Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 15 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pandharpur: “अचानक विहीर कोसळली अन्…” पंढरपूरमध्ये सुरू असलेल्या खोदकामादरम्यान भीषण दुर्घटना; मातीच्या ढिगाऱ्याखाली चारजण…

Pandharpur: ३० फूट खोल विहिरीत अडकले कामगार! अचानक मातीचा ढिगारा कोसळल्याने उडाला हाहारकार; एनडीआरएफची टीम तात्काळ होणार दाखल... पाहा पंढरपूरमधील भीषण दुर्घटनेची संतापजनक माहिती!

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Nov 15, 2026 | 02:49 PM
Pandharpur: "अचानक विहीर कोसळली अन्..." पंढरपूरमध्ये सुरू असलेल्या खोदकामादरम्यान भीषण दुर्घटना; मातीच्या ढिगाऱ्याखाली चारजण...

Pandharpur: "अचानक विहीर कोसळली अन्..." पंढरपूरमध्ये सुरू असलेल्या खोदकामादरम्यान भीषण दुर्घटना; मातीच्या ढिगाऱ्याखाली चारजण...

Follow Us
Follow Us:
  • पंढरपूरमधील आंबे गावात ३० फूट खोल विहीर खोदताना विहीर कोसळली
  • मातीचा ढिगारा अंगावर आल्याने चारजण अडकल्याची शक्यता
  • जेसीबीच्या सहाय्याने बचावकार्य सुरू; एनडीआरएफ टीम दाखल होणार
Pandharpur: सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील आंबे गावात एक अत्यंत भयंकर दुर्घटना घडली आहे. शेतात विहीर खोदण्याचे काम सुरू असताना अचानक विहीर कोसळल्याने चारजण मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या अचानक घडलेल्या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

हेही वाचा: Bank Manager Suicide: वरिष्ठांच्या मानसिक त्रासाला कंटाळून इंडियन बँकेच्या अधिकाऱ्याची आत्महत्या; चिठ्ठीतून धक्कादायक खुलासे!

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, आंबे गावात निवास शिंदे नावाच्या शेतकऱ्याच्या शेतात विहीर खोदण्याचे काम सुरू होते. जवळपास ३० फुटांची विहीर खोदण्यात येत असताना अचानक विहिरीतील दगड व मातीचा मोठा ढिगारा तिथे काम करणाऱ्या कामगारांच्या अंगावर कोसळला. हा अपघात इतका अचानक घडला की कामगारांना स्वतःचा बचाव करण्याची किंवा बाहेर पडण्याची मुळीच संधी मिळाली नाही. हे सर्व कामगार सध्या दगड आणि मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याचे सांगितले जात आहे.

हेही वाचा: Dating App Story: “लग्नासाठी कॅनडाहून भारतात आली, पण…” डेटिंग ॲपवरील प्रेमाचा भयंकर अंत; तरुणाने दिला लग्नास स्पष्ट नकार!

प्रशासनाचे युद्धपातळीवर बचावकार्य

या दुर्घटनेची माहिती मिळताच प्रशासनाने तातडीने धाव घेत बचावकार्य सुरू केले आहे. जेसीबीच्या सहाय्याने विहिरीतील दगड-मातीचा ढिगारा हटवण्याचे काम वेगाने सुरू आहे. बचावकार्यास वेग देण्यासाठी लवकरच एनडीआरएफची (NDRF) टीम देखील घटनास्थळी दाखल होणार असल्याची माहिती तहसीलदार सचिन लंगोटे यांनी दिली आहे. दरम्यान, या दुर्घटनेत नेमके किती कामगार अडकले आहेत आणि त्यांची प्रकृती कशी आहे, याबाबतची कोणतीही सविस्तर माहिती अद्याप समोर आलेली नाही. प्रशासनाकडून युद्धपातळीवर मदतकार्य सुरू असून कामगारांना सुखरूप बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही दुर्घटना कुठे आणि कशी घडली?

    Ans: पंढरपूर तालुक्यातील आंबे गावात निवास शिंदे यांच्या शेतात ३० फूट खोल विहीर खोदण्याचे काम सुरू असताना विहीर कोसळून हा अपघात झाला.

  • Que: या दुर्घटनेत किती व्यक्ती अडकल्याची भीती आहे?

    Ans: विहीर खोदताना मातीचा ढिगारा अंगावर कोसळल्याने चारजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची प्राथमिक माहिती आहे.

  • Que: बचावकार्यासाठी कोणती यंत्रणा कार्यरत आहे?

    Ans: प्रशासनाकडून जेसीबीच्या मदतीने ढिगारा हटवला जात असून, मदतकार्यासाठी लवकरच एनडीआरएफची टीम दाखल होणार आहे.

Web Title: Pandharpur ambe village well collapse accident ndrf sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 15, 2026 | 02:49 PM

Topics:  

  • Accident Case
  • Pandharpur News
  • Solapur Crime News
  • Well

संबंधित बातम्या

पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात परदेशी भक्तांसाठी ड्रेसकोड; मंदिर प्रशासन निर्णय घेण्याच्या तयारीत
1

पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात परदेशी भक्तांसाठी ड्रेसकोड; मंदिर प्रशासन निर्णय घेण्याच्या तयारीत

UAE मध्ये भरधाव ट्रकने 23 गाड्यांना चिरडल्यानंतर आगीचा भडका; 2 भारतीयांसह 14 जणांचा करुण अंत, 30 जण जखमी
2

UAE मध्ये भरधाव ट्रकने 23 गाड्यांना चिरडल्यानंतर आगीचा भडका; 2 भारतीयांसह 14 जणांचा करुण अंत, 30 जण जखमी

 Bus Accident: मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाजवळच काळाचा घाला! भीषण बस अपघाताने प्रशासनात खळबळ; प्रत्यक्षदर्शींनी सांगितल…
3

 Bus Accident: मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाजवळच काळाचा घाला! भीषण बस अपघाताने प्रशासनात खळबळ; प्रत्यक्षदर्शींनी सांगितल…

Diwali Fire Incidents: “आनंदाचा सण ठरला जीवघेणा!” शहरात फटाक्यांच्या आतषबाजीत ५५ हून अधिक जण जखमी; ३० ठिकाणी आगीचा तांडव!
4

Diwali Fire Incidents: “आनंदाचा सण ठरला जीवघेणा!” शहरात फटाक्यांच्या आतषबाजीत ५५ हून अधिक जण जखमी; ३० ठिकाणी आगीचा तांडव!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.