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 19, 2026 | 12:08 PM

Topics:  

  • Solapur Crime
  • Solapur Crime News
  • Student Suicide

संबंधित बातम्या

Pandharpur: “अचानक विहीर कोसळली अन्…” पंढरपूरमध्ये सुरू असलेल्या खोदकामादरम्यान भीषण दुर्घटना; मातीच्या ढिगाऱ्याखाली चारजण…
1

Pandharpur: “अचानक विहीर कोसळली अन्…” पंढरपूरमध्ये सुरू असलेल्या खोदकामादरम्यान भीषण दुर्घटना; मातीच्या ढिगाऱ्याखाली चारजण…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.