Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 14 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

स्टॉक रजिस्टर प्रकरणाने सावंतवाडी पालिकेत खळबळ; ‘मोठे मासे लपले आहेत’ नगरसेविकांचा आरोप

स्टॉक रजिस्टर गायब झाल्याप्रकरणी एका कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल झाला; मात्र, याच कारवाईवरून आता नगरपालिकेच्या कारभारावरच प्रश्न उपस्थित झाले आहेत. तक्रारदार अधिकाऱ्यावरच गंभीर आरोप असल्याने ‘मोठे मासे कोण?’ असा सवाल नगरसेविकांनी केला आहे.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Sep 14, 2026 | 09:23 AM
स्टॉक रजिस्टर प्रकरणाने सावंतवाडी पालिकेत खळबळ; ‘मोठे मासे लपले आहेत’ नगरसेविकांचा आरोप

स्टॉक रजिस्टर प्रकरणाने सावंतवाडी पालिकेत खळबळ; ‘मोठे मासे लपले आहेत’ नगरसेविकांचा आरोप

Follow Us
Follow Us:
  • स्टॉक रजिस्टर गायब करण्याचा प्रकार उघड
  • तक्रारदार अधिकाऱ्याच्या भूमिकेवर नगरसेविकांनी उपस्थित केले प्रश्न
  • वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्याची मागणी
सावंतवाडी: सावंतवाडी नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागातील वस्तू नोंद व वापर रजिस्टर (स्टॉक रजिस्टर) गायब करून त्याची विल्हेवाट लावल्याप्रकरणी जोडारी भारत लाखे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, या कारवाईवरून नगरपालिकेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, शिवसेना नगरसेविका ॲड. सायली दुभाषी आणि शर्वरी धारगळकर यांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे. ‘चोरी करणाऱ्यांनीच फिर्याद देण्याचा हा अजब प्रकार असून, या प्रकरणात मोठे मासे लपले असण्याची शक्यता आहे,’ असा आरोप दोन्ही नगरसेविकांनी केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांमार्फत चौकशी करून विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्याची मागणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा: Crime News: मोबाइलवरून ओळख; भेटण्यास नकार दिला, रात्री मागच्या दाराने घरात घुसून धक्कादायक कृत्य 

अधिकारीच संशयाच्या भोवऱ्यात

नगरपालिकेच्या नियमानुसार स्टॉक रजिस्टर लिहिण्याचे काम जोडारी यांच्याकडे असले, तरी रजिस्टर सुरक्षित ठेवण्याची मुख्य जबाबदारी संबंधित विभागप्रमुखांची असल्याचा दावा नगरसेविकांनी केला आहे. त्यामुळे रजिस्टर गहाळ झाल्याची फिर्याद पाणीपुरवठा विभागप्रमुखांनीच दाखल करणे अपेक्षित असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तक्रारदार अधिकारी संजय पोईपकर यांनी समितीच्या सभेत ऑडिटसाठी पुरवठादाराकडून दीड लाख रुपये घेतल्याची कबुली दिल्याचा दावा करण्यात आला आहे. संबंधित पुरवठादारानेही पैसे दिल्याचे मान्य केल्याचे नगरसेविकांचे म्हणणे आहे. त्यामुळे स्वतःवर भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या व्यक्तीनेच आरोपीविरोधात पोलिसांत फिर्याद कशी दाखल केली, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

हेही वाचा:ऑनलाइन ओळख पडली महागात; डेटिंग ॲपवरून विश्वास जिंकला, दोन बहिणींना बिअर पाजून हॉटेलमध्ये नेलं अन्…

‘मोठे मासे लपले असण्याची शक्यता’

या प्रकरणात केवळ जोडारी यांच्यावर कारवाई करून प्रकरण संपवू नये. मुख्याधिकारी आणि इतर वरिष्ठ अधिकारी यांचीही भूमिका तपासणे आवश्यक असल्याचे ॲड. सायली दुभाषी आणि शर्वरी धारगळकर यांनी म्हटले आहे. रजिस्टर गहाळ होण्यामागे नेमकी कोणाची जबाबदारी आहे, तसेच या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे, याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. या प्रकारामुळे सावंतवाडी नगरपालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होणे गरजेचे असल्याचे नगरसेविकांनी म्हटले आहे. सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने विशेष तपास पथक स्थापन करून मुख्याधिकारी, तक्रारदार अधिकारी तसेच या प्रकरणाशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या संबंधित असलेल्या व्यक्तींची सखोल चौकशी करावी, अशी मागणी करण्यात येणार आहे.

Web Title: Stock register issue causes a stir in sawantwadi municipal council councilors allege big fish are being shielded

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 14, 2026 | 09:23 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.